आता राहा आयुष्यभर टेन्शन फ्री….. अगदी लॉक डाऊन नंतरही

It’s not stress that kills you… It’s your reaction to it….

नमस्कार, मित्रांनो आणि मैत्रिणींनो….! कसे आहात सगळे …????

मला माहिती आहे खरंतर या, लॉकडाऊनच्या काळात असा प्रश्न विचारणे धाडसीपणा ठरेल.

सर्वत्र फक्त कोरोना चे थैमान…. संक्रमण आणि मृत्यूची टांगती तलवार, बेरोजगारी…

आणि या सर्व अनिश्चिततेचे सावट घेऊन घरात गेल्या अनेक दिवसापासून संयमाच्या कसोटीला पुरेपूर उतरून घरात जायबंदी झालेले आपण…..

कुणाला आपली नोकरी कायम राहील की नाही याची चिंता…. तर कुणाला पगाराची चिंता…. कुणाला पोरा बाळांच्या शिक्षणाची चिंता…. कुणाला कर्जाचे हप्ते कसे फेडायचे याची चिंता…. तर कुणाला संसाराच्या जमाखर्चाची चिंता….

परंतु आज मी तुम्हाला जी १ जबरदस्त टिप सांगणार आहे ती जर तुम्ही उपयोगात आणली तर या सर्व चिंतेतून आणि तणावातून तुम्ही कायमचे मुक्त व्हाल…..

Manachetalks

मित्रांनो, वास्तविक पाहता तणाव हा, एखादी घटना किंवा आजूबाजूचे लोक… त्यांचे वागणे.. यातूनच उत्पन्न होतो.

अर्थात, आजकालच्या आभासी जगात तर एखादे नोटिफिकेशन, एखादा ई-मेल.. लाइक्सची संख्या… या गोष्टीदेखील तणावा साठी पुरेशा ठरतात.. हा भाग निराळा ..!!🤦‍♀

सर्वसाधारणपणे तणाव हा एखाद्या घटनेशी संबंधित असतो मग ती भूतकाळातली असो अथवा भविष्य काळातली काल्पनिक घटना असो किंवा लोकांच्या वागण्याशी संबंधित असो…..

परंतु खरंतर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेला काहीच अर्थ नसतो…. थांबा-थांबा आता मी काहीतरीच बरळते असे समजू नका!!

आधी कसे ते समजून घ्या….

Event has no meaning… You gave meaning to that event !!

घटनेला अर्थ आपण देत असतो आणि तो सुद्धा कसा…. तर फक्त आपल्या मेंदूएवढा!!! कारण,

प्रत्येकाचं जग, केवढं तर ते फक्त त्याच्या मेंदू एवढं…..

लहानपणापासून आपण ज्या वातावरणात वाढलेले असतो… आपल्या परिसरातल्या श्रद्धा, रुढी-परंपरा… आजूबाजूच्या लोकांची मानसिकता..

पाप-पुण्य.. नैतिकता-अनैतिकता… सत्य-असत्यता या आपल्याला सांगण्यात आलेल्या संकल्पना आणि आपले वैयक्तिक अनुभव विचार, भावना, स्वभाव या सर्वांचा प्रभाव आपल्या, बिलीफ सिस्टीमवर होत असतो.

जस-जसे आपण मोठे होत जातो तसतसे आपली ही, बिलीफ सिस्टीम दृढ होत जाते…..

आपल्या ज्ञानेंद्रियांनी मेंदू पर्यंत पोचवलेल्या संवेदनांचा अर्थ आपला मेंदू लावतो खरा…

पण फक्त आणि फक्त आपल्या या विचारांच्या चौकटी पुरता …!

म्हणून एखादी घटना घडते परंतु त्याचे दहा लोकांनी लावलेले दहा अर्थ निघतात…

उदा. या लॉकडाऊन काळचंच घ्या ना…..

या काळात कित्येकजण आळसावलेले किंवा सुस्तावले आहेत आणि रडत रडत हातपाय गाळून दिवस ढकलत आहेत..

परंतु त्याच वेळी काही लोक असेही आहेत ज्यांना या मंदीमध्ये देखील संधी दिसते आहे. दिवसातील प्रत्येक क्षण न् क्षण पुरेपूर वापरून ते या संधीचे सोने करीत आहेत ….!!!!

तुम्हीसुद्धा त्यांच्यापैकीच एक होऊ शकता गरज आहे ती फक्त एक दृष्टिकोन बदलण्याची…

दृष्टी चा इलाज होऊ शकतो परंतु दृष्टिकोनाचा इलाज होऊ शकत नाही…

सर्वप्रथम तुम्ही तुमची मन:स्थिति बदला परिस्थिती आपोआपच बदलेल…

Your vision.. decides your decision….

फक्त गरज आहे ती नेहमीच्या सरधोपट विचारसरणीची निसरडी पायवाट सोडून चैतन्यमय अशा सकारात्मक राजमार्गावर चालण्याची कारण ….

जब, बदलती है नजर… तब बदल जाते है नजारे…

तुम्हाला तुमच्या आयुष्याचे Worrier व्हायचे आहे की Warrior ….???? हे आता फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे!!

तुमचा एक दृष्टिकोन आयुष्याशी फाईट करायचे की फ्लाइट करायचे हे ठरवणार आहे….

वाईट दशेपासून स्वतःला वाचवायचं असेल तर हीच वेळ आहे आपल्या विचारांना नवी दिशा देण्याची…

हा लेख वाचून झाल्यानंतर एका कागदावर तुम्ही तुम्हाला भेडसावणाऱ्या सर्व समस्या लिहून काढायच्या आहेत.

आणि त्या सर्व समस्यांवर आत्तापर्यंत ज्या दृष्टीने कधीच विचार केला नव्हता त्या दृष्टीने आता विचार करायचा आहे…

रोज सकाळी फक्त काही वेळ या कृतीला द्यायचा… नक्कीच नवनवीन यशाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील…

हो पण एकच अट आहे की विचार करताना तो अत्यंत आनंदी आणि सकारात्मक मनाने करायचा.

आणि विचार करून झाल्यानंतर डोळे बंद करून ती समस्या आपण सोडवली आहे असे काल्पनिक चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचे.

नंतर ती गोष्ट सृष्टीवर सोडून द्यायची उर्वरित दिवसात आनंदी, उत्साही मनाने आणि सकारात्मक ऊर्जेने त्यादृष्टीने प्रयत्न करायचे!! हो, हे महत्त्वाचं बरंका!!

तुमची ही सकारात्मक उर्जा आनंदी आणि यशस्वी जीवन तुमच्याकडे नक्कीच खेचून आणेल….

लेख आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका कारण तुमचा प्रेमळ प्रतिसाद हीच माझी ऊर्जा…

लेखन: प्राची पाटील

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

6 thoughts on “आता राहा आयुष्यभर टेन्शन फ्री….. अगदी लॉक डाऊन नंतरही”

  1. Tumhi je mhanat ahat te satya ahe pan, how to start and when to start ethech majhi sagali swapn ani idia yevun thambatat, yasathi kay karave, tayari khup hote professionally planning pan sagale hote, fakt yes ani no, avadhech urate ani tithech pani murate, yasathi kahi sangu shakata ka, whatapp 9970911604

    Reply
  2. खुपच छान मॅडम तुमचे विचार खरच प्रेरणा देतात मला.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।