भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवण्याचे दहा उपाय

 

बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते. यात भावनिक बुद्ध्यांक जास्त असणे हे आजकालच्या जगात खूप महत्त्वाचे आहे.

व्यावसायिक क्षेत्रात मुलाखत घेताना उमेदवाराचा EQ आवर्जून तपासला जातो. फक्त नोकरीच्या ठिकाणी नाही तर कोणत्याही नातेसंबंधांत यशस्वी होण्यासाठी भावनांक चांगला असावा लागतो.

या लेखातून आम्ही भावनांका बद्दलची सविस्तर शास्त्रीय माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचप्रमाणे भावनांक कसा वाढवावा यासाठी काही उपाय सुद्धा सांगणार आहोत.

भावनांक म्हणजे काय?

भावनांक अथवा भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या तसेच इतरांच्या भावना नीट समजून घेणे, त्यांचा योग्य रीतीने वापर करणे तसेच भावनांचे योग्य प्रकारे नियोजन करणे.

भावनिक बुद्धिमत्ता कुठे वापरली जाते?

  1. प्रभावी संवाद किंवा सुसंवाद साधण्यासाठी.
  2. सह अनुभूती म्हणजे एम्पथी अर्थात स्वतः ला दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवून त्यानुसार विचार करण्याची क्षमता.
  3. आव्हानांचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी.
  4. संघर्षमय प्रसंगात मध्यममार्ग काढण्यासाठी.
  5. ताणतणावांचे योग्य नियोजन करण्यासाठी.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की रोजच्या जीवनातील प्रसंग अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी आपली भावनिक बुद्धिमत्ता चांगली असली पाहिजे.

व्यावसायिक क्षेत्रात भावनांक चांगला असलेले कर्मचारी अधिक सक्षमपणे काम करू शकतात. त्यामुळे याचा फायदा अंतिमतः कंपनीला होतो.

याशिवाय मैत्री किंवा नातेसंबंध जपण्यासाठी आपल्या तसेच इतरांच्या भावना नीट ओळखून त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो.

थोडक्यात स्वतःचे आयुष्य समाधानकारक पद्धतीने जगणे आणि तसेच इतरांनाही जगू देण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता फार महत्त्वाची आहे.

भावनांक कसा मोजतात?

भावनांक मोजण्यासाठी विविध प्रकारच्या व्यक्तिमत्त्व चाचण्या केल्या जातात. यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे हे लक्षात येते.

यात निरनिराळ्या प्रसंगात ही व्यक्ती कशी वागते किंवा नेमका कोणता विचार करते हे ठरविणारी शास्त्रीय प्रश्नावली असते.

भावनिक बुद्धिमत्तेचे प्रकार कोणते?

पाच प्रकारच्या भावनिक बुद्धिमत्तांचे परिक्षण केले जाते.

  1. स्व उत्तेजन ( Internal Motivation)
  2. स्वत:च्या भावनांचे नियमन ( Self Regulation)
  3. स्व ची जाणीव ( Self Awareness)
  4. सामाजिक जाणीव (Social Awareness)
  5. सह अनुभूती (Empathy)

यावरुन EQ मोजला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर आपला भावनांक आवश्यकतेपेक्षा कमी असेल तर? तो वाढवता येतो का?

तर याचे उत्तर आहे, हो….

भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे शक्य आहे. पाहूया त्यासाठी कोणते उपाय आहेत.

भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याचे उपाय

१. इतरांशी संवाद साधताना अती आक्रमक किंवा अती भिडस्त राहू नये.

याऐवजी आपल्या गरजा व मागण्या ठामपणे पण इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा शब्दांत मांडाव्यात.

२. वादाच्या प्रसंगात रिॲक्शन देणे किंवा पटकन प्रतिक्रिया देणे टाळावे

त्याऐवजी रिस्पॉन्स म्हणजे योग्य तो प्रतिसाद द्यावा. यासाठी मतभेदाच्या प्रसंगात थोडा वेळ शांत राहून योग्य वेळी प्रतिसाद द्यावा.

यामुळे टोकाच्या भावनांचा कडेलोट न होता मतभेदातून मार्ग काढण्यासाठी पर्याय सुचू शकतात.

३. समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे.

वरवर ऐकल्यामुळे काही महत्त्वाचे मुद्दे निसटून जाऊ शकतात.

याशिवाय एकाग्रतेने ऐकल्यामुळे समोरच्या व्यक्तीची बॉडीलॅंग्वेज, न बोलता सुद्धा तिने साधलेला संवाद आपल्यापर्यंत पोहोचतो. दुसऱ्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून मगच त्यावर आपले मत द्यावे.

४. स्वत:ला प्रेरणा देणे.

स्वतःसाठी नवीन गोल, ध्येय आखणे व त्यावर सतत काम करणे. यामुळे तुम्ही स्वतःला आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देता. इतकेच नव्हे तर काही अडचणी आल्यास त्यातून मार्ग काढू शकता.

५. सकारात्मक विचार करणे

मेडिटेशन, व्यायाम, आहाराची नीट काळजी घेणे आणि सकारात्मक विचारसरणी, उत्तम वाचन यांद्वारे आपण स्वतःला तसेच आपल्या सभोवताली वावरणाऱ्या लोकांना आनंदी, उत्साही ठेवू शकतो.अशा व्यक्तीचा सहवास सर्वांना आवडतो.

६. स्वत:च्या भावना ओळखा

वेळोवेळी स्वतःचे विचार पडताळून पहा. त्यामागील भावना ओळखा. इतरांचे नीट निरीक्षण करून त्यांचे हावभाव, शब्द यामधून त्यांच्या भावना समजून घ्या.

यामुळे तुमचे संवाद कौशल्य वाढेल. तसेच परस्परांमधील संबंध सुधारण्यासाठी मदत होईल.

७. टीका मान्य करुन चुका सुधारणे

तुमच्यावर टीका झाली तर रागावणे किंवा आपली चूक मान्यच न करणे यामुळे तुमची प्रगती होऊ शकत नाही. आपले काय चुकले हे नीट समजून घ्या व त्यात सुधारणा करा.

८. सह संवेदना

स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून त्याचा दृष्टीकोन समजून घेणे हे आवश्यक कौशल्य आहे. यामुळे आपण इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकतो. संवाद अधिक चांगल्या प्रकारे होतो. पर्याय सुचतात व मार्ग निघतात.

९. नेतृत्व गुण अंगी बाणवा

जबाबदारी घेणे, आवश्यक ते निर्णय घेणे आणि त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेणे यामुळे नेतृत्व विकसित होते. अशी व्यक्ती इतरांना सोबत घेऊन जाणारी असते. या गुणांमुळे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात खूप प्रगती होते.

१०. सोशल स्किल्स वाढवा

तुम्ही हसतमुख, उत्साही, आनंदी आणि इतरांचे म्हणणे नीट ऐकून घेत असाल तरच लोक तुमच्याशी चर्चा करतील.

समाजात वावरताना संवाद किंवा हावभाव कसे असावेत. प्रभावी संभाषण कसे करावे याचा सतत अभ्यास करावा. समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व सर्वांना आवडते.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की भावनिक बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी संयम आणि प्रयत्न यांची गरज आहे. त्याचप्रमाणे वरीष्ठांकडून किंवा मित्रमंडळींकडून वेळोवेळी फीडबॅक घेण्याची सवय ठेवा. त्यानुसार आवश्यक ती सुधारणा आपल्या वागण्यात व बोलण्यात करा.

यामुळे तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचा अभ्यास करून आपले व्यक्तिमत्व परिपक्व बनवू शकता.

या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवण्याचे दहा उपाय”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।