या योगासनांच्या मदतीने दूर करा ऍसिडिटी । सर्व आसने पहा चित्रांसह

अनियमित जीवनशैलीमुळे सगळ्यात जास्त त्रास होतो तो ऍसिडीटीचा!!

खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळेसुद्धा ऍसिडिटी वाढते. ऍसिड रिफ्लेक्स म्हणून ओळखली जाणारी ही ऍसिडिटी पोटात जास्त ऍसिड तयार झाल्यामुळे होते.

पोटाच्या मागच्या बाजूने एसोफैगसमधे या ऍसिडचा प्रवाह वाहतो ज्याला ऍसिड रिफ्लेक्स म्हणतात. हे जास्त झालेले ऍसिड घशाशी येते. चिडचिड, जळजळ, पोटात दुखणं अशी लक्षणं जाणवतात. खाण्याच्या चुकीच्या सवयीबरोबरच अन्न नीट चावून न खाल्यामुळे आणि पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे तसेच धुम्रपानामुळे ही ॲसीडिटी उद्भवू शकते.

ऍसिडीटी किंवा आम्लपित्त कमी करण्यासाठी अनेक औषधं बाजारात उपलब्ध आहेत. पण नैसर्गिक जीवनशैली ही आरोग्यासाठी चांगली असते. म्हणूनच काही योगासनं जर रोज केली तर ऍसिडिटी त्रास आपण टाळू शकतो.

या योगासनांमुळे पोटात, आतड्यात रक्ताभिसरण वाढून पचन सुधारतं. आतड्यामधील हालचाल सुधारून वायुनिर्मिती होते ज्यामुळे पोटावरचा ताण कमी होतो. पचनसंस्था मजबूत होते.

चला तर मग जाणून घेऊया ॲसिडिटी कमी करण्यासाठी साधी सोपी आसनं.

1) पश्चिमोत्तानासन

ओटीपोटासाठी उत्तम असणारं हे आसन पचन समस्यांना दूर करतं पोटातली चरबी कमी करायला मदत करतं.

योगा मॅट वर बसून पाय सरळ रेषेत ठेवा सुरुवातीला हात बाजूला ठेवा.

पाठीचा कणा ताठ असल्याची खात्री करून हात समोर घ्या आणि पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

सुरूवातीला काही सेकंद या आसनाची प्रॅक्टिस केल्यावर एक ते तीन मिनिटापर्यंत या स्थितीत राहण्याची सवय लावून घ्या.

सावकाश मूळ स्थितीकडे परत या आणि रिलॅक्स व्हा.

पश्चिमोत्तानासन

2) कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायामामुळे पचनाचे विकार पोटाची चरबी आणि पोटाशी संबंधित इतर काही विकारांच्या समस्या असतील तर त्या दूर होतात.

योगा मॅटवर पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. डोळे मिटून गुडघ्यांवर तळवे ठेवा.

दीर्घ श्वास घेऊन वेगाने श्वास बाहेर सोडा.

लयबद्ध श्‍वासोच्छ्वास करायची ही प्रक्रिया प्रॅक्टिसने जर 15 ते 20 मिनिटापर्यंत सुरू ठेवता आली तर ॲसिडिटीची समस्या कमी झाल्याचं तुम्हाला जाणवेल.

कपालभाती प्राणायाम

3) मार्जारासन

मार्जारासनमुळे रक्ताचा प्रवाह सुधारतो. पचन करणाऱ्या अवयवांचा मसाज होतो.

मार्जारासनामुळे मणक्यावरचा ताणही दूर होतो, आणि शरीराला आराम मिळतो.

मार्जारासनासाठी हात आणि गुडघे जमिनीवर टेकवून मांजराप्रमाणे शरीर स्थिती ठेवावी.

श्वास घेताना हनुवटी वर उचलून पाठीची कमान करावी, काही मिनिटांनी पाठ पूर्ववत करावी.

ही क्रिया तीन ते पाच वेळा करावी.

मार्जारासन

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।