गरिबीमुळे आकरा वर्षाचा असताना घरातून पळून गेलेला, त्यांनतर दिल्लीला जाऊन रेल्वेस्टेशन वर कचरा वेचणारा मुलगा एक अंतरराष्ट्रीय फोटोग्राफर बनतो. ही काहीतरी सिनेमाची स्टोरीलाईन वाटते ना!!
पण ही एका तरुण अंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या फोटोग्राफरच्या गरिबीतून संघर्ष करून यशस्वी झाल्याची खरीखुरी कहाणी आहे. आयुष्य असं कलाटणी घेतं हे सिनेमा पुरतंच शक्य आहे असं वाटतं आपल्याला. पण स्वप्नं मोठी असतील तर तिथपर्यंतचा मार्ग आपल्याला दिसत जातो हे विकी रॉयच्या काहाणीतून समजेल.
१९८७ साली पश्चिम बंगालच्या पुरुलिया गावात विकी रॉय चा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याला त्याच्या आजी आजोबांकडे ठेवले. अर्थातच आजी आजोबांकडची परिस्थिती पण गरिबीचीच होती. तिथे हलाखीच्या परिस्थितीत बंदिस्त आयुष्य जगणे लहानग्या विकीला रुचत नव्हते.
१९९९ साली आपल्या मामाच्या खिशातून ९०० रुपये चोरून विकी घरातू पळून गेला. आणि दिल्लीला पोहोचला तो दिल्ली रेल्वेस्टेशन मध्ये. आता आकरा वर्षाचा छोट्या गावातला गरीब मुलगा शहरात एकटा येतो तेव्हा त्यामागे धोकेपण खूप असतात. तसाच विकी सुद्धा घाबरून रडत असताना त्याला तिथे कचरा वेचणारे मुलं दिसले.
आणि त्यांच्याबरोबर तो सुद्धा स्टेशनवरच्या रिकाम्या बाटल्या उचलून त्यात पाणी भरून रेल्वेमध्ये विकू लागला. दिवसभर पडेल ते काम करून रात्री तिथेच झोपी जाणे असे विकीचे आयुष्य चालले होते. रात्री पोलीस गस्तीवर येत तेव्हा ते या मुलांना हाकलून लावत.
थोड्या दिवसांनंतर काही लोक विकीला अनाथाश्रमात घेऊन गेले. तिथे खाणेपिणे राहणे हे अनाथाश्रमातल्या मुलांसाठी होते तसे नीट होत होते. पण अनाथाश्रम साहजिकच बंदिस्त होता. आणि विकीला बंदिस्त जगणं नकोच होतं. त्याने अनाथाश्रमातून सुद्धा पळून जाण्याचा प्रयत्न केला.
आणि एक दिवस त्याने वेळ साधली आणि तो अनाथाश्रमातून निसटला आणि पुन्हा रेल्वेस्टेशन वर जाऊन आपले कचरा वाचण्याचे काम चालू केले. आणि पुढे काही दिवसांनी त्याने एका रेस्टरन्ट मध्ये पडेल ते काम करायला सुरू केले.
इथे मात्र त्याने खूप कष्ट सोसले. एकदा रेस्टोरंटमध्ये आलेला एक भला माणूस तुझे हे शिकण्याचे दिवस आहेत काम करण्याचे नाही हे समजावून सांगण्यात यशस्वी झाला. त्याने विकीला ‘सलाम बालक ट्रस्ट’ बद्दल सांगितले आणि त्याला हेही समजावले की तिथे तू शिकू शकतो आणि तिथे तुला बंदिस्त आयुष्य जगावे लागणार नाही. ‘आपना घर’ या संस्थेच्या एका केंद्रात विकी दाखल झाला.
आणि सहावीत तिथे त्याला दाखल केले. इथे मात्र विकी न चुकता शाळेत जाऊ लागला. दहावीला ४८℅ मार्क मिळवून विकी उत्तीर्ण झाला. पुढे तिथल्या शिक्षकांनी त्याचा कल ओळखून त्याला तांत्रिक शक्षण घेण्यासाठी सुचवले.
या दरम्यान ट्रस्ट मध्ये एका फोटोग्राफी वर्कशॉप आणि डॉक्युमेंटरी साठी ब्रिटिश फोटोग्राफर डीक्सी बेंजामिन आले होते. हीच वेळ होती विकीच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची.
डीक्सी यांच्याबरोबर त्याने सहाय्यक म्हणून काम सुरू केले. पण इंग्रजी बोलण्याची अडचण तेव्हडी होती. काही कालांतराने डीक्सी विदेशात निघून गेले आणि विकीला सुद्धा १८ वर्षे पूर्ण झाल्याने संस्था सोडावी लागणार होती.
दिल्लीतल्या नावाजलेल्या अनय मान या फोटोग्राफरकडे विकी असिस्टंट म्हणून काम करू लागला. या कामात त्याला पगाराच्या रुपात गरजेपुरता पैसा सुद्धा मिळू लागला.
अनय यांच्याकडून फोटोग्राफी मधले बरकावे त्याने शिकले. २००७ साली त्याने ‘स्ट्रीट ड्रीम्स’ नावाचे फोटोग्राफी चे प्रदर्शन भरवले ज्यात रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांचे फोटो होते. हे प्रदर्शन ब्रिटिश कमिशन ने प्रायोजित केले होते.
या वेळी विकीला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि तो लंडन, व्हिएतनाम आणि दक्षिण आफ्रिकेत पण गेला. २००८ साली रामचंद्रनाथ फाउंडेशन कडून तो फोटोग्राफी साठी इतर तीन फोटोग्राफर बरोबर न्यूयॉर्कला गेला.
पुढे २००९ ला ‘सलामवाले ट्रस्ट’ ने ‘इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर यंग पीपल’ ने विकीचा सन्मान केला. २०११ साली विकीने फोटोग्राफी लायब्ररी बनवली.
२०१३ मध्ये नॅट जिओ कडून कव्हर फोटोग्राफ साठी विकीची निवड झाली आणि त्यासाठी तो श्रीलंकेत गेला. २०१३ लाच त्याने ‘होम स्ट्रीट होम’ नावाचं पुस्तक लिहिलं. एवढंच नाही तर बोस्टन MIT मध्ये त्याला फेलोशिप पण मिळाली….
बापरे… विश्वास बसत नाही ना!! पण हे एका कचरा वेचणाऱ्या गरीब, एकाकी मुलाने केले… मेहेनत करून विकीने आपल्या नशिबाचे दरवाजे खोलले…
बरेच लोक असतात जे आपल्या नशिबाला दोष देत रडत बसतात पण थोडेच असतात जे रडत न बसता आपला मार्ग स्वतःच सुन्दर बनवतात.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.