बी वेनम थेरपी म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

जाणून घ्या मधमाशीच्या विषामुळे होणारे फायदे.  बी वेनम थेरपी म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

लेखाचे शीर्षक वाचून चकित झालात ना?

एकीकडे मधमाशीचे विष असे म्हटले आहे आणि दुसरीकडे त्याचे फायदे जाणून घ्या असे म्हटले आहे. परंतु हे खरे आहे. ‘बी वेनम’ म्हणजेच मधमाशीचे विष याचे आरोग्याला काही उपयोग होतात.

खरेतर मधमाशीच्या डंखाला आपण सारेच घाबरतो, मधमाशी चावली तर भयानक वेदना होणे, पुरळ येणे असे त्रास तर होतातच परंतु विषबाधेची देखील भीती वाटते.

परंतु हेच मधमाशीचे विष खरे तर औषधाप्रमाणे काम करते असे आढळून आले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या गुडघेदुखीवर मधमाशीच्या विषाचा म्हणजेच ‘बी वेनम थेरपी’चा औषधासारखा उपयोग करून घेतला. तेव्हापासून ही उपचारपद्धती चर्चेत आली.

या थेरपीद्वारे त्यांची गुडघेदुखी जवळजवळ ८० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे असा त्यांचा दावा आहे. निसर्गोपचार तज्ञ असणारे औरंगाबादचे डॉक्टर नांदेडकर यांनी हे उपचार केले आहेत.

नेमकी काय आहे ‘बी वेनम थेरपी’?

आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नावावरुनच लक्षात येते की मधमाशी पासून म्हणजे तिच्या चाव्यापासून मिळणारे हे विष आहे. याचे काही आजारांवर औषध म्हणून खूप फायदे होतात. तसेच त्याचे काही साईड इफेक्टही असतात.

मधमाशीचे विष म्हणजे नेमके काय?

मधमाशीचे विष हे एक रंगविहीन, ऍसिडिक द्रव असते.

मधमाशा त्यांच्यावर संकट आले आहे असे वाटले की डंख मारतात त्यावेळी त्यांच्या दंशातून हे द्रव बाहेर पडते. या द्रवपदार्थात निरनिराळे एन्जाइम, शुगर, मिनरल आणि अमायनो ऍसिड असतात.

२६ प्रकारच्या अमायनो ऍसिडचे संयुग असणारे मेलीटिन मधमाशीच्या विषामध्ये असते. हे मेलीटीन anti-inflammatory, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल गुणधर्म असणारे असते असे आढळून आले आहे.

मधमाशीच्या विषाचा कसा उपयोग केला जातो?

काही आजार आणि वेदना यांवर उपाय म्हणून मधमाशीच्या विषाचा वापर करून औषधे बनवली जातात. मधमाशीच्या विषापासून बनवलेल्या औषधांना हल्ली खूप लोकप्रियता जरी मिळत असली तरी ही औषधे अगदी पूर्वीपासून वापरात आहेत.

मधमाशीच्या विषाचा तयार अर्क बाजारात मिळतो. त्याचप्रमाणे हा अर्क वापरून तयार केलेले सप्लीमेंट, मॉइश्चरायझर आणि सिरम बाजारात तयार मिळतात.

ही औषधे मिळणाऱ्या विशिष्ट दुकानांमधून किंवा ऑनलाइन स्टोअर मधून अशी औषधे खरेदी करता येऊ शकतात.

प्रत्यक्ष मधमाशांचा उपयोग करून ॲक्युपंक्चर किंवा बी स्टिंग थेरपी या पद्धतीने देखील मधमाशीच्या विषाचा औषध म्हणून वापर करता येतो. ही पद्धत वापरताना प्रत्यक्ष मधमाशी आजारी व्यक्तीच्या त्वचेवर ठेवली जाते आणि मधमाशीच्या डंखामधून विषाचा वापर करून औषधोपचार केले जातात.

रुग्णाचे वय आणि आजारचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार किती मधमाशांचा वापर करायचा आणि किती वेळा दंश करायचा हे ठरवले जाते.

मधमाशीच्या विषाचे आरोग्यासाठी नेमके फायदे काय होतात? 

१. इन्फ्लंमेशन किंवा सूज कमी होण्यास मदत होते. 

कोणत्याही इन्फेक्शन अथवा आजारामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवाला अथवा अंतर्गत भागाला आलेली सूज कमी होण्यासाठी मधमाशीच्या विषाचा औषध म्हणून उपयोग होतो असे संशोधनाअंती आढळून आले आहे.

मधमाशीच्या विषामध्ये असणारे मेलीटिन हे द्रव्य यासाठी उपयोगी ठरते. परंतु खूप जास्त प्रमाणात जर हे द्रव्य शरीरात सोडले गेले तर त्यामुळे खाज येणे आणि वेदना असे साइड इफेक्ट होऊ शकतात.

२. संधिवाताचे दुखणे कमी होण्यास मदत होते. 

संधिवात म्हणजेच सांधेदुखी, सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना आणि येणारी सूज या सर्वांवर मधमाशीचे विष औषध म्हणून उपयोगी ठरते असे आढळून आले आहे. १२० लोकांवर केलेल्या ८ आठवड्यांच्या अभ्यासाअंती मधमाशीच्या विषामुळे संधिवाताचे दुखणे आणि वेदना कमी झाल्याचे आढळून आले आहे.

दुसऱ्या एका शंभर लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की नेहमीच्या औषधांच्या बरोबरीने जर मधमाशीच्या विषाचा औषध म्हणून उपयोग केला तर संधिवाताच्या रुग्णांना त्याचा जास्त फायदा होतो.

३. त्वचेच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

स्किन केअर प्रॉडक्ट बनवणाऱ्या अनेक कंपन्या आता मधमाशीच्या विषाचा त्यांची उत्पादने बनवताना प्रामुख्याने उपयोग करू लागल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची मॉइश्चरायझर, स्किन केअर क्रीम, सीरम्स  बनवताना मधमाशीच्या विषाचा प्रमुख घटक म्हणून वापर केला जातो आणि त्वचेच्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होताना आढळून आला आहे.

४. रोगप्रतिकारक शक्ती सुधारते

या विषयात केलेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की मधमाशीच्या विषामुळे  शरीरातील इम्यून सेल्स मध्ये वाढ होते. याचा फायदा ऑटो इम्युन कंडिशन्समुळे होणाऱ्या आजारांमध्ये होतो.

त्याचप्रमाणे ऍलर्जीमुळे होणारा दमा बरा करण्याचे देखील मधमाशीच्या विषाचा औषध म्हणून उपयोग होतो. यावरून असे लक्षात येते की एकूणच मधमाशीचे विष शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.

यावरून आपल्या असे लक्षात येते की मधमाशीच्या विषाचा अनेक आजारांमध्ये औषध म्हणून उपयोग होतो. परंतु  अजून याला थेट मान्यता मिळालेली नाही.

सध्या ही मधमाशीच्या विषाची औषधे पूरक औषधे अथवा थेरपी म्हणूनच वापरली जातात. वर नमूद केलेल्या आजारांवरील  इतर औषधांना पूरक म्हणून या औषधांचा वापर केला जातो.

तसेच मधमाशीच्या विषाचा शरीरातील अतिरेक घातक ठरू शकतो असे देखील आढळून आले आहे. त्यामुळे या पूरक औषधांचा प्रमाणात वापर करणे हे अतिशय आवश्यक असून यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

या थेरपीवर भरपूर प्रमाणात संशोधन सुरू असून भविष्यात त्याचा आणखी आजारांवर उपयोग होईल हे मात्र नक्की.

मित्रांनो ही वेगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “बी वेनम थेरपी म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.”

    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      मनाचेTalks फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalks/

      मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

      Reply
  1. खूप छान माहिती मिळाली
    धन्यवाद सर

    Reply
    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      मनाचेTalks फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalks/

      मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

      Reply
  2. मी मधपाळ आहे आणि मी लोकांनावर हा उपचार करतो बरे झालीत लोक माझेकडून मी पुणे

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।