पुरुषांमध्ये ॲनिमियाचा धोका वाढतो आहे. पुरुषांमध्ये जरं ॲनिमिया असेल तर त्याची काही लक्षणे ही दिसून येतात.
या आजारात वेळेवर उपचार होणं खूप गरजेचं आहे.
शरीरात आयर्नच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो ,आणि हा आजार सध्या पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार ॲनिमियामुळे दरवर्षी साधारण 8 लाख लोक आपला जीव गमावतात.
आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला महिला आणि मुलांमध्ये ॲनिमिया हा आजार दिसून यायचा.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात मात्र असं लक्षात आलंय, ॲनिमिया हा आजार षुरुषांमध्ये फार मोठ्या वेगानं पसरतो आहे
पुरुषांमध्ये ॲनिमिया या आजाराचं प्रमाण 22% होतं ते वाढून आता 25 % झालं आहे.
पुरुषांमध्ये ॲनिमियाची कोणती लक्षणं आढळतात ते पाहू
1) लो टेस्टोस्टेरॉन लेवल
टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरुषांच्या लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी शरीरात आढळणारं संप्रेरक.
या संप्रेरकाची पातळी प्रौढ वयातल्या पुरूषांमध्ये कमी होण्याचं मुख्य कारण ॲनिमिया हेच असतं.
टेस्टोस्टेरॉन हे असं संप्रेरक आहे जे पुरुषांच्या सेक्स ड्राइव्हचे नियमन करते आणि शुक्राणू तयार करण्याचं ही काम करतं.
जर पुरुषांच्या शरीरात आर्यनची मात्रा भरपूर असेल तरच टेस्टोस्टेरॉनची निर्मिती व्यवस्थित होते.
2) गिळताना त्रास होणे
एका अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर त्याला डिसफॅगिया म्हणजेच गिळायला त्रास होतो.
डिसफॅगिया आणि ॲनिमिया चे आजार बहुतेक वेळा वृद्ध लोकांमध्ये दिसून येतात
पुरुषांमध्ये अशक्तपणा आणि डिसफॅगिया यांचं समीकरण जुळलं तर, GERD म्हणजेच गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीजचा धोका वाढू शकतो.
गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स हा असा आजार आहे ज्यात अन्ननलिकेच्या खालच्या भागात भाग जळजळ होते.
गिळताना घशात दुखते का? त्यामागची कारणे आणि उपाय
3) टिनिटस (Tinnitus)
टिनिटस म्हणजे कानात येणारा आवाज ज्याला कान वाजणे म्हणतात.
कानात येणारा आवाज हृदयाच्या स्पंदनांशी . आणि रक्तवाहिनीशी संबंधित असतो.
काही अडचणीमुळे दोन्ही कानांना रक्तपुरवठा जर कमी झाला तर दोन्ही कानात आवाज येतात.
ॲनिमियामुळं येणाऱ्या अशक्तपणामुळे शरीरात ही टिनिटसची समस्या उद्भवू शकते.
4) केसगळती
काही व्यक्तींमध्ये एखाद्या शस्त्रक्रियेनंतर लोहाची कमतरता जाणवते.
ट्यूमर आणि मुळव्याधीची समस्या असेल तेंव्हा सुद्धा आयर्नची कमतरता असते.
शरीरात लोहाची म्हणजेच आयर्नची कमतरता निर्माण झाली की हिमोग्लोबिनची निर्मिती कमी होते, मग शरीराच्या विविध भागात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी पडतो.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून केसगळती सुरु होते.
5) प्रजनन क्षमतेत घट
एका संशोधनातून असं दिसून आलं आहे की पुरुषांच्या शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे शुक्राणूंची निर्मिती कमी होते, प्रजनन क्षमता घटते आणि अंडकोषाच्या पेशींचे नुकसान होते.
पुरुषांच्या शरीरात लोहाचं प्रमाण पुरेशा प्रमाणात असेल तरच अॅनिमियासारख्या धोकादायक आजारापासून तुमचा बचाव होतो.
दारूमुळे किंवा एखाद्या शस्त्रक्रियेमुळे जेव्हा पुरुषाच्या शरीरातील रक्त कमी होतं तेंव्हासुद्धा त्याचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो.
पुरुषांच्या अॅनिमियाकडे, त्यांच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे वेळीच अॅनिमिया रोखा किंवा वेळेवर उपचार घ्या.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.