३१ मार्चच्या आधी कर वाचवण्याचे ७ पर्याय

Income Tax

पी.पी.एफ. म्हणजेच लोक भविष्य निधी हा कर वाचवण्यासाठी सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांचा आपुलकीचा पर्याय आहे. कारण आयकर कायद्याच्या ८० सी ह्या कलमाअंतर्गत पी.पी.एफ. मध्ये एका वर्षात गुंतवलेली रू.१,५०,००० इतकी रक्कम तर करमुक्त असतेच परंतु त्यावर मिळणारं व्याजदेखील संपूर्णपणे करमुक्त असतं.

शेअर बाजार म्हणजे पैशांचा व्यवहार पण तो सुद्धा एका प्रेमिके सारखा!! कसा ते बघा

शेअर बाजार

आता शेअर बाजारला ‘तो’ का ‘ती’ म्हणावे हाही तसा एक प्रश्नच आहे म्हणा! लातुरला पाणी सप्लाय करणाऱ्या एक्सप्रेसला शासनाने ‘जलदुत एक्स्प्रेस’ नाव दिलं, पण वर्तमानपत्र वाले तिला ‘जलपरी’च म्हणायचे, कदाचित त्याचं कारण माणसाला स्त्री रुपकांचच उपजत आकर्षण असेल.

वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ चे आयकर रिटर्न भरण्याची संधी ३१ मार्च २०१८ पर्यंत

IT Returns

अर्जुना, मार्च महिना सर्व करदात्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. आपल्या देशात, एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष सर्व कर कायद्यांसाठी लागू होते. म्हणूनच एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी खात्याची वह्या पुस्तके तयार केली जातात. २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी Income Tax Return भरण्यासंदर्भात काही सक्तीचे नियम आले आहेत.

जाणून घ्या वस्तूबाजार (Commodity Market)

Comodity Market

वस्तूबाजार (Commodity Market) हा एक वेगळ्या प्रकारचा बाजार असून यात विविध वस्तूंचे व्यवहार होतात. इतर कोणत्याही बाजारास लागू असणारे मागणी व पुरवठा हे तत्व, म्हणजे ‘ मागणी अधिक पुरवठा कमी असेल तर भाव जास्त’ आणि ‘मागणी कमी पुरवठा अधिक असेल तर भाव कमी’ याही बाजारास लागू होते.

ऑनलाईन बँकींग गैरव्यवहार आणि ग्राहक

online banking

नोटाबंदीनंतर अधिकाधिक ग्राहकांनी त्याचे बँकिंग व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करावे अशी सरकारची अपेक्षा आहे. लोकही मोठ्या प्रमाणात असे व्यवहार करीत असून पुर्वी तुरळक प्रमाणात ऐकू येत असलेल्या गैरव्यवहारात थोडी वाढ झाली आहे. एकंदर व्यवहारांचे तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी जी व्यक्ती या अनुभवातून जाते त्याला खूपच मनस्ताप होतो.

आता नवी डिजिटल भांडवलशाही

Bitcoin

अनेक पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांनी आता चेकचे व्यवहार पूर्णपणे बंद केले आहेत. यापुढे या देशातील नागरिक डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार करतील. भारतातही तो दिवस फारसा लांब नाही. गेल्याच आठवडय़ात भारतात अधिकृतरीत्या बिटकॉइन एक्स्चेंज उघडले गेले. मात्र आजतरी सामान्य छोटय़ा गुंतवणूकदारांनी या बिटकॉइनच्या फंदात पडू नये.

अडचणीच्या काळासाठी ठेवलेला राखीव/आणीबाणी निधी कसा गुंतवावा?

emergancy fund

राखीव/आणीबाणी निधी आपल्या मासिकखर्चाच्या सहापट असावा असा सर्वमान्य निकष आहे. एवढी मोठी रक्कम आपण घरी ठेवू शकत नाही. बहूतेक ती बँकेत ठेवलेली असते. यावर सध्याच्या नियमाप्रमाणे ३.५% व्याज मिळते. अशा प्रकारे फारसा रिटर्न न मिळवता मोठी रक्कम बचत खात्यात ठेवणे हे तितकेसे बरोबर नाही.

वैयक्तिक बजेट कसे तयार करावे यासाठी ११ पावले

personal budget

आपले वैयक्तिक बजेट तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सुरुवात केल्यावर भीती जाते आणि फायदे समजतात. फार कमी भारतीय लोक मासिक बजेट तयार करतात, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बजेट तयार करणे अत्यावश्यक ठरते.

अर्थसंकल्पातील तरतूदी आणि जेष्ठ नागरिक

senior citizen

जेष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० पूर्ण झाले आहे अशी कोणतीही व्यक्ती. त्यांना आणि ज्यांचे वय ८० पूर्ण झाले आहे अशा अतीजेष्ठ नागरिकांना आयकर कायद्यानुसार काही विशेष सवलती मिळतात. प्रस्तावित अर्थसंकल्पात जेष्ठ नागरिकांना काही सवलती देण्यात आल्या असून त्या कोणत्या आहेत यांची माहिती करून घेवूया.

नियोजित दीर्घकालीन नफा मोजणी (LTCG) आणि करआकारणी

LTCG

येणार येणार म्हणून गेले चार अर्थसंकल्प सर्वांना हुलकावणी देणारा बहुचर्चित LTCG म्हणजेच शेअरवरील दीर्घकालीन नफा आता काही अटीसह करपात्र ठरला आहे. याआधी तो आयकर कलम १०(३८) नुसार करमुक्त होता. यावरील सर्वसाधारण टोकाची प्रतिक्रिया म्हणून बाजारात मोठी पडझड झाली. याबाबतीतील प्रस्तावित तरतुदी आणि त्याचे गुंतवणूकदारांवर होणारे परिणाम जाणून घेवू या.