निरोप….
जसं समजायला लागतं तसं निरोप आपल्या आयुष्याचा भाग बनुन जाताे…. प्रत्येक वळणावर भेटणारा…. कधी त्या निराेपाला वियाेगाबरोबर भविष्यातल्या सुखाची सोनेरी किनार असते, तर कधी ताे सोबत आणतो काटेरी दु:ख…. आयुष्यभर बोचत राहणारं..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
जसं समजायला लागतं तसं निरोप आपल्या आयुष्याचा भाग बनुन जाताे…. प्रत्येक वळणावर भेटणारा…. कधी त्या निराेपाला वियाेगाबरोबर भविष्यातल्या सुखाची सोनेरी किनार असते, तर कधी ताे सोबत आणतो काटेरी दु:ख…. आयुष्यभर बोचत राहणारं..
काय काय गिफ्ट मिळणार याचा आनंद, मेहंदी ची तयारी, नवीन ड्रेसची खरेदी, विशेष बनवलं गेलेल जेवण, आत्या, काका, मामा, आम्ही सर्व भाऊ बहिण सर्वांच एकञ जमणं, काेण काय काय देणार यावरून सगळ्यांनी एकमेकाला चिडवणं, घर भरवून टाकणारे हास्याचे कारंजे आणि बरंच काही….. श्रावणाचे सगळे रंग या एकाच दिवसात दिसायचे !!!
पण बाबा गेल्यावर पहिलयांदा मला एकटेपणा आणि पाेरकेपणा यातला फरक समजला, खूप जाणवला. एकटं वाटणं किंवा असणही आणि पोरकं असणं यात जमिन आसमानचा फरक आहे, म्हणजे आई आहे माझ्यासाठी पण तरीही वङील नसल्यावर जाे पाेरकेपणा जाणवताे ना ताे खूप भयंकर असतो, शब्दात न व्यक्त करता येणारा.