खतखतं
“स्वयंपाकघरात यायस सुद्धा आमंत्रण लागते महाराणीस म्हटले. माझेच चुकले, नारळ –पत्रिका घेऊन जायस हवे होते मीच आमंत्रण द्यायला की ये बाय घरात ये जरा काय तरी हातबोट लाव कामास, म्हातारी सासू करते ते नुसतं बाहेर तरी आणून दे”
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“स्वयंपाकघरात यायस सुद्धा आमंत्रण लागते महाराणीस म्हटले. माझेच चुकले, नारळ –पत्रिका घेऊन जायस हवे होते मीच आमंत्रण द्यायला की ये बाय घरात ये जरा काय तरी हातबोट लाव कामास, म्हातारी सासू करते ते नुसतं बाहेर तरी आणून दे”
जाऊदे कुलकर्ण्यांना काही विचारलं तर उगीच भिशीच्या बायकांमध्ये जाऊन गॉसिप करतील की रेखा देसाईला काहीही आठवत नाही. त्यांच्याकडे बघून हसून मी आत जायला निघते. नवऱ्याला पुन्हा फोन लावते. परत तीच रेकॉर्डिंग.
असं म्हणतात की नशीब संधी एकदाच देतं ती स्वीकारून त्याचं सोनं करायचं असतं. पण, मी असं म्हणेन की तुम्हाला अनेक संधी मिळतील ती संधी स्वीकारून स्वत:ला हिऱ्याप्रमाणे लखलखीत करा. फक्त लखलखू नका तर जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संधी द्या की ते तुम्हाला पैलू पाडू शकतील.
वळवाचा पाउस जसा अनेक प्रश्न निर्माण करून पुढे जातो तशी अनेक उत्तरे हि देऊन जातो. एका पाण्याला तरसलेल्या जमिनीला हा वळवाचा पाउस जसं एक वेगळंच आयुष्य देतो तसचं वळवाच प्रेम. अचानक आयुष्याच्या वाटेवर ते कधी कोणाकडून मिळेल काही माहित नसते.
झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत राजा विक्रमाने उचलले, पाठीवर घेतले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ आज शांत होता… खरे तर विक्रमाला गोष्टी सांगून वेताळ कंटाळला होता.. एकूणच वेताळाचे शांत बसणे विक्रमाला नवीन होते..
थोड्यावेळाने आईची हाक ऐकू आली. हॉलमध्ये येताच समोर लहान बहीण आणि तिचे मिस्टर बसलेले दिसले. त्याची नजर शरीरावरुन फिरलेली तिला जाणवली. काही न बोलता समोर येऊन बसली. जणू ती आरोपी आणि समोर चार न्यायाधीश बसले होते. आई… कधीहि काही न बोलणारे बाबा
तेवढ्यात तो तरुण म्हणाला, दुसर्या मुलीशी लग्न केलं तर तुम्ही तिच्यावर सुद्धा बलात्कार कराल… तीही मरेल… यजमानाचा पारा चढला आणि त्याने त्या तरुणाचे कान चांगलेच लाल केले. तो मगासचा समजूतदार माणूस मध्ये पडला आणि यजमानाला त्याने आवरलं… त्या तरुणाला एका जीपमध्ये बसवून कुठेतरी नेण्यात आलं.
त्याचे अचानक जाणे हा जणू तिचाच दोष धरला गेला होता. सोनूलीला कुशीत घेऊन शांतपणे गॅलरीत बसून होती ती. संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर जणू रिकामे उभे होते. अचानक डोअरबेलने ती जागी झाली. दरवाजा उघडला तेव्हा समोर छोटा दिर उभा.
अंगणाला ‘अंगण’ न म्हणता तू ‘गार्डन’ म्हणायचास. माझ्या अंगणातल्या कमळाच्या छोट्या तलावाची हौस मी तुझ्या गार्डनमधल्या ‘स्विमिंग पूल’मध्ये भागवली होती. त्याबाजूला तू दोन खुर्च्या ठेवल्या होत्यास, झोपून बसल्यासारखं बसायला. तुला तिथे बसून राहायला आवडायचं आणि मला पूलमध्ये पाय टाकून.
मिसेस खन्ना वि़चारात मग्न असतानाच दाराची बेल वाजली. तिची समाधी भंग झाली. पण चेहर्यावर हलकासा आनंद दिसू लागला. तिने दार उघडले तर दारात मिस्टर खन्ना उभा होता. रोजच्याप्रमाणे तिने हसत त्याचे स्वागत केले. तो हॉलमध्ये सोफ्यावर बसला. तिने पाणी आणून दिले आणि त्याच्याकडे आशेने पाहू लागली.