काटा रुतला, गाडी लागते, चटका बसला, डोको दुखतंय काळजी नको, हे उपाय करा

 

अनेकदा आपल्या किरकोळ आजारावरील उपचार हे आपल्या घरातच असतात, परंतु आपल्याला ते माहित नसल्याने आपण त्यावर योग्य ते उपचार करू शकत नाही.

आजच्या लेखात आपण असेच काही घरगुती प्रथमोपचार पाहणार आहोत, जे वाचून तुम्हाला लहान-सहान आजारांबाबत, जखमेबाबत चिंता करण्याची गरज पडणार नाही.

१. पायात काटा गेल्यावर – कित्येकदा मोकळ्या माळरानावर चालल्यावर किंवा घरात काही काचेचे भांडे फुटल्यावर ते बारीक बारीक काचेचे कण किंवा काटा आपल्या पायात किंवा हातात टोचतात.

असा काटा जर बारीक असेल तर तो काढण्यासाठी आपल्याला प्रचंड प्रयत्न करावे लागतात.

कित्येकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो काटा आतमध्ये सलत राहतो व काही दिवसांनी आपल्याला जास्त त्रास सुरू झाल्यावर आपण त्याकडे लक्ष देतो.

मग अशावेळी जर काटा खूप आत गेला तर त्याचं सेप्टीक होण्याची शक्यता असते. काटा काढण्यासाठी आपण नेहमीचा उपाय करून पाहतो, जिथे काटा गेला आहे त्याच्या बाजूने दाब देऊन सुईने किंवा पिनेने काढायचा प्रयत्न करतो.

परंतु मित्रांनो, काटा काढण्यासाठी आणखी एक सोप्पी पध्दत आहे. एक ग्लास घेऊन त्यामध्ये एक ज्योत पेटवा. 

kata-kadhnyache-upay

हा गरम झालेला ग्लास काटा रूतलेल्या ठिकाणी ठेवा. जेणेकरून त्या जागेस ऊब मिळेल आणि आत गेलेला काटा लवकर बाहेर येण्यास मदत होईल.

kata-kadhnyache-upay

२. प्रवासात गाडी लागल्यावर – अनेकांना दूरचे प्रवास करताना गाडी लागते म्हणजेच मळमळते, उलटी होते.

प्रवासाला जाताना आपण नेहमी हलका आहार घेतला पाहिजे. जड पोट घेऊन प्रवासास गेल्यास उलटीचा त्रास होऊ शकतो.

सर्वप्रथम आपण प्रवासात आपले कान नेहमी झाकले पाहिजे. म्हणजे हेडफोन्स वगैरे घालून देखील आपण झाकू शकतो.

यामुळे कानात हवा जाणार नाही आणि त्यामुळे डोकेदुखी होणार नाही. तसेच गाणी ऐकत असल्याने उलटीचा विचार येणार नाही.

तसेच लिंबू, पुदीना, आले, वेलची आणि लवंग अशा गोष्टी जवळ ठेवायला पाहिजे. या पदार्थांचे सेवन केले किंवा त्यांचा फक्त वास घेतला तरी आपली मळमळ थांबते.

३. रात्री अचानक डोकेदुखी जाणवल्यास – डोकेदुखी ही सहसा आपल्या रोजच्या दिनचर्येवर अवलंबून असते. आपल्या जेवणाच्या वेळांमध्ये बदल झाल्यास, जास्त वेळ हवेत फिरल्यावर किंवा जास्तवेळ उपाशी राहिल्यावर आपल्याला अपचनाच्या जशा समस्या भेडसावू लागतात तशीच डोकेदुखीही येते.

डोकेदुखी ही अपचनाशी निगडित आहे. त्यामुळे नेहमी आपल्या आहारावर योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे. रात्री कधीकधी अत्यंत डोके दुखू लागते.

अशावेळेस तुम्ही एक उपाय करू शकता. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकावे. आणि मग त्यामध्ये काहीवेळ हात ठेवून बसल्याने आपली डोकेदुखी थांबू शकते. हा उपाय काहीसा पेनकिलर सारखा आहे. पण पेनकिलर मुळे कालांतराने होणारे दुष्परिणाम याने टाळले जाऊ शकतात. 

परंतु जर वारंवार डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांकडे जाणे सर्वात उत्तम असेल.

४) गरम भांड्याने किंवा वाफेने चटका बसल्यास- आपण नवीनच स्वयंपाक करत असू अथवा कितीही जुने असू, कधीकधी आपल्याला गरम भांड्यांचा चटका बसतो.

अशावेळेस भाजलेल्या जागेवर त्वरित उपाय न केल्यास त्या जखमेचे गंभीर जखमेत रूपांतर होऊ शकते. किंवा भाजलेल्या जागी डाग तसाच राहून जातो.

चटका बसल्यावर किंवा भाजल्यावर कधीही त्या जागेला थंडावा मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे जिथे भाजले आहे त्यावर तुम्ही कोरफडीचा गर लावू शकता, मध लावू शकता. यामुळे त्या जागेस मऊपणा भासतो व जखम लवकर बरी होऊ शकते.

तसेच घरात केळी असेल तर केळ्याचे साल तुम्ही त्या जखमेवर ठेवू शकता. केळी हेदेखील जखमेस थंड करण्यास मदत करते व त्यामुळे दाह कमी होतो.

रात्री झोपताना त्या जागेवर ऑलिव्ह तेल लावल्यासही लवकर आराम मिळू शकतो.

तर हे सर्व घरगुती प्राथमोपचार तुम्ही नक्की करून पाहू शकता. परंतु कोणतीही समस्या जर अतिगंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही योग्य असेल.

Manachetalks

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।