अपयशी होण्याची, ठरवलेले टार्गेट पूर्ण न होण्याची भीती कशी घालवाल?

प्रत्येकाची इच्छा असते की येणाऱ्या काळात आपण यशस्वी व्हावं, श्रीमंत व्हावं.

आणि जर तुमच्याकडे पण येणाऱ्या काळात यशस्वी होण्याचं एखादं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला सत्यात उपरवण्याच्या योजना आहेत तर विश्वास ठेवा तुम्ही या जगातल्या ९५% लोकांपेक्षा कित्येक पटींनी पुढे आहात.

पण स्वप्ने संघर्षाशिवाय आणि योजना रिस्क आणि फेल्युअर म्हणजे अपयशाशिवाय पूर्ण होत नाहीत.

आणि हीच रिस्क आणि फेल्युअर ची भीती इतकी मोठी आहे जी लाखो करोडो लोकांच्या स्वप्नांना आकार घेण्याआधीच बॅकफूटवर नेते.

काही लोक या भीती बरोबर दोन हात करतात सुद्धा पण हळूहळू अडचणी यायला लागल्या की पुन्हा आपण पाहिलेलं स्वप्नं पूर्ण होणं अशक्य समजून आपल्या कम्फर्ट झोन मध्ये जातात.

आणि आपल्याला शक्य वाटणाऱ्या साचेबद्ध गोष्टी करत जगायला मोकळे होतात. आणि पुन्हा फेल होण्याच्या भीतीने ते प्रयत्न करणंच सोडून देतात.

एक सांगू, खरंतर अयशस्वी होण्याची भीती ही प्रत्यक्षात अयशस्वी होण्यापेक्षा सुद्धा जास्त जीवघेणी आहे. कारण या भीतीमुळे कित्येक स्वप्न सुरू होण्याच्या आधीच कोमेजून जातात….

ही भीती आपली शाळा, आपलं घर, आपले नातेवाईक यांच्याकडून लहानपणीच आपल्या सबीकॉन्शस माईंडमध्ये ठासून भरलेली असते.

अगदी लहान असताना, ‘तिकडे जाऊ नकोस तिकडे भोकडी आहे’

शाळेत असताना, ‘अभ्यास कर नाहीतर नापास होशील’

या सांगण्यामागे हेतू असतो फेल होणं ही चांगली गोष्ट नाही. आणि तसं झालं तर लोक काय म्हणतील वगैरे वगैरे. शंभर कारणं तयार असतात जी तुम्हाला प्रयत्न करण्यापासून रोखून धरतात.

पण फेल होणं अयशस्वी होणं हा आयुष्याचा एक भाग आहे. कुठलीही गोष्टी शिकण्याचा, समजण्याचा एक साधा सोपा पण मूलभूत सिद्धांत आहे.

जेव्हा तुम्ही लहान होते, उभं पण राहू शकत नव्हते, उभं राहायला शिकत होते, उभं राहत होते तेव्हा धप्पकन पडत होते पुन्हा उठत होते, पुन्हा पडत होते, सांभाळत होते आणि कित्येक वेळा धडपडत काही महिन्यातच दुडूदुडू पळत होते.

आणि मग चालणं शिकत होते. कसलाही अनुभव पाठीशी नव्हता.

मग आज कसला एवढा फरक पडला? कुठलीही गोष्ट अपयशाचा विचार न करता शून्यातून सुरु करायला का घाबरायचं. आठवून बघा कशी आपण सायकल चालवायला शिकलो….

आज पण तुम्हाला हा साधा सोपा सिद्धांत वापरून फेल्युअरच्या भीतीला पळवून लावायचं आहे.

जसजसं आपण मोठं होतो तसं हा साधा सोपा आपल्या आत ठासून भरलेला सिध्दांत आपण विसरायला लागतो. आणि हाच साधा-सोपा आणि आपलाच सिद्धांत मोटिव्हेशन म्हणून कुठेतरी आपण शोधतो.

का होतं असं? आपल्यातला मूलभूत गुण का असा मागे पडतो? का आपल्याला त्याचा विसर पडतो?

चालायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करताना पडू सुद्धा शकतो. कारण पडणं हा शिकण्याच्याच प्रक्रियेचा भाग आहे.

फेल होण्याची भीती बाळगू नका. जर घाबरायचंच असेल तर प्रयत्न न करता गिव्ह अप करण्याला घाबरा. अयशस्वी होणं ही चुकीतून शिकण्याची एक संधी आहे.

आपली अडचणींवर मात करण्याची इच्छा आपल्या फेल्युअरच्या भीतीपेक्षा मोठी असली म्हणजे झालं. यशस्वी लोकांच्या यशाची गुरुकिल्ली त्यांचं कधी एके काळी अयशस्वी असणे हीच असते.

फेल होण्याच्या भीतीला जर मोठं होऊ दिलं तर सत्यात उतरायच्या आधीच सम्पलेल्या लाखो करोडो स्वप्नांसारखंच तुमचं स्वप्न सुद्धा सहजच डोक्यात आलेला विचार म्हणून विरून जाईल.

कामाला सुरुवात केली तर अडचणी या येणारच, पडणं-धडपडणं यात काही गैर नाही. पण फेल झालं तर हातपाय गाळून बसणं हा त्यावरचा उपाय नाही.

काही दिवसांपूर्वी आपण आपल्या पेजवर #LetUsTalk मध्ये एक प्रश्न विचारला होता की, ‘बघितलेलं स्वप्नं किंवा टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही योजना तयार ठेवता का तुम्ही’ आणि ती योजना तयार असली तरी त्यात अडथळा आला तर आपण विचार सोडून देतो की अडथळा पार पाडतो.

यावर एक उत्तर होतं की इच्छा तर भरपूर असते पण ती योजना आमलात आणायची कशी ते कळत नाही.

जसं आपण पूर्वी बोललो होतो की लहानपणीच आपल्या सबकॉन्शस माईंडमध्ये कित्येक भीतीचे बागुलबुवा बसवलेले असतात. तर या योजनांना आमलात आणण्यासाठी आपल्या सबकॉन्शस माईंडला लक्षपूर्वक अश्या पध्दतीने प्रोग्राम करणं हे तर आपल्याच हातात आहे….

आणि हो जाता जाता एक गोष्ट सांगून जातो, उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल ना तेव्हा तुमची #SucessStory सांगताना हेच फेल्युअरचे किस्से तुमच्या गोष्टीत इंटरेस्ट आणतील, बरोबर ना!!!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अपयशी होण्याची, ठरवलेले टार्गेट पूर्ण न होण्याची भीती कशी घालवाल?”

  1. फक्त विचार करून उपयोग नाही तर कृती ही तितकीच महत्त्वाची आहे

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।