१२ वी नंतर graduation साठी मी पुण्याला आलो. त्यानंतर काही वर्ष पुण्यातच job केला. त्यावेळेस पुणे ते सतारा प्रवास नित्याचाच झाला होता. या इतक्या वर्षांच्या प्रवासामधे तऱ्हे तऱ्हेचे लोक भेटले. प्रवास अडीचच तासाचा असायचा पण यातुन खुप सारे लाख मोलाचे चांगले वाईट अनुभव मिळत गेले.
असंच एकदा साताऱ्याहून पुण्याला जाण्यासाठी बस मधे बसलो होते. शेजारी एक बाई आणि तिचा २-३ वर्षाचा मुलगा माझ्याशेजारी येऊन बसले. त्या बाईकडे ३ पिशव्या आणि ते मुल… एव्हडं सगळं सांभाळत प्रवास सुरू झाला. जशी बस सुरू झाली तशी त्या मुलाची वळवळ सुरू झाली. सारखा तो ओरडायचा, किंचाळायचा. त्या बाईने खुप समजुत काढली, त्याच्यावर रागवली, ओरडली तरी त्याचावर काहीच परीणाम होत नव्हता. तो मुलगा ५-५ मीनटाला काहीतरी खायला मागायचा ते खायला दिले की एक-दोन घास खायचाआणि लगेच पाणी मागायचा. ते झालं कि दुसरं काहीतरी खायला मागायचा. थोडसं तिखट लागलं की भोकाड पसरायचा. बाईला त्या मुलाने पार नको नको करून सोडलं होतं. हे सगळं मी पाहत होतो. मनाशीच म्हटलं कीती वात्रट कार्टा आहे. २-४ फटके द्यायला पाहीजेत, असा विचार करत कानात head phone टाकुन गाणी ऐकत बसलो.
पाचवड गेलं भुईंज क्रॉस केलं तरी ‘साहेबांचे’ नखरे काही संपत नव्हते. शिरूर पाशी आलो तसं साहेबांचा मोर्चा माझ्या मोबाइल कडे वळला. त्यांना आता माझा मोबाइल हवा होता. माझा मोबाइल यापुर्वी अशाच एका छोट्या सैताना ने शहीद केला होता. त्यामुळे मी त्याला माझा मोबाइल देण्याची risk घेतली नाही. मोबाईल मिळणार नाही हे समजल्यावर मात्र साहेबंचा EGO HURT झाला. त्यांन्नी डायरेक्ट लोटांगण घालायला आणि हात पाय चोळायला सुरवात केली. मग शेवटी मी एक proposal ठेवलं. त्याला बोललो, खिडकी शेजारी बसायला जागा देतो पण शांत बस म्हणून. Deal final झाली, तो मुलगा खिडकी पाशी आला. थोडा वेळ शांत बसला परत त्याचा दंगा सुरू झाला. माझं डोकं त्याच्या कालव्यानं बधिर झालं होतं. म्हटलं इस बला का अब कुछ तो करना पड़ेगा.
मी बाहेर पाहीलं तर खंबाटकी बोगदा जवळ येत होता. त्या मुलाला म्हटलं “शांत बस नाहीतर सगळीकडे अंधार करेन” तो मुलगा बोलला “ह्या, कायपन” बस्स, मग काय बोगद्याचा अंदाज घेतला आणि बोललो ‘बघ आता’. आणि count down start केलं १०,९……३,२,१ झाला अंधार…!!
तो मुलगा इतक्या जोरात ओरडत रडायला लागला की संपुर्ण बोगद्यात त्याचा आवाज घुमला. आमची करामत त्याची आई पाहत होती. आम्ही एकामेकांकडे पाहुनआणि साहेबांच्या अवताराकडे पाहुन खुप हसलो. बोगदा संपल्या नंतर तो मुलगा शांत बसला आणी हळुहळु झोपी गेला. तो झोपल्या नंतर आम्ही गप्पा मारु लागलो, तीचा नवरा त्यांच्याकडे व्यवस्थीत लक्ष देत नाही. तीलाच सगळं बघायला लागतं वगैरे वगैरे family drama जो आजकाल सगळीकडेच पहायला मिळतो. पण ती बाई जिद्दीने सगळं सांभाळत होती.
अंधार तर सगळ्यांच्याच जीवनात असतो. पण त्याला पाहुन रडायचं की प्रकाशासाठी लढायचं हे आपल्या हातात असत्ं. After all choice is ours…!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खूप खूप छान….आपल्यामुळे आमच्या ज्ञानात खूप मोठी भर पडत आहे…….