आर्थिक भांडवलाशिवायही तुम्ही उद्योग करू शकता. हो, कुठलंही आर्थिक भांडवल नसताना, पैसे न गुंतवता किंवा अगदी हजार पाचशेतही तुम्ही उद्योग सुरू करू शकता.
उद्योगाच्या अश्या खूप सार्या कल्पना आहेत ज्या वास्तवात आणायला तुम्हाला पैसे नाही लागणार. चला तर मग शून्य भांडवलात सुरू करू शकतो असे उद्योग कोणते ते समजून घेऊ.
लिखाण, तुमच्याकडे लिहिण्याची कला असेल तर हा तुमचा उद्योग होऊ शकतो. सुरूवातीला कदाचित तुम्हाला तुमच्या लिखाणाचे पैसे नाही मिळणार, पण तुमचे लिखाण सकस असेल आणि ते कुणासाठी तरी उपयोगी असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा मोबदला मिळू शकतो.
तर लिखाणातून पैसे कसे कमवायचे? तुम्ही एखाद्या वृत्तपत्रासाठी लिहू शकता. मासिक, साप्ताहिकासाठी लिहू शकता. कुठलाही एक तुमच्या आवडीचा विषय निवडून तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही संगणक क्षेत्रात असाल तर तुम्ही त्या क्षेत्रातली नवीन माहिती लोकांना तुमच्या लिखानमार्फत देऊ शकता.
तुम्ही ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक , औद्योगिक विषयांवर लिहून चांगले पैसे कमवू शकता. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे कमावण्याच्या हेतूने लिहू नका, जर तुम्ही त्या हेतूने लिहीत असाल तर तुमच्या लिखाणातला सकसपणा कमी होऊ शकतो आणि अर्थातच लिखाणाची कमाई सुद्धा!
लिखाणाची कला जर का तुमची खूप चांगली असेल तर तुम्ही स्वत:चे पुस्तक प्रकाशित करू शकता. आजही बरेच लेखक हे पूर्ण वेळ लिखाण करत आहेत आणि बक्कळ पैसे कमावत आहेत.
दूसरा उद्योग – रिसेलर ( reseller ). कुठल्याही वस्तूची तुम्ही रिसेलिंग करू शकता. ऑनलाइन रिसेलिंग सध्या जोरात चालू आहे. यात तुम्हाला एक रूपयाही खर्च नाही आणि भांडवलाचीही गरज नाही.
तुम्ही एखाद्या उत्पादकाशी संपर्क करून त्याच्या उत्पादनाची संपूर्ण माहीती ( किमतीसह ) घ्यायची आणि तीच माहीती ( मूळ किमतीत तुमचा नफा मिळवून ) सोशल मीडियावर टाकू शकता. सोशल मीडिया हे उद्योगासाठी खूप उपयोगी माध्यम आहे. ज्यांना तुम्ही पोष्ट केलेले उत्पादन आवडेल ती लोकं तुमच्याशी त्याविषयी चौकशी करुन ती वस्तु तुमच्याकडून विकत घेऊ शकतात.
अर्थातच ती वस्तु तुमच्याकडे नाहीये तर उत्पादककडे आहे! ग्राहकाकडुन वस्तूचे पैसे आगाऊ घेऊन ती ऑर्डर तुम्ही उत्पादकाकडे पाठवायची ( आपला नफा आपल्याकडे ठेऊन ). उत्पादक ती वस्तु ग्राहकाने दिलेल्या पत्त्यावर पाठवतो. अश्या प्रकारे या उद्योगात आपला एक रुपयाही खर्च नाही झाला.
या उद्योगात तुम्हाला जागेची गरज नाही,फक्त तुमचा वेळ थोडा जास्त खर्च होतो, पण हा उद्योगही तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो.
तिसरा उद्योग – तुम्ही चित्रकार असाल तर तुम्ही तुमचे चित्र विकू शकता अर्थात यात तुम्हाला थोडाफार खर्च/भांडवल लागू शकतो जसे की रंग, कागद व ईतर साहीत्य.
पण एकदा का तुमची चित्रकलेची जाहीरात चांगल्या प्रकारे झाली तर तुम्ही या उद्योगातून चांगल्या प्रकारे कमाई करू शकता. तुम्ही तुमच्या कलेला उद्योग बनवू शकता आणि त्यात काहीच गैर नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
भाषांतर – हाही उद्योग शून्य भांडवलाचा आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त भाषा येत असतील तर आणि मराठीचं इंग्रजीत किंवा इंग्रजीचं मराठीत किंवा अजून कुठल्याही एका भाषेचं दुसर्या भाषेत भाषांतर करता येत असेल तर तुम्ही यातूनही चांगली कमाई करू शकता.
आजकाल पुस्तकांच भाषांतर करण्याची खूप गरज आहे. एका भाषेचं पुस्तक दुसर्या भाषेत करून देऊन तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.
अश्या बर्याच कल्पना आहेत उद्योगाच्या ज्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज नाही किंवा कमीत कमी भांडवलात तुम्ही हे उद्योग सुरू करू शकता.
गरज आहे ती फक्त अश्या कल्पना वास्तवात उतरवण्याची! आपल्या सभोताली बघायचं, निरीक्षण करायचं, लोकांशी बोलायचं, चर्चा करायची, वाचन करायचं; यातून तुम्हाला उद्योगाची कल्पना सुचू शकते आणि ती तुम्ही वास्तवात उतरवू शकता.
नोकरीमध्ये तुम्हाला महिन्याच्या शेवटी एकाच दिवशी एकच रक्कम मिळते; पण उद्योगात तुम्हाला तासाला, दिवसाला, आठवड्याला कमाई होते.
चला तर मग उद्योगाला सुरुवात करूया!!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.