जाणून घ्या भाजलेल्या जखमांवर करण्याचे घरगुती उपाय 

मित्रांनो, अपघात काही सांगून होत नाहीत. अशा अपघातात शरीराला अनेक प्रकारच्या दुखापती होतात. त्यापैकी एक दुखापत म्हणजे भाजणे. आग, वीज, केमिकल किंवा हानिकारक किरणे ह्यामुळे भाजणे हा अपघात होऊ शकतो. काहीवेळा अतिथंड पदार्थांमुळे देखील शरीर भाजू शकते त्याला ‘कोल्ड बर्न‘ असे म्हणतात.

आग किंवा तापलेले तेल, अतिशय तापलेले पाणी यांच्या संपर्कामुळे शरीर भाजू शकते. भाजल्यावर अतिशय तीव्र वेदना होतात. खूप जास्त ऊन, गरम वाफ किंवा एखाद्या रसायनाची रिएक्शन यांच्यामुळे देखील शरीर भाजू शकते. हानीकारक किरणांमुळे देखील भाजणे हा अपघात घडू शकतो.

बहुतेक वेळा भाजणे हा घरगुती अपघात असतो. गरम तेल, गरम पाणी किंवा गरम चहा, कॉफी इत्यादींच्या संपर्कात आल्यामुळे महिलांना भाजू शकते. काहीवेळा गॅस किंवा स्टोव्हच्या आगीमुळे असे अपघात घडू शकतात.
लहान मुले खेळताना किंवा मस्ती करताना अशा कोणत्याही गरम वस्तूच्या संपर्कात आले की अपघात घडू शकतात.

दिवाळीच्या वेळी उडवले जाणारे फटाके हेदेखील भाजण्याचे एक कारण आहे. विजेचा धक्का बसणे, अंगावर विज पडणे अशा पद्धतीने देखील एखादी व्यक्ती भाजू शकते. ऍसिडच्या संपर्कात येणे देखील भाजण्याला निमंत्रण देते.

भाजण्याच्या तीव्रतेवर उपचार अवलंबून असतात. अगदी साधे भाजले असेल तर घरगुती उपचारांनी बरे वाटते. आधी आपण भाजण्याचे कोण कोणते प्रकार आहेत ते जाणून घेऊया.

१. फर्स्ट डिग्री बर्नस् 

अशा पद्धतीचे भाजणे हे त्वचेच्या वरील आवरणापुरते असते. त्वचेच्या आवरणाचा सर्वात वरचा भाग जर भाजला असेल तर ते फर्स्ट डिग्री बर्नस् असतात. त्वचेचा वरील भाग लाल होतो आणि वेदना होतात. सामान्यता या जखमा घरगुती उपायांनी बऱ्या होतात. परंतु तीन इंचापेक्षा जास्त रुंद आणि खोलवर गेलेल्या जखमा असतील, तसेच डोळे कान नाक इत्यादी संवेदनशील अवयवांना भाजले असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२. सेकंड डिग्री बर्नस् 

त्वचेचे बाहेरील आवरण एपिडर्मिस आणि आतील आवरण डर्मिस ह्या दोन्हीला भाजले असेल तर त्या जखमा सेकंड डिग्री बर्नस् च्या असतात. अशा पद्धतीने भाजल्यास तीव्र वेदना, त्वचा लाल होणे, तेथे फोड येणे, सूज येणे अशी लक्षणे दिसतात. सांध्यांच्या भागात भाजले असेल हालचाली करण्यावर मर्यादा येते. अतिशय तीव्र वेदना होतात. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

३. थर्ड डिग्री बर्नस् 

अशा प्रकारच्या भाजल्यामुळे त्वचेची तीनही आवरणे भागली जातात. त्वचेत खोलवर जखमा होतात. अशी भाजलेली त्वचा काळी किंवा संपूर्णपणे पांढरी पडू शकते. त्वचा अतिशय कडक आणि रुक्ष होऊन जाते. त्वचेच्या आतील केसांची मुळे, स्वेट ग्लॅंड्स आणि नर्वस असे सर्व काही जळून जाते. थर्ड डिग्री बर्नस् अतिशय गंभीर मानल्या जातात. यामध्ये शरीरातील रक्ताभिसरण देखील कमी होते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय घटते.
७५ ते ९० % भाजल्यास बरे होण्याची अथवा जिवंत राहण्याची शक्यता कमी होते.

भाजण्याचे अपघात होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?

१. स्वयंपाक करताना गॅस अथवा स्टोव्हकडे संपूर्ण लक्ष द्यावे.

२. स्वयंपाक करताना जाड हातमोजे वापरावे.

३. लहान मुलांना स्वयंपाक घरात येऊ देऊ नये. गरम पदार्थ, गरम भांडी लहान पासून मुलांना लांब ठेवावे.

४. काडेपेटी, लाईटर इत्यादी वस्तू मुलांच्या हाती लागू देऊ नयेत.

५. स्वयंपाक करताना सैल कपडे वापरू नयेत.

६. शक्‍यतो घरात धूम्रपान करू नये. केल्यास गादी, पलंग इत्यादींपासून लांब रहावे.

७. बाथरूम मध्ये गरम पाण्याचा गिझर, गॅस गिझर असेल तर विशेष सावधगिरी बाळगावी.

८. सतत जागरूक राहून अपघात घडणे टाळण्याचा प्रयत्न करावा.

भाजले असल्यास काय सावधगिरी बाळगावी?

१. गंभीर स्वरूपाचे भाजले असल्यास आहे त्या स्थितीत त्वरित दवाखान्यात जावे.

२. भाजलेल्या ठिकाणी चिकटलेला कपडा किंवा इतर काही वस्तू ओढून काढण्याचा प्रयत्न करू नये.

३. भाजलेल्या ठिकाणी कोणतेही क्रीम अथवा मलम लावू नये.

४. तेथील त्वचेला हात लावण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

५. जास्त प्रमाणात भाजलेल्या व्यक्तीला खाण्यास काही देऊ नये तसेच खूप पाणी पाजू नये.

भाजण्याच्या तीव्रतेनुसार होणारे उपचार 

१. फर्स्ट डिग्री बर्नस् 

भाजणे साध्या स्वरूपाचे असेल तर झालेली जखम ताबडतोब पाण्यात बुडवावी. पंधरा मिनिटे शरीराचा भाजलेला भाग पाण्यात बुडवून ठेवावा. त्यामुळे वेदना कमी होऊन सूज देखील येणार नाही. भाजलेल्या त्वचेवर अँटिबायोटिक क्रीम किंवा एलोवेरा जेल लावावे. हलक्या हाताने पट्टी बांधून ठेवावे.

२. सेकंड डिग्री बर्नस् 

खोल जखम असल्यामुळे तरी डॉक्टरना दाखवावे. त्वचेचे प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता भासू शकते. हालचाली करण्यासाठी डॉक्टरांची मदत लागू शकते. हॉस्पिटल मध्ये जाणे आवश्यक असते. घरच्याघरी उपचार करू नयेत.

३. थर्ड डिग्री बर्नस् 

हे भाजणे गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे अजिबात वेळ न घालवता जखमी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावे. डॉक्टरांकडून उपचार, कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज भासू शकते. तातडीने उपचार सुरू होणे खूप आवश्यक असते.

भाजल्यावर होणाऱ्या वेदनांपासून आराम देणारे घरगुती उपाय 

लेखात वर दिलेल्या माहितीनुसार तीव्र स्वरूपाच्या जखमा असतील तर ताबडतोब दवाखान्यात जाणे आवश्यक आहे. परंतु सौम्य स्वरूपाच्या जखमा झाल्या असतील तर होणाऱ्या वेदनांपासून आराम देणारे उपाय खालीलप्रमाणे

१. बटाटा 

भाजलेल्या त्वचेवर बटाटा किसून त्याचा लेप लावावा. त्यामुळे आग होणे कमी होऊन थंडावा वाटतो.

२. तुळस 

भाजलेल्या जखमांवर तुळशीच्या पानांचा रस लावावा. त्यामुळे भाजल्याचे डाग कमी होण्यास मदत होते.

३. तीळ 

तीळ वाटून त्याचा लेप भाजलेल्या जखमांवर लावावा. त्यामुळे वेदना कमी होऊन थंडावा मिळतो तसेच नंतर पडणारे डाग नाहीसे होतात.

४. मोहरीचे तेल 

कडू लिंबाची साल आणि मोहरीचे तेल मिसळून लेप तयार करावा. तो भाजलेल्या त्वचेवर लावावा.

५. चुना 

भाजलेल्या ठिकाणी चुना लावल्यास बराच फरक पडतो. गरम तेल अथवा गरम पाण्यामुळे भाजल्यावर चुना लावल्यास फोड येत नाहीत. तसेच नंतर डागही पडत नाहीत.

६. टूथपेस्ट 

भाजलेल्या जखमांवर टूथपेस्ट लावल्यास देखील आराम मिळतो.

७. एलोवेरा जेल 

भाजलेल्या जखमांवर ताबडतोब एलोवेरा जेल लावावे. त्यामुळे आग होणे कमी होऊन संसर्गाचा धोका देखील कमी होतो.

८. दूध 

भाजल्यानंतर पटकन ती त्वचा दुधात बुडवावी. ताबडतोब हा उपाय केल्यास बराच फरक पडतो.

तर हे आहेत भाजल्यावर करण्याचे घरगुती उपाय. परंतु आम्ही तुम्हाला पुन्हा सांगत आहोत की जर सौम्य स्वरूपाच्या जखमा असतील तरच हे उपाय करा. जास्त भाजल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात जीवालाही धोका होऊ शकतो.

दररोजच्या साध्यासुध्या भाजण्यावर हे उपाय जरूर करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।