रेल रोको इन ‘आमची मुंबई’….

Rail Roko in Aamchi Mumbai

चला नेहमीची ट्रेन आली. देशपांडेला आज विंडोसीट मिळाली वाटतं. म्हणजे दोन स्टेशननंतर आपल्याला मिळेल. च्यायला…. हे काय …?? इथे कसा सिग्नल मिळाला हिला?? पुढचे स्टेशन तर जवळ आलंय आणि बाजूच्या फास्ट ट्रॅकवर शताब्दीही थांबलेली दिसते…. अरे बापरे …!! हे काय सगळी माणसे ट्रॅकवरून चालत जातायत.

लग्न

Marriage

“हो …तरीही शेवटी लग्न तुला करायचे आहे. संसार तुला करायचा आहे. त्या कुटुंबात तुला राहायचे आहे. मग ती माणसे कशी आहेत?? त्यांचा स्वभाव कसा आहे ?? नवऱ्याला काय आवडते ?? तो आपल्याबरोबर संसार करण्यास सक्षम आहे ना ?? या गोष्टी पाहायला नकोत का ??”  सौ. चा सूर आता समजावणीचा झाला.

आमचा हरी

Funaral

लग्नकार्याची लगबग आपल्याला चांगलीच परिचित असते पण आमचा हरी धावून जायचा कोणत्याही अंत्ययात्रेला!! आणि घरच्यांना मोठा आधार व्हायचा कारण हा, सगळे सोपस्कार पूर्ण करूनच तिथून निरोप घ्यायचा….

तिची ही होळी

sas banhu naughty

स्वयंपाकघरात भांडी धुताना अचानक मागून हिच्या कमरेभोवती हाताचा विळखा पडला आणि कानाशी चिरपरिचित आवाज आला “हॅपी होळी”. नवऱ्याचा आवाज ऐकून ती मोहरून उठली. हळुवारपणे त्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाल फासला. खरेच यावर्षीची होळी तिच्यासाठी अविस्मरणीय होती.

सिझरिंग

Cesarean Delivery

“अरे मित्रा…. हल्ली तुला माहीत नाही का आपल्याला पाहिजे तेव्हा डिलिव्हरी करायची पद्धत सुरू झालीय…?? तिने आमच्याकडे डोळे मिचकवत म्हटले “हल्ली नैसर्गिक डिलिव्हरीची कोण वाट पाहत नाही. चांगला मुहूर्त असेल तर दोन तीन दिवस आधीच सिझरिंग करून मोकळे होतात. काहीजण त्यातही ज्योतिष्याकडून मुहूर्त काढून येतात.

“होळी”

holi in konkan

आज शंकर खूष दिसत होता. त्याचे कारण आम्हा सर्वाना माहीत होते. होळी जवळ आली की शंकर गावी जायच्या कल्पनेनेच खुश असायचा. नेहमीप्रमाणे त्याने आधीच रजा मंजूर करून घेतली होती. अर्थात नाही केली असती तरीही तो बिनपगारी रजा घेऊन गेला असता याची खात्री होतीच.

आहेर

gift box

“अरे खूप प्रेमाने आणि आपलेपणाने इतका मोठा आहेर दिला होता त्यांनी मला. मी बऱ्याच ठिकाणाहून कर्ज काढले होते या लग्नासाठी आणि म्हणून विचारतील त्यांना सांगत होतो जमल्यास कॅश घाला गिफ्ट देऊ नका. त्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच लोकांनी कॅश दिली.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।