मेडिकल सायन्सने खूप प्रगती केलेली आहे, त्यामुळे अतिशय गंभीर आजारात उपचार करणं सोपं झालेलं आहे.
काही गोष्टी अशक्य आहेत असं पुर्वी वाटायचं, आता त्या गोष्टीही मशीनच्या मदतीने अगदी सहज सोप्या झालेल्या आहेत.
डायलिसिस एक असं मशीन आहे ज्यातून टाकाऊ पदार्थ शरीरातून ठराविक काळासाठी फिल्टर करून बाहेर टाकले जातात.
सोप्या भाषेत सांगायचं तर डायलिसिस मशीन किडनीचं पर्यायी रुप आहे.
पर्याय तर उपलब्ध झाले, उपचारांचे खर्च मात्र वाढले. डायलिसिस मशीन्स घेण़ं हॉस्पिटललाच परवडू शकतं. या मशीनवर उपचार घेणं हे ही सामान्य माणसासाठी थोडसं खर्चिक ठरतं.
अशावेळी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणं ही गरज आहे.
किडनी शरीराचा अत्यावश्यक अवयव आहे. किडनीमध्ये काही बिघाड झाला तर त्यातून टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर पडण्याची क्रिया मंदावते.
त्यामुळे किडनीचं काम थांबतं तेंव्हा किडनीचं काम पुन्हा सुरू होईपर्यंत डायलिसिस मशीन वापरलं जातं.
डायलिसिसची ही प्रक्रिया खूपच खर्चिक आहे. म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असणं गरजेचं आहे.
डायलिसिसची गरज आहे का?
किडनी कडून शरीरातील विषद्रव्यं फिल्टर करून बाहेर फेकली जातात. जर हे काम थांबलं तर ती विषद्रव्यं, क्षार शरीरात जमा व्हायला लागतात. त्याचा शरीराला त्रास होतो.
अशावेळी डायलिसिस मशीन वापरलं जातं, जे किडनीला पर्याय म्हणून काम करतं. डायलिसिसची प्रक्रिया तोपर्यंत चालू ठेवावी लागते जोपर्यंत उपचार होऊन किडनी पुन्हा काम सुरू करत नाही, किंवा जोपर्यंत किडनी बदलली जात नाही.
ज्यांच्या किडन्या काम करायचं थांबवतातच त्यांना बराच काळ डायलिसिस करण्याची गरज पडते.
अशा वेळी शरीराचं काम सुरळीत चालण्यासाठी डायलिसिस मशीन फार गरजेचं ठरतं. त्याला दुसरा पर्याय नसतो.
काही केसमध्ये या डायलिसिस मशीनचा वापर ठराविक कालावधीसाठीच केला जातो. पण काही वेळा आयुष्यभर डायलिसिस करत राहण्याची गरज पडते.
डायलिसिससाठी हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा विचार करत असाल तर या मुद्द्यांचा नक्की विचार करा.
1) डायलिसिस वर होणारा खर्च
डायलिसिस ट्रिटमेंटचा विचार करताना फक्त मशीनच्या फी चा विचार न करता औषधं, नियमित चाचण्या, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा खर्च डॉक्टरांची फी यांचा ही विचार करायला हवा. या खर्चाचा समावेश इन्शुरन्समध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
2) नेटवर्क मधील हॉस्पिटल.
ज्या कंपनीचा इन्शुरन्स तुम्ही घेण्याचा विचार करता आहात त्यांच्या नेटवर्कमध्ये किती हॉस्पिटल आहेत याची खात्री करुन घ्या. तुम्हांला जवळ आणि सोईच्या असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही इन्शुरन्स घेतलेल्या कंपनीचा इन्शुरन्स चालत नसेल तर नुकसानच होणार. इन्शुरन्स फायनल करताना ही कंपनी कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये चालेल त्यांची यादी, पत्ता घ्या, डायलिसिसची फी या सगळयाची नीट माहिती घ्या.
3) अतिरिक्त लाभाचा विचार.
डायलिसिससाठी इन्शुरन्स निवडताना याच प्लॅनमध्ये ऑर्गन डोनर, अॅंब्युलन्स, वार्षिक तपासण्या, डॉक्टरांचा सल्ला अशा खर्चांनाही
सामावून घेणारा असावा. हे सगळे लाभ उपचारांचा एकूण खर्च आटोक्यात ठेवतात.
4) प्रीमियम
प्लॅन फायनल करण्याआधी प्रीमियम रेट योग्य आहे का याची खात्री करून घ्या. कंपनी कडून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा प्रीमियम जास्त आहे असं वाटत असेल तर कंपनीशी बोलून इतर कंपनीच्या प्लॅनशी तुलना करून पहा मगच प्लॅन फायनल करा.
डायलिसिसची प्रक्रिया दीर्घ आणि खर्चिक असते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स करणं हा योग्य निर्णय ठरतो. काळजीपूर्वक निवडलेला हेल्थ इन्शुरन्स तुम्हांला कोणत्याही प्रकारे आर्थिक पातळीवर नुकसान होऊ
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.