भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देणाऱ्या डॉक्टर इंदिरा हिंदुजा

मार्च २०१६ ला भारतात एक वर्तुळ पूर्ण झालं. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडा हिने जसलोक हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच ज्या लोकांना मुलं नैसर्गिक पद्धतीने होत नाहीत अश्या लोकांसाठी वरदान ठरली आहे. स्त्रीचं बीज आणि पुरूषाचे शुक्राणू घेऊन त्याचं मिलन बाहेर केलं जाते. २-६ दिवस अतिशय नियंत्रित पद्धतीने त्याचं फलन झाल्यावर ते बीज स्त्री च्या युटेरस मध्ये सोडलं जाते. ह्या बीजापासून मग एक नवीन जीव स्त्रीच्या उदरात वाढू लागतो. आई – वडील होणाच्या सुखापासून वंचित राहिलेल्या अनेक जोडप्यांना हे सुख देणारी ही पद्धत १९७० ला सर रॉबर्ट एडवर्ड ह्यांनी विकसित केली. पण भारतात ही पद्धत विकसित करण्याचं श्रेय डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना दिलं जातं. ६ ऑगस्ट १९८६ ला डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांच्या प्रयत्नातून चावडा दांपत्याने भारतात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी ला जन्म दिला.

डॉक्टर इंदिरा हिंदुजा एका सामान्य कुटुंबातून पुढे आल्या. बेळगाव इथल्या म्युन्सिपल शाळेत त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. ज्या काळात मुलींना शिक्षण द्यायलाच विरोध केला जात होता अश्या काळात डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी आपलं शिक्षण सुरु ठेवलं. त्या कठीण काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना डॉक्टर बनण्याचं शिक्षण घे असं निक्षून सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई इकडे एक स्त्री रोग तज्ञ म्हणून त्यांनी आपलं कार्य सुरु केलं. आपला प्रवास उलगडताना त्या म्हणतात….

There were many turns and twirls in (my) life so whenever I could change difficulty into an opportunity, it was an ‘aha’ moment.

१९८५-८६ च्या काळात मनी चावडा ह्यांना लग्न होऊन ५ वर्ष झाली तरी गर्भधारणा होतं नव्हती. अनेक डॉक्टर आणि औषधं करून झाली पण यश येत नव्हतं. त्यांना एका डॉक्टर ने डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना भेटण्याचा सल्ला दिला. सल्लामसलती नंतर डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी एक क्रांतिकारी पाउल उचलण्याचा निर्णय घेतला. पण वाटचाल सोप्पी नव्हती. अनेक कायदेशीर प्रक्रियांतून डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना जावं लागलं. पण न डगमगता त्यांनी यशस्वीरीत्या भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आजवर तब्बल १५,००० पेक्षा जास्ती टेस्ट ट्यूब बेबी, डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी आय.व्ही.एफ. ह्या तंत्रज्ञानाने जन्माला आणल्या आहेत. डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्या इकडेच थांबल्या नाहीत त्यांनी भारतात जी.आय.एफ.टी. तंत्रज्ञानाने पाहिलं मुल ४ जानेवारी १९८८ ला जन्माला आणलं तर ओसाईट डोनेशन टेक्निक ने २४ जानेवारी १९९१ ला पाहिलं मुल भारतात जन्माला आलं. भारतात आज प्रत्येक ७-८ जोडीदारांमागे एका जोडप्याला मुल होण्यास अडचण येत असते. त्या सगळ्यांसाठी ह्या पद्धती वरदान ठरल्या आहेत.

एक काळ होता जेव्हा डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना अनेक अग्निदिव्यातून जावं लागलं. आय.व्ही.एफ. तंत्रज्ञांनासाठी असलेली लोकांची मानसिकता खूप वेगळी होती.

Many people continue to wrongly believe that IVF is a treatment for elderly couples, that complete bed rest is required during this treatment, and that surrogacy may contribute to the genetic makeup of the child.

पण अश्या परिस्थितीत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करून अनेक जोडप्यांचं स्वप्न पूर्ण करताना डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी भारतीय स्त्रीच्या कर्तुत्वाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. ह्यासाठी त्यांना २०११ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आजही मुंबईच्या पी.डी.हिंदुजा हॉस्पिटल मध्ये त्या कार्यरत असून अनेक जोडप्यांना आई-वडिल होण्याचं सुख देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. एका सामान्य कुटुंबातून प्रतिकूल परीस्थितीतून पुढे येतं आपल्या ज्ञानाचा फायदा भारतातील अनेक कुटुंबाना त्यांनी दिला.

डॉक्टर इंदिरा हिंदुजा
पहिली टेस्ट ट्यूब बेबी असलेली हर्ष चावडा आपल्या नवजात बाळाला घेऊन डॉक्टर इंदिरा हिंदुजांबरोबर

भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी हर्षा चावडा हिने ज्यांच्यामुळे आपला जन्म झाला त्या दोन्ही डॉक्टरना आपल्या बाळंतपणासाठी बोलावलं ज्यात डॉक्टर इंदिरा हिंदुजा आणि डॉक्टर कुसुम झवेरी ह्या होत्या. ३० वर्षापूर्वी ह्याच दोन डॉक्टरनी हर्षाला ह्या जगात आणलं होतं. हर्षा चावडा च्या मते डॉक्टर इंदिरा हिंदुजा माझी दुसरी आई आहे जिने मला ह्या जगात आणलं व आता माझ्या मुलाला ही ह्या जगात तिच्या हाताने आणणं हा तिचा सगळ्यात मोठा गौरव असेल. मार्च २०१६ ला हर्षा चावडा च्या मुलाला जन्म देताना डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांनी भारतात एका क्रांतिकारी पावलांच एक वर्तुळ पूर्ण केलं असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. भारतातल्या स्त्रियांना मातृसुख देऊन त्यांच्या आयुष्यात क्रांती आणणाऱ्या दुर्गाशक्ती डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना माझा सलाम.

वाचण्यासारखे आणखी काही…

व्यक्तिमत्व


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देणाऱ्या डॉक्टर इंदिरा हिंदुजा”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।