हातापायांना आलेल्या मुंग्या जाण्यासाठी पाच घरगुती उपाय

हातापायाला मुंग्या यायचा त्रास होतोय? हातापायाला मुंग्या आल्यावर काय करायचं, मुंग्या कमी कशा करायच्या?

मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या मुंग्या का येतात, त्यावर घरगुती उपाय आणि त्यासाठी घ्यायची काळजी!

खूप वेळ मांडी घालून बसलं तर पायाला किंवा खूप वेळ एका कुशीवर झोपलं तर हाताला मुंग्या बऱ्याच जणांना येतात.

आणि मग हातापायाची थोडी हालचाल केली की बरं वाटतं.

या मुंग्या का येतात याबद्दल आपण विचार करत नाही, जरा हालचाल करून बरं वाटलं की सोडून देतो.

काहींना मात्र या मुंग्यांचा जरा जास्तच त्रास होतो. हात एकाच स्थितीत जास्त वेळ राहिला किंवा काही जड उचललं तरी मुंग्या येतात. अशांनी वेळेतच वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत

पण ज्यांना हा मुंग्यांचा किरकोळ त्रास आहे (आपल्यापैकी बहुतेक सगळेच जण) त्यांना या मुळे फारच वैताग येतो म्हणूनच अशांसाठी मुंग्या येण्यामागची कारणं, त्यासाठी घरगुती उपाय आणि काय काळजी घ्यायची ते कळावं म्हणून आज आम्ही हा लेख घेऊन आलोय.

हाता-पायाला मुंग्या येतात म्हणजे नक्की काय होतं?

मुंग्या येणं याला वैद्यकीय भाषेत ‘पॅराथिसिया’ म्हणतात.

मुंग्या येतात म्हणजे खरंतर आतल्या बाजूने टोचल्यासारखं वाटतं किंवा जळजळ झाल्यासारखी वाटते.

सहसा पॅराथिसियामुळे त्रास होतो म्हणजे फक्त थोड्यावेळासाठी इरिटेशन होतं पण त्यापलीकडे त्याचे काही गंभीर परिणाम नसतात आणि त्यासाठी कोणत्याच उपचारांची गरज नसते.

पण जर पॅराथिसिया होण्याचं कारण काही वेगळं असेल तर या मुंग्या अशा आपोआप जात नाहीत, त्याला मग उपचारांची गरज असते.

ज्या अवयवाला मुंग्या येतात त्या अवयवाच्या एखाद्या नसेवर दाब येऊन त्याचा रक्तपुरवठा तात्पुरता खंडित झालेला असतो. म्हणूनच थोडी हालचाल केल्यावर तिथला रक्त पुरवठा पुर्वव्रत होऊन मुंग्या जातात.

पण जर या मुंग्या अशा साध्या हालचालीने जात नसतील किंवा वारंवार येऊन खूप काळासाठी राहत असतील तर त्यामागची कारणं वेगळी असू शकतात, जसं की,

  • एखाद्या महत्वाच्या नर्व्हची दुखापत
  • ट्रॉमा
  • हार्मोनल इम्बॅलन्स
  • ऱ्हुमॅटॉइड अर्थ्रायटिससारखे आजार
  • मज्जारज्जूचे विकार
  • किडनीचे विकार
  • लिव्हरचे विकार
  • ट्युमर
  • स्ट्रोक
  • थायरॉईड
  • किमोथेरपीचे साईड इफेक्ट

पॅराथिसियाची मुंग्या येण्या व्यतिरिक्त अजूनही काही लक्षणं असतात.

  • मुंग्या आलेला अवयव बधिर होणे
  • त्या अवयवाची आग होणे
  • अशक्तपणा

जर आलेल्या मुंग्या लवकर जात नसतील किंवा वारंवार मुंग्या येऊन वरच्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणं दिसत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पण जर मुंग्यांचा किरकोळ त्रासाने कंटाळला असाल ते कोणते घरगुती उपाय करायचे ते आपण बघू.

हातापायाला आलेल्या मुंग्या घालवण्याचे घरगुती उपाय

१. मसाज

मुंग्या येणाऱ्या भागाला नियमितपमे साध्या खोबरेल तेलाने मसाज केला तरी मुंग्या यायचं प्रमाण खूप कमी होतं.

मसाज केल्याने तिथल्या नसा मोकळ्या होतात आणि त्या भागाचा रक्तपुरवठा सुधारतो. रक्त पुरवठा व्यवस्थित झाला की मग मुंग्यांचा त्रास होत नाही.

२. गरम शेक

गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने शेकल्यावर सुद्धा रक्त पुरवठा सुधारतो. मुंग्या येणाऱ्या भागातल्या नर्व्हज सुद्धा शेकण्यामुळे मोकळ्या होतात आणि मुंग्यांचा त्रास कमी होतो. गरम पिशवी घेऊन मुंग्या येत असतील त्या भागावर ठेऊन पाच ते सात मिनिटं, असं दिवसातून दोन-तीनदा शेकलं तर मुंग्यांचा त्रास नक्कीच कमी होईल.

३. एप्सम सॉल्ट

एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे नर्व्हज मधलं इंफ्लेमेशन कमी होते आणि असं झालं की मुंग्या येण्याचं कारणच राहत नाही.

यासाठी एका टबमध्ये एक चमचा एप्सम सॉल्ट टाकायचं आणि मुंग्या येणारा भाग त्यात अर्धा तास बुडवून ठेवायचा. दिवसातून एकदा जरी हा उपाय केला तरी बराच फरक पडतो.

४. दालचिनी

दालचिनीमध्ये मँगनीज आणि पोटॅशिअम खूप प्रमाणात असतं. या दोन्हीचा रक्त पुरवठा सुधरवायला उपयोग होतो म्हणूनच दालचिनी हा मुंग्यांवर फार प्रभावी उपाय आहे कारण मुंग्या येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रक्तपुरवठा कमी होणं. एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास गरम पाण्यात घालून रोज एकदा घेतलं तर या उपायाचा लगेच फायदा होईल.

५. दही

हा सगळ्यात सोपा उपाय आहे, यात काय करायचं आहे तर रोज फक्त थोडं दही खायचं आहे.

दह्यात मँगनीजचं प्रमाण खूप जास्त असल्याने त्याचा रक्त पुरवठा सुधरवण्यासाठी फायदा होतो.

जर तुम्हाला इतर काही पथ्य असतील, दही चालत नसेल तर मात्र हा उपाय करू नये.

मुंग्या आल्यावर काय करायचं, मुंग्या कमी कशा करायच्या यावरचे हे ५ उपाय झाले.

पण मुंग्या येऊच नयेत म्हणून काय काळजी घ्यायची?

१. एका जागी फार वेळ बसून राहू नये. कामाचं स्वरूपच बसण्याचं असेल तर दर तासाभराने उठून थोडी हालचाल करावी.

बसल्या बसल्या सुद्धा हात-पाय-मान यांचे किरकोळ व्यायाम करावेत.

२. जेवणात व्हिटॅमिन बी १२ चं प्रमाण वाढवा. अंडी, नॉनव्हेज, दूध यामध्ये व्हिटॅमिन बी १२ जास्त प्रमाणात आढळतं. जेवणात भरपूर हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य घ्यावीत.

३. सिगारेट, तंबाखू, दारू या व्यसनांचा आपल्या नर्व्हस सिस्टीमवर विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे त्यापासून लांब राहणंच आपल्या हिताचं आहे.

४. मधुमेह असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टरांच्या औषधाबरोबरच आहारात बदल आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. मधुमेह नियंत्रणाबाहेर गेला तर मुंग्यांचा त्रास वाढू शकतो म्हणून ही काळजी घ्यावी.

https://manachetalks.com/11572/acupressure-points-diabetes-hypertention-marathi-health-blog-manachetalks/

५. पोहणे, योगासनं यामुळे रक्तपुरवठा सुधारतो त्यामुळे हे व्यायाम आवर्जून करावेत.

६. आहारात व्हिटॅमिन ‘बी’ वाढवावे. मोड आलेली कडधान्य, गहू, ओट्स, दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये भरपूर प्रमाणात असतात.

७. जेवणात कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन वाढवावीत.

हातापायाच्या मुंग्या घालवण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना सुद्धा लेख शेअर करा.

यामुळे काहीच अपाय होणार नाही.. पण याने त्रास कमी झाला नाही तर डॉक्टरांना नक्की दाखवा आणि त्रास कमी झाला तर आम्हाला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका!

हा लेख लिहिताना आम्ही हे पाहण्याचा प्रयत्न केला कि, या विषयी इंटरनेट वर काय शोधलं जातं?

तर ‘मेंदूत मुंग्या येणे, डोक्यात मुंग्या येणे, जिभेला मुंग्या येणे, गालाला मुंग्या येणे यावर घरगुती उपाय’ असा शोधही खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण अशा आजारांसाठी इंटरनेटवर उपाय न शोधता डॉक्टरांना भेटावं.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।