भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

गुंतवणुकीचे फंडे माहिती असणाऱ्या लोकांच्या तोंडातून माझे शेयर्स पडले, याचं मार्केट खाली आहे, NSE पेक्षा BSE चांगलं अशा काही गप्पा आपण ऐकल्या असतील. पण या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचं धाडस सहसा होत नाही. याचं कारण म्हणजे अपुरी माहिती. मुळात ‘फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक मार्केट’ हा विषयच किचकट आणि निरस वाटतो. आकड्यांच्या या दुनियेत घाबरून जाऊ नका.

भारतातील स्टॉक मार्केट, BSE, NSE या सगळ्यांबद्दल थोडीशी माहिती आणि रस घेऊन केलेली गुंतवणूक या मुळे तुमचे ज्ञान तर वाढतेच बरोबर आर्थिक लाभ निश्चित होतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या नव्या पर्यायांची दारे आजच उघडा.        

काय आहे स्टॉक एक्सचेंज?

  • काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये डॅन्जी डम्स नावाच्या केक शॉपचं नाव आणि त्यांच्या केक्स ची चव प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत होती. हे केक्स खूप प्रसिद्ध झाले आणि त्यांची मागणी अपेक्षेच्या फारच पुढे गेली. अशा वेळी चाहत्यांची भूक भागवणं त्यांना कठीण झालं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर उद्योग करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नव्हतं. त्यांनी एक युक्ती लढवली आणि त्यांच्या उद्योगात भागीदार होण्याचे आवाहन केले.
  • मग लोकांनी ७४ रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत हिस्सा देऊन त्यांच्यात आपली भागीदारी नोंदवली. ज्यांनी ज्यांनी त्यात आपले पैसे गुंतवले ते सगळे या कंपनीचे वाटेकरी मालक झाले. उद्योगाचे नुकसान आता भागीदारांच नुकसान करेल आणि उद्योगाचे फायदा लोकांना पैसा मिळवून देईल.
  • याच तत्वाला मोठ्या प्रमाणावर बघूया जिथे करोडोंच्या उलाढाली असणाऱ्या कंपन्या आपल्या उद्योगात भागीदारांच्या शोधात असतात. मग रिलायन्स पासून ते स्टारबक्स पर्यंत सर्व कंपनी स्वतःच्या कंपनीत लोकांचे पैसे गुंतवून त्यात आपले हिस्सेकरी करवून घेतात.
  • अशा सर्व कंपनीज जे भागीदार शोधतात, ते एका छताखाली एकत्र येऊन बाजारपेठ बनवतात. त्याला म्हणतात स्टॉक मार्केट. आणि इथे जो व्यवहार होतो त्याला म्हणतात स्टॉक एक्सचेंज. भांडवलाचा छोटा छोटा वाट उचलणाऱ्या लोकांनी कधी किती पैसे गुंतवावे किंवा काढून घ्यावे याचे सगळे हक्क पूर्णतः त्या व्यक्तीचा आहे. म्हणून लोक, ज्या कंपनीचा बिझनेस जोरात चालला असेल तिकडे आपले पैसे गुंतवण्यासाठी दौड घेतात. ज्यांचा एक्स्चेंज रेट कमी त्यातून आपले शेयर काढून घेतात. अशी ही सगळी उलाढाल होणारी खरंतर विशिष्ट जागा किंवा ऑफिस नसत. कारण या सगळ्या उलाढाली कम्प्युटर सिस्टीम वर होतात.    
इंडिअन स्टॉक एक्सचेंज
  • भारताचं प्रतिनिधित्व करणारी आणि भारतीय भांडवलदारना फॉरेन कंपनीशी भागीदार म्हणून जोडणारी संस्था म्हणजे ‘इंडिअन स्टॉक एक्सचेंज’. भारतात आघाडीवर असणाऱ्या अशा २ बाजारपेठ आपापल्या कंपनीच्या लिस्ट सोबत भारतीय तथा परदेशी गुंतवणूकदर आणि मोठे मोठे उद्योजक या दोघांमध्ये दलाल किंवा दुव्याची भूमिका बजावतात. त्या दोन संस्था म्हणजे
    • NSE (National Stock Exchange) आणि
    • BSE (Bombay Stock Exchange)  
  • स्टॉक एक्सचेंज मार्केट मधील, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही संस्था भारतीय भांडवली बाजारातील महत्त्वाची भूमिका बजावतात. दररोज,शेकडो हजारो दलाल आणि गुंतवणूकदार या स्टॉक एक्सचेंजच्या जीवावर व्यापार करतात. आणि दोन्ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थापित असून सेबी (सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) येथे मान्यताप्राप्त आहेत.
बीएसई (BSE) म्हणजे काय?
  • १८७५ मध्ये ‘द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन‘ स्थापना झाली जे आता ‘बीएसई (BSE)’ किंवा ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ म्हणून ओळखले जाते.
  • १९५७ नंतर, भारत सरकारने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट,  १९५६ कायद्या अंतर्गत या स्टॉक एक्सचेंजला भारतातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज म्हणून मान्यता दिली.
  • १९८५ मध्ये सेन्सेक्स (Sensex) हा भारतातील ३० एक्सचेंज ट्रेडिंग कंपन्याचा पहिला इक्विटी इंडेक्स म्हणून ओळखला गेला.
  • १९९५ मध्ये बीएसई ऑनलाइन ट्रेडिंग (बीओएलटी) ची स्थापना झाली. त्या वेळी ८ मिलियन रुपये प्रतिदिन इतकी उलाढाल होत होती. स्वाभाविकपणे, बीएसई आशियाचा प्रथम स्टॉक एक्स्चेंज बनला आणि मार्केट डेटा सर्विस, जोखीम व्यवस्थापन,  सीडीएसएल (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड) डिपॉझिटरी सेवा वगैरे विविध अद्ययावत सुविधा पुरवते.
  • जुलै २०१७ पर्यंत त्याचे बाजार भांडवल २ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे आणि आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही जगातील १० व्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टॉक एक्स्चेंज मार्केटप्लेस आहे.
एनएसई (NSE) म्हणजे काय?
  • भारतातील आघाडीचे स्टॉक एक्स्चेंज मार्केट, एनएसई किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज  हे १९९२ साली स्थापन झालेले मार्केट मुंबईमध्ये स्थित आहे. भारतात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज प्रणाली मार्केटमध्ये एनएसईने आणली. ज्यामुळे कागदावर होणारे व्यवहार इलेक्ट्रोनिक माध्यमातून होऊ लागले.
  • एनएसईने  १९९६ मध्ये टॉप ५० स्टॉकस चा निफ्टी-फिफ्टी हा इंडेक्स प्रमाणित केला. जे भारतीय भांडवली बाजारातील ‘बॅरोमीटर’ म्हणून ओळखले जाते.
  • १९९३ पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंज एक स्टॉक एक्स्चेंज मान्यताप्राप्त कंपनी बनली आणि १९९२ मध्ये सिक्युरिटीज कॉण्ट्रॅक्ट्स ऍक्ट, १९५६ अंतर्गत कर भरणारी कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली.
  • एनएसडीएल (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) ची स्थापना करून १९९५ मध्ये गुंतवणूकदारांना शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात एक सुरक्षित मंच उपलब्ध करून दिला.   
  • नॅशनल स्टॉक एक्सचेंज  ११ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टॉक एक्स्चेंज मार्केटप्लेस आहे आणि मार्च २०१७ पर्यंत त्याचे बाजार भांडवल १.४१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेले.
BSE आणि NSE मधला फरक
  • एनएसई सर्वात मोठे तर, बीएसई सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज मार्केट म्हणून ओळखले जाते.
  • जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंज कंपनी पैकी, बीएसई १० व्या स्थानावर तर एनएसई जगातील ११ व्या क्रमांकाचे सर्वात मोठे एक्स्चेंज मार्केट आहे.
  • १९९२ मध्ये एनएसईने इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज सिस्टमची ओळख करून दिली, तर १९९५ मध्ये बीओएलटी नावाची ही प्रणाली सुरू केली गेली.
  • एनएसईचे बाजार भांडवल १.६५ ट्रिलियनपेक्षा जास्त किमतीपर्यंत गेले, तर बीएसईचे बाजार भांडवल १.७ ट्रिलियनपेक्षा अधिक आहे.
  • १७०० पेक्षा जास्त कंपन्या एनएसईवर नोंदणीकृत आहेत. बीएसई कडे  ५५०० पेक्षा जास्त कंपन्या आहेत.
  • निफ्टि एनएसईसाठी मानक निर्देशांक आहे, तर सेन्सेक्स बीएसईसाठी वापरला जातो.
  • एनएसई भारतातील जवळजवळ सर्व शहरांमध्ये आहे, बीएसई केवळ  ४०० शहरांमध्ये सेवा देते.    
  • या दोन प्रभावी स्टॉक एक्सचेंज्स कंपन्या, भारतीय शेअर बाजाराचा अभिन्न अंग आहेत. या भारतीय अर्थव्यवस्थेचे दोन खांब म्हणून  सक्षमपणे कार्यरत आहेत.

सौजन्य : www.arthasakshar.com


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।