“I can totally understand your feelings. It’s okay if you want to cry “, माझ्या पुढ्यात tissue पेपर धरत ती म्हणाली.
लंडनमध्ये उतरले त्यादिवशी रात्री मला युनिव्हर्सिटीचं होस्टेल मिळालं नव्हतं. त्यामुळे माझी सोय तिच्याकडे केली होती. हेलन तिचे नाव. तिच्याकडची रात्र मी जवळपास रडूनच घालवली. खूप प्रवास, त्यामुळे खूप थकवा. त्यांत मरणाची थंडी. घरातल्यांची आठवण. सगळंच विचित्र. त्यांत माझं इंग्लिश कुणालाच कळत नव्हतं आणि त्यांचं मला. मुळांत माझी मातृभाषा मराठी असल्याने भावनांचा अतिरेक झाला कि मला इंग्रजी सुचत नाही. त्यामुळे सगळंच अवघड होऊन बसलं होतं.
”What is bothering you?’ माझ्या पुढ्यात चहाचा कप ठेवून तिने विचारलं. माझी ती अवस्था बहुदा तिने ओळखली असावी. माझ्याकडून काहीच उत्तर दिलं गेलं नाही. मला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. मला आईची खूप-खूप आठवण येत होती. मला कधीच न आवडणारे पोहे सुद्धा मला आठवत होते. तिच्या प्रश्नासरशी डोळ्यांतून सगळ्या नद्या वाहू लागल्या. तसा माझ्यापुढे tissue पेपर धरत ती म्हणाली, ‘I can totally understand your feelings. It’s okay if you want to cry.’ काही काळ तिने मला रडू दिलं.
मग मला म्हणाली, ‘You know, you are very beautiful and brave girl. Your mother must be proud of you. Can you tell me, what is she thinking now?’
मला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. मग तीच म्हणाली,”She wants you to be happy. She wants you to be successful. You are like a butterfly, see how beautiful they are! They go to each flower, they take opportunities in front of them. Why don’t you try to live like them?” तिचं म्हणणं मला विचार करण्यासारखं वाटलं. मी जराशी सावरले.
मी परत निघाले तेंव्हा तिने माझ्या हातात एक बॅग दिली. म्हणाली, “This bag is full of smiles. Whenever you are sad, put that sadness in this bag and take out a smile to wear on your face.” त्या बॅगेत तिने मला भरून दिलेले smiles अजूनही संपलेले नाहीत.
काही दिवसांपूर्वी अशीच एक मुलगी माझ्याकडे आली होती. डोळ्यांत पाणी भरलेलं. कुठला तरी विचार खूप त्रास देत होता. तेंव्हा माझ्या हातात tissue paper होता आणि माझ्या तोंडून निघून गेलं, “‘I can totally understand your feelings. It’s okay if you want to cry.” मन मोकळं करून ती गेली आणि काल परत भेटली. बरीचशी सावरलेली होती. हसत होती. त्या बॅगेतलं एक smile त्या दिवशी ती माझ्याकडून माझ्याही नकळत घेऊन गेली होती.
वाचण्यासारखे आणखी काही…..
वसुधा कोरडे-देशपांडे यांचा ब्लॉग
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.