‘डुलकी’ किंवा ‘दुपारची छोटी झोप’ किंवा ‘वामकुक्षी’ घेण्याचे फायदे

आपल्याला कुठल्याही कामाचा कंटाळा आला की पहिले डोक्यात येते की, एखादी छोटीशी डुलकी काढु आणि मग उरलेले काम पूर्ण करू. इतकंच नाही दुपारी नियमाने वामकुक्षी घेण्याची सवय सुद्धा बरेच ठिकाणी असते.

तुम्हाला माहिती आहे का, की हे डुलकी प्रकरण तसं पाहायला गेलं तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय हितकारक आहे!!

डुलकी घेणे हे फक्त लहानग्यांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी देखील तितकेच उत्तम आहे.

संशोधन सांगते की प्रौढ व्यक्तिंनी दुपारी घेतलेली ‘झोप’ म्हणजे छोटीशी डुलकी हे स्मरण शक्ती वाढवण्याचे उत्तम साधन असून तुमच्या दैनंदिन जीवनात असलेला तणाव दूर करून नोकरी वरची किंवा कुठल्याही कामावरची तुमची कामगिरी सुधारण्याचे काम ही छोटीशी डुलकी करते.

तुमच्या खराब मूडचे रूपांतर आनंदी मूडमध्ये करून तुम्हाला अधिक एकाग्र करण्यात ‘डुलकी’ चा हातभार असू शकतो. इतकंच नाही तर, तुमची स्मरणशक्ती सुधारुन तिला चालना देण्याचे काम सुद्धा ‘डुलकी’ करू शकते.

‘डुलकी’ किंवा ‘दुपारची छोटी झोप’ किंवा ‘वामकुक्षी’ घेण्याचे फायदे

१) आठवण साठवणीत महत्वाची भूमिका

संशोधन सांगते की आठवणींची साठवण करण्यात झोप महत्त्वाची भूमिका बजावत असून, एक डुलकी तुम्हाला रात्रीच्या झोपेइतकीच, आधी शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करू शकते.

डुलकी घेणे तुम्हाला चार चाकी चालवणे, एखादी गोष्ट समजून घेणे, तोंडी आठवण यासारख्या गोष्टी विसरण्यापासून दूर ठेवण्याचे महत्वाचे कार्य करते.

२) डोक्यामध्ये स्टोअर झालेली गोष्ट दीर्घ काळ लक्षात ठेवण्याचे साधन.

डुलकी तुम्हाला तुम्ही शिकलेली कोणतीही गोष्ट जसे एखादे गाणे म्हणणे, किंवा एखादा छोटा खेळ खेळणे इ. दीर्घ काळ लक्षात ठेवण्यासाठी मदत करू शकते,

अशा निष्कर्षापर्यंत अभ्यासक पोहोचले आहेत.

३) एकाग्रता कायम ठेवण्यास मदत

दिवसभर एखादे रटाळ काम वारंवार करावे लागत असेल, तेव्हा तुमचा परफॉर्मन्स चे दिवसभरात तीन तेरा वाजून जातात एक डुलकी तुम्हाला अधिक सुसंगत आणि एकाग्र ठेवण्यास मदत करू शकते असे अभ्यास सांगतो.

४) अस्वस्थता कमी करते

जर तुम्हाला अस्वस्थता जाणवत असेल, तर तुमचा मूड चेंज करण्यासाठी एक डुलकी घेण्याचा प्रयत्न करून बघा.

डुलकी घेतल्यामुळे किंवा झोप न येता तासभर विश्रांती घेतल्या मुळे तुमचा एखाद्या गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की झोपणे आणि विश्रांती घेतल्याने मिळणारा आराम हा मूड बूस्टर ठरतो.

५) थकवा घालवण्यात सक्षम

तुम्हाला थकवा जाणवत आहे परंतु काम करणे अतिशय गरजेचे आहे अशा वेळी, काम पूर्ण करण्यासाठी किंवा अभ्यास करत असल्यास, कॉफी पिण्यापेक्षा झोपी जाणे चांगले. कॅफिनच्या तुलनेत, डुलकी घेतल्याने स्मरणशक्ती आणि शिकणे चांगले होऊ शकते.

जर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला एखाद्या कारणाने किंवा प्रवासामध्ये एखादा दोन दिवस रात्री झोप येणार च नाही तेव्हा तुम्ही कॅफीन वापरण्यापेक्षा वेळेआधीच डुलकी घेऊन तयारी करणे चांगले आहे.

डुलकी जितकी जास्त तितकी चांगली. जर तुम्हाला कॅफीनचा अवलंब करावा लागत असेल, तर एका मोठ्या कप पेक्षा छोटे छोटे डोस पिणे कधी ही सोईस्कर ठरते.

६) तनाव मुक्ती ची पहिली पायरी

जर तुम्ही प्रचंड तणावाखाली काम करत असाल तर, कसला ही विचार न करता मस्त ताणून द्या, एक छोटीशी डुलकी तुम्हाला तणावमुक्त करू शकते आणि तुमचे रोगप्रतिकारक क्षमता सुधारू शकते.

तज्ञांचा असा कयास आहे की 30 मिनिटांची झोप ही तनाव मुक्ति ची पहिली पायरी असू शकते.

७) मानसिक आरोग्य स्वस्थ रखण्यास मदत

एक डुलकी तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यास देखील मदत करू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे, की जे लोक 45 ते 60 मिनिटे झोपतात त्यांचा मानसिक तणावानंतर रक्तदाब कमी होतो. त्यामुळे एक डुलकी तुमच्या शरीराला दबावाने भरलेल्या परिस्थितीतून सावरण्यास मदत करू शकते.

अभ्यासात असे दिसून आले की दुपारी 1 आणि ३ वाजे दरम्यान 30-मिनिटांची घेतलेली वामकुक्षी आणि सोबतच संध्याकाळी चालणे आणि स्ट्रेचिंग यासारखे मध्यम व्यायाम एकत्रित केल्याने रात्रीची झोप सुधारण्यास मदत होते.

मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले होऊ शकते.

८) बालवयातील बुद्धी विकासास चालना

अनेक 3 ते 4 वयोवर्षाची मुले बालवाडीत प्रवेश करण्यापूर्वी खूप वेळ झोपणे बंद करून टाकतात.

खरं म्हणजे, त्या वयात शिकण्यासाठी आणि विकासासाठी ‘डुलकी’ अतिशय महत्त्वाची असते. जी मुले नियमितपणे झोप घेतात ते शिकलेल्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास सक्षम असतात.

त्या वयात अल्पकालीन मेमरी स्टोअर्स मर्यादित असल्याने, लहान मुलांना वारंवार झोपेची आवश्यकता असते. त्या मुळे पुरेशी झोप घेण्याची सवय आपल्या मुलांना लावली पाहिजे.

झोपेतून जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी, तुम्हाला ते योग्य वेळेत करणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांना दुपारची स्नूझ सर्वात नैसर्गिक आणि उपयुक्त वाटेल. काही लोक म्हणतात की झोप दुपारी 2 ते 3 दरम्यान चांगली असते,

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।