आनन्द चित्रपटाचा एक फेमस डायलॉग आहे…
जिंदगी बडी होनी चाहीये, लांबी नहीं
यात आनंद ची भूमिका करणाऱ्या राजेश खन्नाला असं म्हणायचं असतं की… ‘जेवढं आयुष्य जगा तेवढं भरभरून जगा’
सिनेमा बघताना या वाक्यातला गहन अर्थ किती लोक ध्यानात घेतात सांगता येत नाही. पण काही लोक कितीही खडतर काळ चालू असला तरीही, आज समोर जे दिसतंय ते प्रामाणिकपणे करा, येणाऱ्या उद्याच्या भीतीने आज खराब होऊ देऊ नका हे आपल्या वागण्यातून दाखवून देतात. त्यासाठी त्यांना कुठल्याही लाईफ कोचची आवश्यकता नसते.
या वर्षीच्या CBSE च्या दहावी ची परीक्षा देणारा विनायक आपल्या अवघ्या काही वर्षांच्या आयुष्यातून हेच तर शिकवून गेला…
CBSE च्या दहावीच्या परीक्षेत विनायकने एकूण तीन पेपर दिले. आणि त्याला इंग्लिशमध्ये १००, होम सायन्समध्ये ९७ आणि संस्कृतमध्ये ९६ असे गुण या तीन पेपर्स मध्ये मिळाले. टॉपर्सच्या लिस्टमध्ये झळकतील असे हे मार्क्स!!!
पण विनायक राहिलेले २ पेपर्स देऊ नाही शकला…
कारण जगण्या मरण्याची परीक्षा कसलीही संधी देत नाही… आणि या परीक्षेचं वेळापत्रक नियतीच्या हातात असतं!!…. विनायक आता या जगात नाही.
एक गंभीर आजार होता विनायकला..
‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ हा एक असा आजार आहे ज्यात मासपेशींची वाढ नैसर्गिकरित्या होत नाही आणि शरीर कमजोर होत जातं…
पेशींच्या वाढीसाठी गरजेच्या असलेल्या डिस्ट्रॉफीनच्या कमतरतेमुळे हे होते. विनायक नॉयडाच्या एका इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी होता.
साश्रू नयनांनी आई वडिलांनी पूर्ण केलं विनायकचं स्वप्न…
इंडियन एक्सप्रेस शी बोलताना विनायकाची आई भावुक होऊन सांगते…
विनायक स्टीफन हॉकिंग्स ना आपला आदर्श मानायचा. अंतराळात जायचं स्वप्न होतं त्याचं. अंतराळातली रहस्य सोडवायची, त्याचा अभ्यास करायची त्याला खूप आवड होती. हॉकिंग्स हे सगळं करू शकतात तर मी का नाही करू शकणार असं तो म्हणायचा… परीक्षा झाल्यावर रामेश्वरम ला जाण्याची त्याची इच्छा होती.
परीक्षा झाली, आई- वडील विनायकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी रामेश्वरमला जाऊन आले, रिझल्ट आला…. पण हे सगळं ज्याचं होतं तो विनायक नाही… विनायकचं शरीर नाही पण जिद्द नक्कीच आहे….
परीक्षा चालू असतानाच विनायकची तब्बेत खराब झाली होती. २६ मार्चला सकाळी विनायक जेव्हा उठला तेव्हा त्याने आईला पुस्तके मागितली आणि अभ्यास केला. वडिलांनी नाश्ता केला आणि विनायकला आंघोळ घालतानाच तो बेशुद्ध झाला. आई वडिलांनी लगेच त्याला दवाखान्यात नेले. पण मृत्यू विनायकाचा पाठलाक करत होता. आई-वडिलांचे मुलाला वाचवण्याचे प्रयत्न, मृत्याला झुंज देण्याची विनायकाची जिद्द सारं हरलं… आणि मृत्यू जिंकला. विनायक आज आपल्यात नाही.
विनायकाची मोठी बहीणसुद्धा CBSE ची टॉपर होती. ती आता अमेरिकेत उच्च शिक्षण घेते आहे. विनायकला पण आपल्या बहिणीसारखेच टॉपर व्हायचे होते. त्यासाठी त्याने भरपूर मेहेनत पण घेतली होती. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते.
इतिहासाची आवड असलेला विनायक आता स्वतःच इतिहास झाला आहे. पण एक असा इतिहास जो इतरांना भविष्याची स्वप्न पाहण्याची उमेद देईल….
तुम्हाला कधी कुठल्या परीक्षेची भीती वाटली तर मागे बघून विनायकला आठवा… सगळी भीती, नैराश्य, दुःख झटकून आयुष्याला सांगा…
लेट्स डू इट, बिफोर आय डाय!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.