It means you’re not my real parents…

“….it means you’re not my real parents… मी तुमची मुलगी नाहीचए…” हे वाक्य सारखं कानात वाजत होतं. ती सतत कूस बदलत होती. “हे बघ, शांत रहा. सगळं उद्यापर्यंत नीट होईल,” मधूनच मनूच्या बाबाचं वाक्य आठवायचं. झोप काही लागत नव्हती. ‘मनू’ त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी. हुशार, समंजस आणि लाघवी. आत्ता महिन्यापूर्वीच तिला १८ पूर्ण झाले. आणि आज हे सगळं घडलं. ती उठली. मनूच्या रूममधला दिवा चालू होता. नाही-नाही त्या असंख्य शंका मनांत डोकावून गेल्या. तिने हलकेच दार इघडलं. मनू जुने फोटो काढून बसली होती. “काॅफी घेणार?” तिने विचारलं. “हं..” मनू म्हणाली.

मग काॅफी घेताना गप्पा सुरू झाल्या. “तुला आठवतं तू इथे खूप घाबरली होतीस..” “….आणि इथे आपण तिघांनी खूप धमाल केली होती.” एकेक फोटो आणि त्याच्या आठवणीत दोघीही रमत होत्या. “तुम्ही माझे आई-बाबा नाही, हे पटतंच नाही,” मनू म्हणाली.

खरंतर मनू आल्यापासून त्यांची ओळख ‘मनूचे आई, खरंतर आऊ-बाबा’ अशीच झालेली होती.

“मनू, तू घरी आलीस आणि आमचं जगच बदललं. सुरूवातीला जरा अवघड गेलं. पण नंतर तू नसलीस तरी तुझ्याचमधे असायचो आम्ही. बाबा तर तुझ्यामुळे खूपच बदलला….” हि म्हणतेय ते खरंय, मनूला वाटलं. आठवलं, बाबा तिच्यासाठी काहीही करायचा. कितीदातरी बाबाला हलवून हलवून उठवायची कॅाफी करायला लावायची. कधी मागे लागून ट्रेकला न्यायची. तर कधी त्याला कधीही न आवडणारी भाजी जबरदस्तीने खायला घालायची.

‘आई आहेस तू माझी!’ तो कधीतरी म्हणायचा आणि तिला हसू यायचं. आईही हवीच होती की आपल्याला नेहमी. काही बिनसलं की पळत येवून कुशीत शिरण्यासाठी. भिती घालवण्यासाठी आणि चिडण्यासाठी सुद्धा. “मनू, तुला आणण्यापूर्वी माझ्या मनांत एकच विचार होता. मी बाळाला जन्म देऊ शकणार नाही; पण माझा आई होण्याचा अधिकार कुणीच हिरावून घेवू शकणार नाही…” आई पुढे म्हणाली. “आऊ, तो आताही कुणीच घेणार नाही..” मनू म्हणाली आणि पळाली. पाठोपाठ आवाज येत राहिले, “ए बाबा, उठ…पटकन उठ..”  “आई आहेस का माझी?”…. आणि असेच काही……


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।