करून बघा या गोष्टी आणि बघा आपल्यातले गट्स वाढवणं आपल्याच हातात आहे. धैर्यवान असणं हि काही खूप अफलातून आणि सिनेमातल्या हीरोलाच शक्य असणारी गोष्ट आहे हे विसरून जा. आणि आपल्यातले गट्स वाढवणं आपल्या हातात आहे हे आधी लक्षात घ्या.
बरेचदा असं होतं, ऑफिसमध्ये एखादं टार्गेट पूर्ण करण्यात आपण कमी पडतो नाहीतर काही बिजनेस करत असाल आणि एखादी ऑर्डर पूर्ण करण्यात अडचणी येतात आणि मग काम पुढे नेणेच अशक्य वाटते. किंवा गृहिणी असाल आणि अशीच काहीतरी अडचण उभी राहिली कि आता हे कसं निभावून न्यायचं याचं धर्मसंकट उभं राहतं!!
काय करता तुम्ही अश्या वेळी?
खरंतर काहीही करत नाही… तुम्हाला असं भीती, काळजी वाटणं म्हणजे अगदी ‘पार्ट ऑफ लाईफ’ वाटतं. त्यामुळे तुम्ही या परिस्थितीच पुढे जात राहतात. असा विचार तुम्ही कधी केलाय का? कि, या परिस्थीवर योग्य तो निर्णय घेऊन ऍक्शन घेण्याचे गट्स तुमच्यात आले पाहिजेत.
याने असं होऊ शकेल ना, कि पुन्हा जेव्हा अशी वेळ येईल उदाहरणार्थ ऑफिसच्या पूर्ण न झालेल्या टार्गेटबद्दल आपण बोलू.
जर आता या वेळी तुमचं टार्गेट पूर्ण नाही झालंय. पण वरती आपण बोलल्याप्रमाणे योग्य निर्णय घेऊन ऍक्शन तुम्हाला जर घेता आली तर ऑफिसमध्ये तुमच्या बॉसला तुमची किंमत कळेल.
तुम्ही परिस्थिती काहीना काही करून सांभाळून घ्याल हा तुमच्याबद्दलचा तुमच्या वरिष्ठांचा विश्वास हा तुमचा प्लस पॉईंटच होऊन जाईल. याने तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल हे तर आलेच आणि हेच गृहिणी, व्यावसायिक, विद्यार्थी सर्वांना लागू पडते.
बरेच लोक आपल्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी स्ट्रगल करत असतात. प्रगती ती बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत असू शकते आपल्या प्रोफेशनल किंवा पर्सनल आयुष्यात दोनींहीकडे प्रोग्रेस करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात.
बरेच जणांचा पक्का असा समज झालेला असतो कि ते यासाठी वेगळं काही करूच शकणार नाहीत.
तर सांगायचा मुद्दा असा कि तुमच्यातला धीर, गट्स हे सुद्धा तुम्हाला वाढवता येतील. हो अगदी वजन वाढवतात ना तसं👊🏾
या लेखात मी तुम्हाला कठीण परिस्थीला तुमच्यातले गट्स वाढवून योग्य निर्णय घेऊन धीराने समोर कसं जायचं याचं निन्जा टेक्निक सांगणार आहे 🤗
आता जर मी असं म्हंटल कि तुमचे गट्स, धीर हे मसल्स सारखे असतात तर… जेवढं तुम्ही त्यांना ट्रेन कराल तेवढे जास्त ते स्ट्रॉंग होतील.
म्हणजे जेवढे तुम्ही तणावपूर्ण परीस्थित जास्त न डगमगता जवाबदारी घेऊन निर्णय घेत जाल तेवढे जास्त धैर्यवान तुम्ही व्हाल. आणि भविष्यात सुद्धा अश्या सिच्युएशन मध्ये तेवढेच सहज तुम्हाला योग्य निर्णय घेणं जमेल.
जर आजपर्यंत तुम्ही कधी प्रयत्नच केले नसतील तर वजन वाढवणं, मसल्स मधली ताकत वाढवणं याला जसा वेळ लागतो तसंच गट्स सुद्धा काही लगेच वाढवता येणार नाहीत.
आता यासाठी काय करायचं
१) जास्तीत जास्त माहिती ठेवा
तुमचा तुमच्या ज्या ज्या गोष्टींशी विषयांशी नेहमी संबंध येतो त्याबद्दल पुरेपूर माहिती असू द्या. अशी परिपूर्ण माहीती जर तुमच्याकडे असेल तर काही प्रश्न जर उभा राहिला तर अगदी बेसिकली तुम्ही गडबडून जाणार नाही.
आणि गडबडून नाही गेले तर आर्धी लढाई तिथेच जिंकली समजा.
उदाहरण बघू, जर तुम्हाला इंटरव्यू साठी जायचं असेल. तर अगदी इंटरव्यूचं ठिकाण, पोहोचायला लागणार वेळ इथपासून ते कम्पनीची पूर्ण माहिती तिथलं वर्क कल्चर इथपर्यंत सगळी माहिती मिळवा. आपण या पिढीचे लोक खूप भाग्यवान आहे बरंका!!
का माहिती ये???
माहिती शोधण्यासाठी गुगलबाबा नेहमी तुमच्या मदतीला आहे….. ‘जिसका कोई नाही उसका गुगल है यारो’ एवढं लक्षात ठेवा. आणि धैर्यवान बनण्याच्या बनण्याच्या मार्गातला पहिला टप्पा पूर्ण करा.
२) भीती घालवून रिलॅक्स व्हायला शिका
थोडी जरी भीती मनात असली तरी तुम्ही गळून जाता आणि आलेल्या परिस्थीची खूपच जर भीती असेल तर तुम्ही सपशेल हार मानून शस्त्र म्यान करतात. तर माहिती घेण्याबरोबर भीती घालवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरंका…
प्रयत्नपूर्वक काही गोष्टी समजून घेतल्या तर हे सुद्धा तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही याची मला खात्रीए. यासाठी मागे एका लेखात आपण चर्चा केलेली होती.
यासाठी खोलात माहिती करून घ्यायची असेल तर, ‘रोजच्या जीवनात भीतीला जा सामोरे दिलदार मनाने…’ हा लेख वाचा.
३) काहीतरी लकीचार्म असण्यावर विश्वास ठेवा.
हे ऐकून असं म्हणू नका कि आता तुम्हाला अंधश्रद्धेकडे घेऊन जातेय मी. पण मानसशास्त्रीय सर्वेक्षणात सुद्धा हि गोष्ट पुढे आलेली आहे कि कठीण काळात काहीतरी लकीचार्म तुमच्याकडे असल्याचा विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुमच्यातले गट्स वाढून जोमाने काम करायला तुम्हाला ऊर्जा मिळते.
लकीचार्म काहीही असू शकतो. ज्या गोष्टीला तुमच्या दृष्टीने काहीतरी भावनिक महत्त्व आहे अशी वस्तू असू शकते. जसं कि आजोबांचं घड्याळ, एखादा आवडता शर्ट वगैरे वगैरे… एकदा करून बघा याने कम्फर्ट सुद्धा मिळेल.
४) धैर्य नावाच्या मसल्सची ताकत वाढवा…
लेखाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं कि धैर्य हे मसल्स सारखं असतं वजन जसं वाढवता येतं तसं या धैर्य नावाच्या मसल्सची ताकत सुद्धा वाढवता येते. त्यासाठी काही प्रॅक्टिसची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल, काहीतरीच काय सांगता कठीण परिस्थीला तोंड द्यायची प्रॅक्टिस कशी करायची.
बरं आता यासाठी कठीण परिस्थिती ओढवून आणायची का? ‘आ बैल मुझे mar’ करून धैर्यवान व्हायचं असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमचं ज्ञान राहू द्या तुमच्याचकडेच!! 🤦♀️
तर याचा अर्थ असा कि दर आठवड्याला एकदा काहीतरी चॅलेंज घ्यायचंच असा नियम स्वतःसाठी लावून घ्या. जसं तुमची जर साधी राहणी असेल आणि एखाद्या ऑथेंटिक चायनीज हॉटेल मध्ये जाऊन तिथल्या टिपिकल वेटरला ऑर्डर देणं हे तुम्हाला किचकट वाटत असेल ते चॅलेंज घेता येईल.
माझ्या एका मित्राने हॉटेल मचान मध्ये तिथले पदार्थ बघून ऑर्डर देण्याचं टेन्शन आल्याचं एकदा सांगितलं होतं. म्हणून आज हि चॅलेंजींग एक्झरसाईझ म्हणून आठवली. असंच तुमच्यासाठी जे काही चॅलेंजिंग आहे. ते तुम्ही करू शकता.
असंच चॅलेंज घेता घेता जेव्हा कधी तुमच्यासमोर कठीण प्रसंग उभा राहील तेव्हा मानसिक दृष्ट्या त्याची तयारी करणं तुम्हाला जड जाणार नाही.
करून बघा या गोष्टी आणि बघा आपल्यातले गट्स वाढवणं आपल्याच हातात आहे. धैर्यवान असणं हि काही खूप अफलातून आणि सिनेमातल्या हीरोलाच शक्य असणारी गोष्ट आहे हे विसरून जा. आणि आपल्यातले गट्स वाढवणं आपल्या हातात आहे हे आधी लक्षात घ्या.
अशाच काही गोष्टी तुम्ही सुद्धा करतच असाल परिस्थीला सामोरं जाण्यासाठी!! काय ते कमेंट्स मध्ये सांगा. आणि याबद्दल तुमचे अनुभव सुद्धा इथे शेअर करा.
धन्यवाद आणि शुभेच्छा…
तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.
आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. हे सांगण्याचे कारण असे कि बरेच वाचक आमच्यावर चिडतात.
कि एवढी चांगली माहिती आहे, आम्ही का इतरांना द्यायची नाही? तर नक्की द्या!! पण कॉपी-पेस्ट करून नाही, तर दिलेल्या पर्यायातून शेअर करूनच…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Sir… Superb… Thanks for guidance… It’s life saving medicine..
आपले लेख खूप अप्रतिम असतात. असेच लेख भविष्यात अनेक लोकांना मदत करतील, हीच अपेक्षा.