तांदळाऐवजी बाजरीचा जेवणात समावेश केला तर तुमच्या मुलाच्या वाढीस चालना मिळू शकते का? शास्त्रज्ञांनी यावर केला कसून अभ्यास.
तुमच्या मुलांच्या जेवणात तांदळाऐवजी बाजरी वापरली तर काय होतं? आणि त्याचा मुलांच्या वाढीवर किती परिणाम होतो? हे शोधण्यासाठी एक संशोधनच केलं गेलं.
खरं तर बाजरी प्राचीन काळापासून भारतीय आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे.
पण हळूहळू या बाजरीची जागा तांदूळ, गव्हाचं पीठ अशा धान्यांनी घेतली.
अलीकडच्या काळात मात्र अचानक बाजरीला मागणी वाढून या बाजरीचं पुनरागमन झालं.
हे सुपरफूड तिच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलं.
आणि मग बाजूला पडलेल्या या धान्यांचं पौष्टिक मूल्य निश्चित करण्यासाठी अनेक तज्ञांनी त्यावर रीतसर अभ्यासच केला.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असं आढळून आलं आहे की जेवणात भाताच्या ऐवजी जर बाजरीचे पदार्थ दिले तर २६ ते ३९% नी मुलं आणि किशोरवयीन मुलांची वाढ चांगली होऊ शकते.
यासाठी ८ गटात संशोधन करण्यात आलं
हे सगळे ८ अभ्यासगट वेगवेगळ्या वयोगटांवर आधारित होते जसं की लहान मुलं, प्री-स्कूल, शाळेत जाणारी मुलं आणि किशोरवयीन.
या सगळ्यांना भाताऐवजी बाजरीचे पदार्थ वाढले.
त्यानंतर जवळजवळ ४ वर्ष त्यावर अभ्यास केला गेला त्याची निरीक्षणं नोंदवली.
या निरिक्षणांची तुलना पारंपारिक जेवणात भाताचा आहार घेत असलेल्या मुलांशी करण्यात आली.
असं लक्षात आलं की बाजरीमुळे या वयोगटातील मुलांच्या वाढीला चालना मिळते.
त्याचबरोबर कुपोषणाच्या गंभीर समस्यांवरही बाजरी मात करायला मदत करू शकते हे मत सुद्धा संशोधकांनी नोंदवलं आहे.
संशोधनात लक्षात आलं की ज्या मुलांना बाजरीचं जेवण दिलं गेलं, त्यांच्या उंचीमध्ये २८.२% , वजनात २६%, दंडात ३९% आणि छातीवर ३७,% वाढ झाली.
म्हणूनच तज्ञ म्हणतात की बाजरीचा समावेश असणाऱा आहार उंची आणि वजन सुधारण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.
कॅल्शियम समृद्ध नाचणी
८ गटांपैकी बहुतेक गटात बाजरी (नाचणी) वापरली गेली.
एका गटात ज्वारी आणि दोन गटात बाजरी (फिंगर, पर्ल, फॉक्सटेल, लिटिल आणि कोडो बाजरी) यांचं मिश्रण केलं.
इतरांच्या तुलनेत फिंगर नाचणी अतिशय अनोखी ठरली.
ती कॅल्शियमने समृद्ध आहे, दुधापेक्षा जवळजवळ तिप्पट कॅल्शियम नाचणीत आहे.
ज्यातून साधारणपणे 28% कॅल्शियम शरीर राखून ठेवतं.
त्याचबरोबर बाजरीचा विचार केला तर त्यातही, मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात, ज्यामुळे वाढीला चालना मिळते.
या संशोधनात तज्ञांच्या असं ही लक्षात आलं की तांदूळ किंवा गहू यासारख्या शुद्ध धान्यांच्या तुलनेत बाजरीत जास्त प्रमाणात प्रथिने असतात.
बाजरी सिस्टीन आणि मेथिओनाइन सारख्या सल्फरयुक्त अमीनो ऍसिडनं देखील समृद्ध आहेत हे घटक वाढीसाठी उपयुक्त ठरतात.
त्याशिवाय, बाजरीत कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम असे पोषक घटक सुद्धा असतात.
तांदळाच्या ऐवजी बाजरी घेताना, त्यात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समतोल राखण्यासाठी भाज्या, कडधान्यं, फळं यांचा समावेश करून त्यात विविधता आणणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे मुलांच्या वाढीला व्यवस्थित मदत होईल.
संशोधनाअंती, तज्ञांनी पोषण कार्यक्रम विकसित करणे आणि माध्यान्ह भोजन योजनेत बाजरीचा समावेश, माता आणि बाल आरोग्य कार्यक्रमात बाजरीचा आवर्जून वापर अशा अनेक धोरणात्मक शिफारशीही सांगितल्या आहेत.
वेगवेगळ्या वयोगटांसाठी डिझाइन केलेल्या जेवणात ही बाजरी समाविष्ट करण्याचं देखील तज्ञांनी सुचवलं.
मुलांच्या वाढत्या वयाला पोषक ठरणारी ही बाजरी टाइप-2 मधुमेहाचं व्यवस्थापन करायला आणि एकूणच कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायला, लठ्ठपणा आणि लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामध्ये ही मदत करते.
किंचित कडवट होणारी बाजरीची भाकरी संक्रातीच्या आधल्या दिवशी फक्त भोगीदिवशी तीळ लावून खाल्ली जाते, पण बाजरीचे हे आश्चर्य कारक फायदे जाणून घेतल्यानंतर आहारात वेगवेगळ्या पद्धतीने बाजरी वापरली पाहिजे हे लक्षात येतं.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.