संवाद चांगला साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासाठी तीन महत्त्वाचे तंत्र

संवाद, चर्चा किंवा आपल्या सध्या भाषेत गप्पा मारणं. आपल्या विचारांना, भावनांना व्यक्त करतो तो संवाद. आपला संवाद जितका सजीव, रोचक असेल तितकेच तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होईल.

तर असा इंटरेस्टिंग संवाद साधण्याचं सुद्धा एक तंत्र असतं. आज या लेखात तुम्हाला संवाद साधण्याचे म्हणजे Communication Skill चे ३ अगदी सोपे, सहज आमलात आणता येण्यासारखे तंत्र सांगणार आहे.

याचे तीन फायदे होतील तुम्ही बोलण्यामध्ये एक्सपर्ट व्हाल, तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास झळकेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाला आणखी काय चाललं, मजेत ना असं उगाचंच काहीतरी बोलून बोअर नाही करणार 😜

तर आता आपण हि संवाद कौशल्याची तंत्र बघू.

१) गुणवत्ता- बोलण्यात गुणवत्ता असावी हे ऐकायला खूप सामान्य वाटतं. पण तस ते नाही. म्हणजे बोलण्यातून सगळे विनाकारण येणारे शब्द काढून टाका.

जसं अ.. हुंम… normally , actually असे बरेच शब्द जे संवादात काहीच गरजेचे नसतात. हे बरेचदा प्रत्येकाच्या सवयीतून आलेले असतात.

उदाहरण बघा..

प्रश्न: रविवारी तुम्ही काय करता?

उत्तर १: अ… मी दर रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जातो. म..ग.. दुपारपर्यंत normally क्रिकेट खेळतो. मग संध्याकाळी अ… normally आम्ही घरचे सगळे बाहेर फिरायला जातो. अ… माहितीये… रविवारी एवढी मजा येते ना…

उत्तर २: मी दर रविवारी सकाळी क्रिकेट खेळायला जातो. दुपारपर्यंत क्रिकेट खेळतो, त्याशिवाय संध्याकाळी आम्ही घरचे सगळे बाहेर फिरायला जातो. रविवार तसा पूर्ण एन्जॉय करायचा दिवस असतो आमच्यासाठी!!

आता यातले दुसरे उत्तर हे थोडक्यात आहे पण कॉन्फिडन्ट आहे. आणि ते बोलणे प्रामाणिक सुद्धा वाटते आहे. आता यात पुढची सुधारणा करायची ती दुसऱ्या तंत्राने.

२) विराम- बोलताना वाक्यांमध्ये योग्य वेळी विराम घेतला पाहिजे, योग्य त्या ठिकाणी योग्य तसे थांबून पुढचे बोलले पाहिजे. याने तुमचे बोलणे दमदार वाटते.

आता वरती दिलेले उत्तर २ चे वाक्य सरळ विराम न घेता एकदा बोलून बघा आणि योग्य तिथेविराम घेऊन एकदा बोलून बघा. फरक तुमच्या लक्षात येईल.

या आपल्याला माहित असणाऱ्याच गोष्टी असतात पण तंत्र म्हणून याचा लक्षपूर्वक अभ्यास केला तर प्रभावी संवाद तुम्ही साधू शकाल.

३) विधान- बरेचदा बोलताना एक चूक होते कि समोरच्यावर नुसती प्रश्नांची सरबत्ती केली जाते. जसं कि तुम्ही समोरच्याची इंटरव्यू घेता आहेत.

तर असे चुकूनही होऊ देऊ नका. कारण तुम्ही नुसते प्रश्न विचारले आपल्या बद्दल काहीही नाही सांगितले तर हा एकतर्फी संवाद होईल.

आणि समोरचा माणूस लवकरात लवकर तुम्हाला टाळून मोकळा होईल. म्हणून प्रश्न न करता विधानं करा. आता हे कसं ते बघा. विधानं करण्याचे दोन प्रकार आहेत.

यात असं करायचं कि समोरच्याला त्याच्याबद्दल प्रश्न न विचारता अंदाज घेणारं विधान करायचं.

उदाहरणार्थ : जर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कि तुमचे छंद काय? आता याच विधान म्हणजे स्टेटमेंट करून कसे बोलायचे?

विधान: तुमची पर्सनॅलिटी खूप इंट्रेस्टिंग वाटते!! मला वाटतं तुमचे चांद सुद्धा नक्कीच इंट्रेस्टिंग असतील!!

आता यावर तुम्ही जर चुकले असाल तर समोरची व्यती त्यात दुरुस्ती करेल. ‘नाही मी कसला आलोय इंट्रेस्टिंग माझा जास्तीत जास्त वेळ तर झोपा काढण्यात जातो..

विशेष असं काही मी करत नाही. तुम्हाला असं का वाटलं कि मी इंट्रेस्टिंग आहे.’

पण जर तुमच्या विधानातील अंदाज बरोबर निघाला तर तुमच्यात आणि त्यांच्यात एक चांगला रेपो बनेल.

आणि समोरची व्यक्ती आश्चर्याने विचारेल कि ‘तुम्ही कसं ओळखलं कि मी इंटरेस्टिंग आहे? मला डान्स करायला, गायला, फिरायला अतिशय आवडतं’

समोरच्याच्या बाबतीत अंदाज लावा, जर तुमचा अंदाज चुकला तर ती व्यक्ती स्वतःच दुरुस्ती करेल आणि अंदाज बरोबर असेल तर एक खूप चांगला संवाद साधला जाईल.

हे तंत्र चांगले लोक जोडण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

विधान करण्याचा दुसरा प्रकार आहे गोष्टीच्या रूपात विधान करणे.

उदाहरणार्थ : जर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कि तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते? (यात सरळ प्रश्न विचारला.)

गोष्टी सारखे विधान: या प्रश्नाला तुम्ही गोष्टीच्या रूपाने विचारू शकता. ‘लहानपणी मला अंधाराची खूप भीती वाटायची. ब्लॅंकेट तोंडावर घेतल्या शिवाय मला झोप लागायची नाही.

असं वाटायचं बाजूला बहोत असेल’ आता या गोष्टीतून समोरच्याला काही पॉईंट्स मिळतील.

ज्यातून दोघे एकमेकांना आपले अनुभव सांगू शकतील याने चांगले कनेक्शन बनून संवादाचा परिणाम नक्कीच चांगला होतो.

तर या तंत्रांचा वापर करून संवाद साधला तर तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल.

कमेंटबॉक्स मध्ये हा लेख कसा वाटला आणि संवाद कौशल्या साठी आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या वाटतात हे सांगायला विसरू नका.

धन्यवाद👍

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

6 thoughts on “संवाद चांगला साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासाठी तीन महत्त्वाचे तंत्र”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।