आजपर्यंत आपण बऱ्याच ट्रॅव्हल एजन्सी, टूर गाईड कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर आणि भन्नाट कल्पना घेऊन आल्याचे पाहिले आहे. या स्पर्धेच्या युगात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शक्य ते सर्व काही केलं जातं ते मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी आणि आपला पाय मजबूत रोवण्यासाठी.
पण तुम्ही एखादा रिक्षा ड्रॉयव्हर पहिला आहे का? जो आपल्या ग्राहकांना आपल्या छोट्याशा रिक्षात वर्तमानपत्र, मॅगेझीन, टि.व्ही., टॅबलेट उपलब्ध करून देतो. एवढंच नाही तर ग्राहकांसाठी स्पर्धा सुद्धा ठेवतो!!
या रिक्षा ड्रॉयव्हरचं नाव आहे अन्ना दुरई (Anna Durai). चेन्नईच्या थिरुवनमयुर ते शौलिंगनलूर या मार्गावर तो आपली हि अनोखी ऑटो रिक्षा चालवतो. इथले लोक त्याला ‘ऑटो अन्ना(Auto Anna)’ या नावानेच ओळखतात.
अर्ध्यावरच शिक्षण सुटलेल्या ऑटो अन्नाचं वय साधारण तिशीच्या आसपास आहे. ग्राहकांना अशा सुविधा देणारा भारतात तरी या घडीला दुसरा ऑटो रिक्षा ड्रॉयव्हर नाही.
अन्ना दुरई यांचा जन्म तंजावर जिल्ह्यातला. चार वर्षाच्या वयाचा हा मुलगा आपले दोन भाऊ आणि बहिणीबरोबर चेन्नईला आला. आणि पुढे रिक्षा चालवू लागला. त्याच्या रिक्षात सहा जण बसू शकतात. त्याची रिक्षा तो शक्यतोवर चेन्नईच्या आय. टि. कॉरिडॉर मध्ये चालवतो.
आधी अन्नाची रिक्षा सुद्धा इतर रिक्षांसारखीच होती पण ग्राहकांना काहीतरी वेगळं द्यायचा विचार अन्ना ने केला आणि रिक्षात वर्तमानपत्र, मॅगेझीन ठेवायला सुरुवात केली. आपल्या तुटपुंज्या कमाईतूनच काही भाग त्याने यात लावला. लवकरच आपल्या रिक्षात वाय-फाय सुविधा सुद्धा चालू केली. स्मार्ट फोन जवळ नसलेल्या ग्राहकांसाठी सात हजारांचा टॅबलेट सुद्धा ठेवायला सुरुवात केली.
पण अन्ना चे ग्राहक आय. टि. क्षेत्रातलेच जास्त असल्याने त्यांच्यासाठी यापेक्षा उच्च दर्जाचा टॅबलेट असावा म्हणून त्याने दुसरा टॅबलेट सुद्धा घेतला. मनोरंजनासाठी छोटा टि. व्ही. सुद्धा या रिक्षात आहे.
एवढंच नाही तर ऑटो अन्ना त्याच्या रिक्षात शिक्षकांना आणि एच. आय. व्ही. च्या रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सेसना फ्री सर्व्हिस सुद्धा देतो. ‘कार्पोरेट सोशल अवेअरनेस’ हा फक्त मोठ्या कम्पन्यांनीच पाळायचा असतो हा विचार अल्पशिक्षित ऑटो अन्ना ने खोटा ठरवला. त्याच्या रिक्षात वर्षातले काही दिवस काही विशिष्ठ प्रवासी मोफत प्रवास करू शकतात. जसं कि मदर्स डे ला मूल बरोबर असलेल्या आया मोफत प्रवास करतात ऑटो अन्नाच्या रिक्षात.
या रिक्षाची महिन्याची कमाई साधारण ५० हजार आहे. कॅश बरोबर नसलेल्या ग्राहकांसाठी कार्ड स्वाईप मशीनची सुविधा सुद्धा अन्नाने ठेवलेली आहे. ग्राहकांना पाच प्रश्न विचारून बरोबर उत्तर देणाऱ्या विजेत्याला १००० रु. देणे, काही टोकन ठेवणे अश्या भन्नाट स्पर्धा सुद्धा या रिक्षात ऑटो अन्ना आयोजित करतो.
ऑटो अन्ना सांगतात कि या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली तेव्हा आधी वाटले नव्हते कि लोक यात भाग घेतील. पण पहिल्याच महिन्यात ८० लोकांनी स्पर्धेत भाग घेतला.
२०१२-१३ ला सोशल मीडिया वरून ऑटो अन्ना प्रसिद्ध झाले. “फोटोज दैट शूक द वर्ल्ड” नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे. त्यावर ऑटो अन्ना चा फोटो आला आणि तो व्हायरल झाला तेव्हापासून ऑटो अन्ना बद्दल उत्सुकता वाढत गेली. फेसबुकवर १० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स एका रिक्षा ड्रॉयव्हरला असू शकतात यावर कोणाचा विश्वास सुद्धा बसत नाही. एवढंच नाही तर ‘टेड टॉक्स’ TEDx मध्ये सुद्धा ऑटो अन्ना ची मुलाखत झालेली आहे.
वोडाफोन, रॉयल एन्फिल्ड या कंपन्यांनी अन्ना दुराईंना मॅनेजमेंट बद्दल सेमिनार साठी आमंत्रित सुद्धा केले. एका फ्रेंडशिप डे ला तर अन्ना दुराईंबरोबर बोलण्यासाठी वेगवेगळ्या देशातून लोकांनी कॉल केले. अन्ना दुरई सांगतात कि हि आठवण त्यांच्या साठी कधीही न विसरता येण्यासारखी आहे.
Amazingauto.in या नावाने अन्ना ने एक वेबसाईट सुद्धा चालू केली आणि आता लवकरच एक ऍप चालू करण्याची अन्नाची इच्छा आहे. ज्याने ग्राहकांना त्याच्या रिक्षाचे लोकेशन कळेल. अन्ना आज फक्त एक सेलिब्रिटी रिक्षा ड्रॉयव्हरच नाही तर मॅनेजमेंट ट्रेनी आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून सुद्धा ओळखला जातो.
तर मग मित्रांनो एक अशिक्षित रिक्षा ड्रॉयव्हर आपली मेहेनत, भन्नाट कल्पना आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे सगळं करू शकतो तर काहीही करून मला कामात यश मिळतच नाही हि तक्रार करण्यात काही अर्थ आहे का?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अन्ना की अण्णा??
हि व्यक्ती चेन्नई मधली असल्याने “ऑटो अन्ना” असे म्हणतात… महाराष्ट्रात नक्कीच “अण्णा” म्हंटले गेले असते.
Super….