चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्याचे घरगुती उपाय

वयाची चाळीशी उलटून गेली आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या की मन खट्टू होऊन जातं.

चेहरा आणि हातांवर… मुख्यतः सुरुवात होते ती चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला.

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या थांबवता तर येत नाहीत पण कमी नक्कीच करता येतात.

त्वचा चिरतरुण आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी नारळाचं तेल खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं, हे सहसा आपल्याला माहीत असतं पण त्याचा तितकासा उपयोग आपण करत नाही.

याउलट सौंदर्य प्रसाधनांचा वापर खूप केला जातो. जो वाढत्या वयानुसार त्वचेच्या आरोग्यासाठी घातक ठरतो.

त्वचेवर सुरकुत्या का पडतात:

वाढत्या वयानुसार त्वचा, पात्तळ आणि रुक्ष व्हायला लागते. त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होऊन ती खराब होऊ लागले.

ताण तणाव, कमालीची व्यस्त जीवनशैली, प्रदूषण, संतुलित आहार न घेणे, चांगली झोप न घेणे यामुळे पण त्वचा यावेळी डॅमेज व्हायला सुरुवात होते.

कडक उन्हामध्ये जास्त काळ काम करणाऱ्या लोकांच्या त्वचेवर सुद्धा लवकर सुरकुत्या पडतात.

त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचे काही घरगुती उपाय आता आपण या लेखात बघू.

१) नारळाच्या तेलाची सर्क्युलर मोशनने मॉलिश करून रात्री झोपणे आणि सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुणे. हे नियमितपणे केल्यास कालांतराने त्वचेला पुनर्जन्म मिळाल्याचे तुम्हाला जाणवेल.

२) नारळाचं तेल आणि मध घेऊन हलक्या हाताने सर्क्युलर मोशनने मॉलिश करून, अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ धुवावा.

३) लिंबाचा रस किंवा कच्चे दूध आंघोळीच्या आधी चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनने मॉलिश करून लावावे १५ ते २० मिनिटांनंतर जाडसर दळलेली मसुराची डाळ किंवा यासारख्या नॅचरल स्क्रबर ने चेहरा स्वच्छ धुवावा.

याने त्वचा तुकतुकीत होण्या बरोबरच मुलायम आणि स्वच्छ व्हायला मदत होईल.

४) दही आणि उडदाची डाळ किंवा बेसन याची पेस्ट सर्क्युलर मोशनने मॉलिश करून चेहऱ्यावर लावावी आणि १५ ते २० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

५) पपई आणि केळी चा गर चेहऱ्यावर लावून हा पॅक १५ ते २० मिनिटे ठेऊन कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा. याने चेहऱ्यावर तजेला येऊन त्वचेला पोषण मिळते.

याच बरोबर तुमची जीवनशैली सुद्धा यात खूप महत्त्वाची भूमिका पार पडते. ताण-तणाव, चिंता याचे पडसाद सुद्धा कालांतराने तुमच्या त्वचेवर पडतात.

जपानी लोक जास्त स्थूल नसतात, त्यांची त्वचा नितळ आणि स्वच्छ दिसते या मगचं एक कारण असतं, त्यांचा समुद्रजन्य आहार. सीफूड आणि सीव्हीड, व्हेज असो कि नॉनव्हेज जापानी लोक समुद्रजन्य आहारच घेतात. समुद्रात मिळणारे झुडपं या त्यांच्या भाज्या सर्रास असतात.

हे उपाय नियमितपणे करत राहल्यास आणि योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम घेतल्यास त्वचेवरची चमक कायम ठेवायला नक्कीच मदत होईल.

या शिवाय कडक ऊन प्रदूषण या पासून त्वचेला वाचवणे आणि रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा त्वचेवरील मारा थांबवणे याने सुद्धा त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हायला मदत होते.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।