बुद्धिमान लोकांची सहा लक्षणे!!

तुम्ही कधी तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विचार केला आहे का? जितकी भावनिक बुद्धीमत्ता अधिक तितकी ती व्यक्ती श्रेष्ठ.

परंतु त्यासाठी भावनिक बुद्धीमत्ता म्हणजे काय ते आधी जाणून घेतले पाहिजे.

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय?

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या व इतरांच्या भावना नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे व सर्व समस्या उत्तम प्रकारे सांभाळणे.

जितकी एखादी व्यक्ती भावनिक दृष्टीने बुद्धिमान असेल तितके त्या व्यक्तीचे आयुष्य उमदे असेल व इतरांशी उत्तम संबंध राखता येतील.

आज आपण भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असणाऱ्या लोकांमध्ये काय लक्षणे असतात ते पाहणार आहोत.

१. स्वतःबद्दल आत्मविश्वास असणे 

भावनिक बुद्धिमत्ता उत्तम असणारे लोक स्वतःबद्दल चांगला आत्मविश्वास बाळगून असतात. ते कधीही कुठलाही निर्णय घेताना परत परत विचार करून गोंधळात पडत नाहीत. पहिल्यांदाच योग्य तो निर्णय घेतात. त्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.

२. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे 

कोणत्याही परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करणे, अथवा त्या परिस्थितीनुसार बदलणे हे भावनिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता योग्य ते निर्णय घेणे हे भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असण्याचे लक्षण आहे.

३. आवश्यक असेल तेथेच प्रतिक्रिया देणे 

भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असणारे लोक घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होत नाहीत. ते अतिशय संयतपणे व्यक्त होतात आणि आवश्यक असेल तिथेच प्रतिक्रिया देतात.

४. सदोष आणि नकारात्मक विचार बाजूला करणे 

भावनिक बुद्धिमान व्यक्तिचे हे प्रमुख लक्षण आहे. सदोष किंवा नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचार करता येणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता भरपूर प्रमाणात आहे असे समजते. अशा व्यक्ती आयुष्यात नेहेमी पोसिटीव्ह आणि आनंदी असतात.

५. नेहेमी पुढचा विचार करणे 

भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असणारे लोक नेहेमी आहे त्या परिस्थितीच्या पुढचा विचार करू शकतात. ते नेहेमी प्राप्त परिस्थितीचा तात्कालिक विचार न करता व्यापक विचार करतात. त्यामुळे ते जीवनात जास्त यशस्वी होऊ शकतात.

६. पटकन निर्णय घेणे 

कुठल्याही भावनिक प्रसंगात ज्या व्यक्ती पटकन निर्णय घेऊन वागू शकतात त्या व्यक्ती भावनिक दृष्टीने जास्त बुद्धिमान असतात. अशा व्यक्ती नेहेमी समोरच्या माणसाच्या भावनांचा विचार करून त्या अनुषंगाने चटकन निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना भरपूर मित्र परिवार लाभतो तसेच त्यांचे कामाबाबतीतील लोकांशी चांगले संबंध असतात.

तर ही आहेत भावनिक बुद्धिमान असण्याची लक्षणे. भावनिक बुद्धिमत्ता ही अशी गोष्ट आहे जी वाढवण्यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करू शकतो. भावनिक दृष्टया बुद्धिमान असण्यामुळे आपले आयुष्य जास्त आनंदी, विचारी आणि कणखर होऊ शकते. चला तर मग मित्रांनो, आपण आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करूया. लेखात दिलेल्या स्किल्स वर काम करून ते वाढविण्यासाठी प्रयत्न करूया.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “बुद्धिमान लोकांची सहा लक्षणे!!”

  1. भावनिक बुद्धिमत्तेची सहा लक्षणे छान सांगितली आहेत.मला वाटते ह्या सहाही लक्षणांची वाढ ही कुटुंबातील संस्कार व त्यांचे अनुकरणीय वर्तन यामुळे वृद्धिंगत होते.समाजात वावरताना अंधानुकरण न करता विवेकाने निर्णय घेऊन वागावे.तरच ती लक्षणे वाढण्यास मदत होईल.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।