विकासाचा अर्थ आपल्या आचरणातून बदलवून टाकणारे डॉ. विकास आमटे

ही गोष्ट आहे अशा एका माणसाची, ज्याचा गोष्टी सांगण्यावर नाही तर गोष्टी घडवण्यावर विश्वास आहे. ज्याचा वारसाच मुळी गोष्टी घडवणाऱ्या माणसांचा आहे! माणसातल्या माणूसपणाची ओळख सांगणाऱ्या गोष्टी. माणसातल्या माणसाशी नातं जोडणाऱ्या गोष्टी. त्यांचं नातं शब्दांशी नाही तर ते आहे कृतीशी.

म्हातारपण हा आयुष्याचा शेवट नसतो हे दाखवून देणाऱ्या पेंडसे आजी…

म्हातारपण हा आयुष्याचा शेवट नसतो

कुटुंबांमधून म्हाताऱ्या माणसांची हेळसांड बघतो आहोत…. त्याच म्हाताऱ्या माणसांना आपल्या मुलांसमोर लाचार, एकाकी आपल्या शेवटाची वाट बघतांना बघतो आहोत.. त्या सगळ्यात स्वतः सन्मानाने जगून दुसऱ्यांचे आयुष्य निर्लेप मनाने सोपे करणाऱ्या या म्हाताऱ्या व्यक्तीला माझा, तुमचा आपल्या सगळ्यांचा सलाम नको? मार्ग शोधणाऱ्याला नक्की मिळतो.. आपल्यातच आहेत हीदेखील उदाहरणे, जी बघून जगण्याची उमेद पक्की होते, आयुष्य सुंदर आहे यावर विश्वास बसतो.. तुम्हाला नाही वाटत असं?

आनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट

प्रेरणादायी

अवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं.. तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला? 

समाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे!! कसे ते वाचा..

आनंदी राहणे

कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.

उत्साह साजरा करता करता तो उन्मादाच्या पातळीवर जातो तेव्हा…

उत्साह

आपल्या आनंदाशी जोडलेले सण, समारंभ, उत्सव साजरे करतांना त्यातले आपल्याला पटेल, रुचेल, पेलवेल आणि परवडेल ते ठामपणे स्वीकारण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास काय हरकत आहे? हास्यास्पद, कालबाह्य सण-समारंभ केवळ दुसऱ्यांसाठी म्हणून साजरे करणे आता सोडून द्यायला हवे.

भिक्षेकऱ्यांना माणुसकीच्या मुख्य प्रवाहात आणणारे पुण्याचे डॉ. अभिजित सोनावणे

डॉ. अभिजित सोनावणे

देह मळला, थकला. त्याची तिला फिकीरही नव्हती. पण स्वतःशी असलेलं नातं मात्र ती विसरली नाही. तोंडी पाठ असलेली एक प्रार्थना ती सतत म्हणे. काय होतं त्या प्रार्थनेत? स्वत:साठी केलेलं एखादं मागणं? नाही, तर त्यात होती विश्वप्रार्थना..”देवा सगळ्याचं भलं कर. सगळ्यांना सुखात ठेव.”

पालकत्वाच्या शाळेतील हे पहिले-वहिले धडे: या रागाचे करायचे तरी काय?

सुजाण पालकत्व

राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे पण आपल्याला राग आल्यानंतर आपण त्याच्या किती प्रमाणात आहारी जातो.. त्यात वाहवत जाऊन स्वतःला किंवा इतरांना नुकसान करणारी कृती करून बसतो. हे आपल्या हातात असतं. रागाला आपण किंवा आपल्या जवळचे इतर लोकं कसा प्रतिसाद देतात त्यावर पुढच्या वेळी पुन्हा ते हत्यार वापरायचं की नाही हे ठरतं.

अनावश्यक विचारांना आवर कसा घालावा?

अनावश्यक विचारांना आवर कसा घालावा?

अनेकवेळा आपण स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असतो. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मन बोलायला सुरवात करते. त्यात भूतकाळातल्या काही गोष्टी असू शकतात, काही वर्तमानकाळातल्या तर काही भविष्यातल्या. या विचारांना कोणताही नियम नसतो ना कुठला निर्बंध.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।