सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: शतावरीची लागवड कशी करावी । शतावरी चे फायदे मराठी । शतावरी कल्प कसे घ्यावे । शतावरी पावडर । शतावरी लागवड कधी करावी
शतावरी एक अशी वनस्पती आहे की जिच्या सेवनामुळे असंख्य फायदे होतात.विशेषत: सर्व वयोगटातील स्त्रीयांना ही खूपच उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार ही एक दिव्य वनस्पती आहे. या लेखातून शतावरी बद्दल संपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. यातून तुम्हाला शतावरी बाबत शास्त्रीय माहिती मिळेल. आणि तुम्ही नक्कीच या बहुगुणी औषधीचा आपल्या आरोग्यासाठी आनंदाने लाभ घ्याल.
शतावरीची विविध नावे
- शास्त्रीय नाव Asparagus racemosus
- संस्कृत नाव शतावरी, नारायणी, शतपदी, अतिरसा
- हिंदी नाव सतमूली, सतावर
- मराठी नाव. शतावरी
- गुजराती नाव. शतावरी
- शतावरी वनस्पती कशी दिसते?
ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. हिची उंची १ते २ मीटर असून डोंगराळ भागात, कपारींवर ही वेल स्वरुपात उगवलेली आढळून येते. एकेका वेलीच्या मुळाशी मुळांचा घोस असलेला दिसतो.म्हणून हिला शंभर मुळे असलेली या अर्थाने शतमूली असेही नाव आहे. औषधी उपयोगासाठी या मुळ्यांचा मुख्यतः वापर केला जातो. शतावरीच्या मुळ्या ३० ते १०० सेमी लांब व अंदाजे २सेमि रुंद असतात. या मुळ्यांवर पिवळसर रंगाचे आवरण असते. औषधी वापर करताना हे आवरण काढून आतील मुळ्या वापरल्या जातात. या मुळ्या पांढऱ्या असून यांच्या मधोमध एक जाड धाग्याप्रमाणे तंतू असतो. मुळ्या ओल्या असतानाच हा काढता येऊ शकतो.एकदा का या मुळ्या वाळल्या की हा तंतू कडक होतो व काढता येत नाही. हिची पाने बारीक व सुंदर हिरव्या रंगाची असतात.
शतावरीचे फायदे
- गर्भवती महिलांना लाभदायक
- प्रसूतीनंतर स्तनांमध्ये दूध उत्पन्न होण्यासाठी
- शारीरिक कमजोरी कमी करण्यासाठी
- प्रजनन शक्तीची वाढ होण्यासाठी
- स्पर्म काऊंट व त्यासंबंधी दोष दूर करण्यासाठी
- सर्दी, कफ या अवस्थेत
- घसा दुखणे, आवाज बसणे अशा अवस्थेत
- सुका खोकला असल्यास
- श्वासासंबंधी रोगांमध्ये
- अपचन व पोटाच्या विकारांवर
- पोटात दुखण्यावर उपयुक्त
- डोकेदुखी व मायग्रेन मध्ये गुणकारी
- नाक व डोळे यांचे विकार दूर करणारी
- रातांधळेपणावर उपयोगी
- जुलाब होत असल्यास उपयुक्त
- युरीन इन्फेक्शनवर फायदेशीर
- मासिक पाळीच्या तक्रारींवर उपयोगी
- मूळव्याधीवर उपयुक्त
- ताप आला असता फायदेशीर
- आव पडणे, रक्त पडणे अशा आतड्यांच्या विकारात
- मूतखडा असल्यास गुणकारी
- डायबेटिस कमी करण्यासाठी
यावरून लक्षात येते की जवळपास सर्वच रोगांत शतावरी अतिशय उत्तम औषध आहे. तरीही मुख्यत्वे हिचा वापर स्त्रीयांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.
शतावरीचे उपयोगी भाग
- मुळ्या
- मुळ्यांचा काढा
- चूर्ण
- पाने
शतावरीचा उपयोग स्त्रीयांनी कसा करावा?
वाढीच्या वयातील मुलींना शतावरी चूर्ण किंवा कल्प एक कप दुधात मिसळून द्यावा. यामुळे शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होते. मासिक पाळी दरम्यान पोटात कळा येणे,वेदना होणे याकरिता शतावरी चूर्ण उपयोगी आहे. गर्भवती स्त्रीयांना तर शतावरी हे एक वरदान आहे. आईने दुधासोबत शतावरी कल्प सेवन केला तर गर्भाची वाढ खूप सुंदर पद्धतीने होते.
बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी हिचा उपयोग होतो म्हणूनच गर्भसंस्कारामध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये शतावरीचा आवर्जून उल्लेख केला आहे. प्रसूती नंतर भरपूर दूध येण्यासाठी शतावरी खूपच उपयुक्त आहे.शतावरीच्या मुळांची भाजी सुद्धा करतात.
ही औषधी गुणधर्म युक्त अशी आहे.प्रौढ वयातील स्त्रीयांना मेनोपॉज जवळ आला असताना खूप थकवा जाणवतो अशावेळी शतावरी हे रामबाण औषध आहे. हार्मोनल बदलांमुळे स्थूलता आली असता शतावरी वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते. यातील सोल्युबल फायबर मुळे शरीरातील फॅट कमी होते. शतावरीचा मुख्य उपयोग गर्भाशय, प्रजनन संस्थेचे अवयव, स्तन यावर होत असल्याने ती खरोखरच महिलांची सखी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शतावरीची लागवड कशी करावी?
आयुर्वेदीक कंपन्यांमध्ये औषधे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शतावरीची मागणी असते त्यामुळे आता शेतकरी व्यावसायिक दृष्ट्या शतावरी लागवड करतात. यासाठी त्यांना सरकार कडून मार्गदर्शन मिळते. यात अगदी मार्केटिंग पर्यंत प्रशिक्षण दिले जाते. भारतात मुख्यतः हिमालयात तसेच गंगा नदीच्या काठावरील मैदानी प्रदेशात आणि बिहार मध्ये शतावरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
घरच्या घरी कुंड्यांमध्ये आपण सहजपणे शतावरी उगवू शकतो. हिच्या नाजूक, सुंदर पानांमुळे बागेची,गॅलरीची शोभा वाढते. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा रस किंवा भाजी या स्वरूपात घरीच मिळू शकते.मुळ्यांपासून कल्प बनविणे सुद्धा अवघड नाही.
अशी ही बहुगुणी शतावरी तुम्ही नक्की औषधी स्वरुपात सेवन करु शकता. मात्र त्यापूर्वी आपल्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. हा लेख तुम्हाला आवडला असल्यास लाईक व शेअर करा.
असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.