भारतीय इतिहासात बिरबल ओळखला जातो तो त्याच्या चतुराईसाठी.
चतुर बिरबल अकबराच्या अडचणी कश्या चुटकीसरशी सोडवतो यासारख्या गोष्टी ऐकत आपण मोठे झालो.
१५२८ मध्ये आताच्या उत्तर प्रदेश राज्यात असलेल्या कल्पि जवळ एका गावी महेश दासचा जन्म झाला. महेश दास म्हणजेच बिरबल.
इतिहासकारांच्या अभ्यासानुसार यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं टिकवनपूर हे बिरबलाचं जन्मगाव. गंगा दास आणि अनभा देवी या हिंदू ब्राम्हण परिवरतला हा तिसरा मुलगा.
हिंदी, संस्कृत, पर्शियन या तीनही भाषांवर त्याने प्रभुत्व मिळवलं होतं.
१५५६ ते १५६२ या काळात अकबराने बिरबलाला आपल्या दरबारात कवी म्हणून नियुक्त केलं होतं. अकबराच्या नवरत्नांमध्ये एक स्थान होतं बिरबलाचं.
१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेल्या स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो.
परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.
असं म्हंटल जातं की अकबराच्या साम्राज्याचा जेव्हा अस्त होऊ लागला तेव्हा अकबर बिरबलाच्या गोष्टी कानोकनी पसरायला सुरू झाल्या.
आणि हळूहळू या गोष्टी पूर्ण भारतभर प्रसिद्ध होऊ लागल्या.
अकबर – बिरबल
बिरबल म्हणजे जन्माने महेशदास….
हा हिंदीमध्ये भाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राम्हण उपजातीतला एक अत्यंत बुद्धिमान पण सामान्य माणूस होता.
त्या काळात भाट ही जात धनढ्यांची प्रशंसा करणारी म्हणून ओळखली जात होती.
असाच सुदैवाने बिरबल जेव्हा अकबर बादशहाच्या दरबारात पोहोचला तेव्हा आपल्या वाक्चातुर्याने आणि हजरजबाबी पणाने त्याने राजदरबारात आपले स्थान निर्माण केले.
असाही उल्लेख सापडतो की १५८६ साली पश्चिमोत्तर सीमाप्रांतात झालेल्या युद्धात बिरबलाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा बादशहा अकबराने दोन दिवस अन्न वर्ज्य केले होते.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.