प्लॅनेट नाईन- सौरमालेचा हरवलेला सुपरअर्थ (Planet Nine- Missing Superarth)
तो आहे तिकडे कुठेतरी, आपल्याकडे बघतो आहे पण त्याचं अस्तित्व सध्यातरी आपल्याला अज्ञात आहे.
तो सापडेल तेव्हा सापडेल, पण तो अस्तित्वात आहे, तो म्हणजे प्लॅनेट नाईन.
इतर ताऱ्यां भोवती जे ग्रह सामान्यतः सापडतात त्यात सुपर अर्थ ग्रह असतात. ज्या ग्रहांच वस्तुमान पृथ्वीपेक्षा जास्त पण आपल्या सौरमालेत असलेल्या आईस जायंट युरेनस, नेपच्यून पेक्षा कमी असते अश्या ग्रहांना सुपर अर्थ अस म्हणतात.