मित्रांनो, आपल्याला चांगली, दाट दाढी यावी असं तुम्हाला वाटतं का? मग या लेखात सांगितलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा आणि फरक पहा…
पूर्वी पुरुष मंडळी विशेषतः तरुण मुले अगदी तुळतुळीत दाढी करायचे, दाढी वाढवण्याची फॅशन नव्हती, त्यामुळे आपल्या दाढीचे केस कसे आहेत ह्याचे पुरुषांना विशेषतः तरुण मुलांना फारसे टेन्शन नव्हते.
परंतु, सध्या सिनेमातील हिरोंमुळे दाढी वाढवण्याची फॅशन आली आहे. सगळा तरुण वर्ग छान, दाट, कोरीव दाढी मिरवताना दिसतो.
अशा वेळी ज्या पुरुषांना दाट दाढी येत नाही ते मात्र खट्टू होतात. मनात असूनही त्यांना दाढी वाढवून मिरवता येत नाही, कारण त्यांना चांगली दाढी येत नाही. खुरटी, किंवा विरळ दाढी येते.
अशा सगळ्या पुरुष मित्रांना उपयोगी पडतील अशा टिप्स आम्ही ह्या लेखात घेऊन आलो आहोत. लेख संपूर्ण वाचा आणि त्यात दिलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करून भरघोस दाढी वाढवा आणि ती मिरवा.
१. दालचिनी
दालचिनी हा मसाल्याच्या पदार्थांपैकी अगदी बहुगुणी असा पदार्थ आहे. दालचिनीच्या नियमित सेवनाने शरीरातील उष्णता वाढते आणि केसांच्या मुळांशी ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीची पूड मध आणि पाण्याबरोबर दररोज सेवन करावी. दाट दाढी येण्यास मदत होते.
२. लाल भोपळ्याच्या बिया
लाल भोपळ्यामध्ये असणाऱ्या बिया सोलून खाणे केसांसाठी गुणकारी आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असते. झिंक हे असे मायक्रो न्यूट्रियंट आहे ज्यामुळे केसांची वाढ मुबलक प्रमाणात होते. लाल भोपळ्याच्या बिया सोलून, उकडून किंवा भाजून खाता येतात. शक्यतो मीठ न लावता खाव्यात. भरपूर फायदा होतो.ह्या बिया सहजपणे उपलब्धही असतात आणि फार खर्चीकही नाहीत.
३. पालक
पौष्टिक आणि गुणकारी हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालकाचा क्रमांक वरचा आहे. पालक ही सहज उपलब्ध असणारी, स्वस्त असल्यामुळे सर्वांना परवडणारी अशी अतिशय गुणकारी भाजी आहे. पालकांमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलीक ऍसिड आणि बीटा कॅरेटिन ही द्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा आणि केस मुलायम राहतात आणि केसांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. पालकाचे नियमित सेवन दाढीचे दाट केस उगवण्यासाठी विशेष गुणकारी आहे. पालकाची भाजी करून अथवा स्मूदी करून सेवन करता येते. तसेच पालकाची पाने वाटून त्यात पाणी घालून ज्यूसदेखील बनवता येऊ शकते.
४. ट्युना मासा
ट्युना मासा हा ओमेगा ३ फॅटी ऍसिडचा प्रमुख स्रोत आहे. ओमेगा ३ फॅटी ऍसिडची निर्मिती शरीरात होऊ शकत नाही ते आहारातूनच घ्यावे लागते. ओमेगा ३ चे नियमित सेवन केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते. ह्याच्या नियमित सेवनामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते तसेच केसांची मुळे घट्ट होतात. त्यामुळे ट्युना माशाचे नियमित सेवन दाढीचे केस दाट होण्यासाठी खूप गुणकारी आहे.
तर पुरुष मित्रांनो, हे आहेत असे पदार्थ ज्यांचे नियमित सेवन केल्यामुळे तुम्हाला दाट आणि चांगली दाढी येण्यास तर मदत होईलच शिवाय हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी देखील अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहेत.
तेव्हा ह्या पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करा आणि छान दाढी मिरवा. हँडसम दिसा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.