योगासनांनी करा छूमंतर डोकेदुखी आणि मायग्रेनला | सर्व आसनांची चित्रांसहित माहिती

छूमंतर करा डोकेदुखी आणि मायग्रेनला. रोज फक्त या 4 आसनांचा सराव करा.

डोकेदुखी ही सध्या नेहमीचीच तक्रार आहे. कामाच्या ताणाबरोबरच इतर काही समस्यांमुळे डोकेदुखी सुरु होते.

डोकेदुखी आणि मायग्रेनसारखी समस्या तुम्हांला वारंवार त्रास देत असेल तर घरच्या घरी करा हे सोपे उपचार.

योगासनांचं महत्व तर तुम्ही जाणताच, या चार आसनांचा रोजच्या व्यायामात समावेश करा आणि मायग्रेनसह डोकेदुखीला छूमंतर करा.

अपुरी झोप, कामाचा ताण, चुकीचा आहार, बदलतं वातावरण यामुळे खूप जणांना डोकेदुखीचा त्रास होतो.

ज्यांना मायग्रेन आहे त्यांनाच या रोगाचं गांभीर्य लक्षात येईल.

वातावरण बदललं की डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास सुरु होतो.

काही जण यासाठी स्ट्रॉंग औषधं घेतात, ज्यामुळं तात्पुरतं बरं वाटतं.

काही काळाने पुन्हा डोकेदुखी सुरू होते.

यावर कायमस्वरूपी उपचार हा योगासनांचा आहे.

खास करून ही चार योगासनं तुम्हांला मदत करू शकतात.

1. बालासन

बालासन मुळे मेंदू शांत होतो.

या आसनासाठी वज्रासनात बसा. श्वास घ्या. दोन्ही हात सरळ डोक्यावर घ्या.

श्वास सोडत समोर वाका. हात आणि कपाळ जमिनीला टेकवा.

मंद श्वासोच्छ्वास सुरू ठेवा. बोटं एकमेकांत गुंतवून डोकं दोन्ही हाताच्या मध्ये ठेवा.

सावकाश या स्थितीतून बाहेर पडा.

balasan

2. सेतु बंधासन

या आसनामुळे रक्तप्रवाह सुधारतो.

हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा. पाय गुडघ्याशी दुमडून जमिनीला समांतर ठेवा.

त्यानंतर हातावर जोर देऊन पोट आणि मांड्या उचला.

दीर्घ श्वास घ्या आणि बाहेर सोडा. काही वेळ या स्थितीत राहून सावकाश आसन सोडा.

आसन करताना शरीर एखाद्या पूलासारखं दिसतं. म्हणून हे सेतू बंधासन.

setubandhasana

3. पदंगुष्ठासन

या आसनासाठी पायात अगदी थोडे अंतर घेऊन उभे रहा. हळूहळू कमरेतून वाका.

आणि पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करा. आणि काही मिनिटं या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.

या आसनामुळे डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो, आणि डोकेदुखी पळून जाते. ही कृती पाठदुखी थांबवण्यासाठीचा सुद्धा त्वरित उपाय आहे.

yogasan

4. पश्चिमोत्तानासन

हे आसन करण्यासाठी जमीनीवर बसा, पाय शरीरासमोर सोडा.

दीर्घ श्वास घेऊन पायांवर वाका आणि पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा.

हळूहळू आता डोकं गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करा.

काही वेळानंतर सावकाश ही स्थिती सोडून नॉर्मलला या.

पश्चिमोत्तानासन

औषधांचा भडिमार चालू केलात तर शरीराला त्रास होऊ शकतो.

त्यापेक्षा योगासनं कधीही उत्तमच.

त्यामुळं या 4 आसनांचा नियमित सराव करा मायग्रेन आणि डोकेदुखी दूर करा… तेही अगदी खात्रीपूर्वक!!

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।