आपल्या रक्तगटाबद्दल ‘हि’ माहिती आहे का तुम्हाला?

रक्तगट म्हणजे काय? रक्त गट कसा ओळखावा? रक्तगट माहीत असणे का आवश्यक आहे? जाणून घ्या ही सर्व माहिती ह्या लेखात

रक्त हा आपल्या शरीरातील प्रमुख घटक आहे. शरीरात सर्वत्र पसरलेला घटक म्हणजे रक्त.

सर्व मनुष्यांचे रक्त लाल रंगाचे दिसत असले तरी सर्वांचे रक्त सारखे नसते. रक्ताचे निरनिराळे प्रकार आहेत.

त्यांना रक्तगट असे म्हणतात. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

रक्तगट म्हणजे काय 

प्रत्येक व्यक्तींचा विविक्षित असा रक्तगट असतो. रक्तगट हा त्या व्यक्तीच्या रक्तातील घटकांवरून ठरतो.

रक्तात आढळणारे अँटीजेन (‘अँटीजेन’ म्हणजे रक्ताला अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिजैविके तयार करण्यासाठी उद्युक्त करणारा घटक) कुठल्या प्रकारचे आहेत ह्यावर रक्तगट कुठला हे ठरते.

हे अँटीजेन कोणत्या प्रकारचे आहे हे तपासणीसाठी रक्ताची चाचणी करावी लागते. ती चाचणी करणे अत्यंत सोपे आहे. कोणत्याही लॅब मध्ये अगदी सहजपणे रक्तगट तपासण्याची चाचणी करता येते.

वेगवेगळे रक्तगट अर्थातच वेगवेगळ्या गुणधर्मांचे असतात त्यामुळे विविक्षित रक्तगटच एकमेकांशी जुळतात आणि हे वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असते.

त्यामुळे व्यक्तींचा/रुग्णाचा रक्तगट माहीत असणे हे कोणत्याही उपचारापूर्वी अत्यंत गरजेचे असते.

रक्तगट कोणकोणते असतात आणि ते कसे ओळखले जातात ते आपण पाहूया .

रक्तगट कसे ओळखले जातात

रक्तगट ओळखण्याची चाचणी कोणत्याही चांगल्या लॅब मध्ये करून आपण आपला रक्तगट माहीत करून घेऊ शकतो.

कोणत्या प्रकारचे अँटीजेन रक्तात आहे ह्यावरून रक्तगट ठरतो. त्याचे चार प्रकार आहेत.

१. अँटीजेन अ (A) – जर आपल्या रक्तात हे अँटीजेन आढळले तर आपला रक्तगट ‘A’ हा असतो.

२. अँटीजेन ब (B) – जर आपल्या रक्तात हे अँटीजेन आढळले तर आपला रक्तगट ‘B’ हा असतो.

३. अँटीजेन अ (A) आणि अँटीजेन ब (B) दोन्ही – जर आपल्या रक्तात हे दोन्ही अँटीजेन आढळले तर आपला रक्तगट ‘AB’ हा असतो.

४. अँटीजेन अ (A) आणि अँटीजेन ब (B) दोन्हीही नाही – जर आपल्या रक्तात हे दोन्ही अँटीजेन आढळले नाहीत तर आपला रक्तगट ‘O’ हा असतो. हा सर्वात जास्त आढळणारा रक्तगट आहे.

ह्या चार गटांबरोबर अजून एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे ऱ्हीसस फॅक्टर.

ऱ्हीसस अँटीजेन जर रक्तात आढळला तर तो पॉजिटिव रक्तगट मानला जातो आणि ऱ्हीसस अँटीजेन जर रक्तात नसेल तर तो रक्तगट निगेटिव्ह मानला जातो.

अशा प्रकारे A पॉजिटिव, B पॉजिटिव, AB पॉजिटिव आणि O पॉजिटिव तसेच A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह, O निगेटिव्ह असे रक्तगटाचे प्रकार असतात.

रक्तगट महत्वाचा का असतो?

कोणताही रक्तगट दुसऱ्या रक्तगटाशी जुळेलच असे नाही. हे एखाद्या रुग्णाला रक्त देण्याची वेळ आली की महत्वाचे ठरते.

एखाद्या शस्त्रक्रियेदरम्यान किंवा अपघात झाल्यामुळे जर बराच रक्तस्त्राव झाला तर रुग्णास रक्त देण्याची गरज असते.

अशा वेळी त्या रुग्णाचा जो कोणता रक्तगट असेल त्याच रक्तगटाचे किंवा त्या रक्तगटाशी जुळणारे रक्त त्या रुग्णास देणे आवश्यक असते, अन्यथा काही मेडिकल कॉम्पलिकेशन्स होऊ शकतात.

तसेच अवयव दान करताना सुद्धा तो अवयव रुग्णाच्या शरीराने स्वीकारावा हयाकरिता दात्याचा रक्तगट रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणारा असणे आवश्यक असते.

अशाच आणखी एका प्रसंगी रक्तगट महत्वाचा ठरतो ते म्हणजे गर्भधारणा.

जर आई आणि गर्भाचा रक्तगट पॉजिटिव निगेटिव्ह असेल (म्हणजेच न जुळणारा असेल) तर आईच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात ज्या घातक असू शकतात.

त्यामुळे अशा वेळी गरोदरपणात विशेष काळजी घ्यावी लागते. हल्ली विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देऊन ही परिस्थिति नियंत्रणात ठेवता येते.

आपण जर रक्तदाते असू म्हणजेच रक्तदान करून कोणाला जीवनदान देणार असू तर देखील आपला रक्तगट माहीत असणे महत्वाचे ठरते. कारण एमर्जन्सिच्या वेळी रुग्णाला रक्त देताना त्याविषयी माहीती असणं आवश्यक ठरतं.

तर असा हा रक्तगट. जरी सर्वांचे रक्त लाल असले तरी ही सर्व महिती महत्वाची ठरते. ती नीट जाणून घ्या आणि एमर्जन्सिच्या वेळी नक्की उपयोगात आणा.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आपल्या रक्तगटाबद्दल ‘हि’ माहिती आहे का तुम्हाला?”

  1. फार महत्व पूर्ण माहिती! कृपया या महितीच्या जोडीस कुठला रक्तगट कुठल्या रक्त गटाशी जुळू शकतो या माहीतीचा तक्ता जोडू शकाल का?

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।