रात्री वारंवार उठावं लागत असेल तर, या काही टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्हाला उबदार अंथरूण रात्री सोडावं लागणार नाही.
सोशल मिडीया वर नुकताच एक व्हिडिओ बघीतला. रात्री उशिरा एक तरुण उठतो आणि वॉशरूमकडे धाव घेतो.
काही सेकंदातच हा तरुण अंथरुणावर खडबडून जागा होतो.
वॉशरूमकडे घेतलेली धाव हे एक स्वप्नच होतं…
हा अनुभव तुम्ही पण घेतला असणार. आणि स्वप्नातून जागं झाल्यावर वॉशरूमकडे जाण्याचा काही सेकंदाचा प्रवास तुम्हांला असह्य वाटला असणार.
थंडगार रात्री पांघरुणात मस्त गुरफटून झोपणं आणि अचानक रात्री जाग येणं हे कॉमन आहे.
खरंतर उबदार पांघरूणातून बाहेर पडायचं अतिशय जीवावर येतं. पण नाईलाजाने तुम्हाला उठावंच लागतं.
नाहीतर मग झोप लागत नाही. रात्री असं उठावं लागू नये म्हणून तुम्ही संध्याकाळपासून पाणी किंवा ड्रिंक्स कमी पिता तरीही फरक पडत नाही का?
तर मग आज आम्ही तुम्हाला काही छोट्या टिप्स सांगणार आहोत.
रात्री वारंवार वॉशरूमला जाण्यासाठी उठावं लागण्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे?
1) अति ऍक्टिव्ह असणारं मूत्राशय
मानवी शरीरात साधारण दिवसभरात 1 ते 2 लिटर लघवी तयार होते.
त्यातली फक्त 25% रात्रीच्या वेळी तयार होते.
तेव्हा खरं तर रात्रभर एकदाही लघवीची भावना होता कामा नये.
पण रात्री तुम्हाला दोन ते तीन वेळा उठावं लागत असेल तर तुमचं मूत्राशय अती ऍक्टिव्ह असणार.
बहुतेक वेळेला स्त्रियांना रात्री जास्त वेळेला उठावं लागतं.
ज्यांना शुगर आहे त्यांना रात्री उठावंच लागतं असाही एक समज आपल्याकडे आहे.
मात्र यामागे खरं कारण काय आहे? जाणून घेऊया.
1) झोपण्याअगोदर खूप खाणं किंवा खूप प्रमाणात लिक्विड घेणं.
2) अँटीड्युरेटिक हार्मोन्स मध्ये (एडीएच मध्ये) बिघाड, हा तोच हार्मोन आहे जो रात्री कमी लघवी निर्माण करण्याची हमी देतो.
3) बिघडलेलं मूत्रपिंड
4) मूत्राशय विकार
5) पुरुषांमध्ये असणारी प्रोस्टेट समस्या
6) एडेमा निर्मिती, ज्याला द्रव जमा होणं म्हटलं जातं
7) काही प्रकारचे औषधोपचार
8) शरीरात असणारे अंतर्गत बिघाड
डॉक्टरांकडं जावं की नाही ?
रात्री सारखं उठावं लागत असेल तर एक सलग विश्रांती होत नाही. झोप होत नाही.
या समस्येवर डॉक्टरांकडं जावं की न जावं?
कधीतरी रात्री एखाद-दुसरा वेळेला उठावं लागलं तर हरकत नाही पण रात्री उठण्याचं प्रमाण रोजच असेल आणि खुप वेळा जावंच लागत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
खाण्यापिण्याच्या सवयी, हार्मोन्स बॅलन्स मूत्राशय किंवा प्रोस्टेटचा विकार मूत्रमार्गातलं इन्फेक्शन अशा अनेक गोष्टी त्यामागे असू शकतात. किडनीला सूज असू शकते.
या समस्यांचं डॉक्टरांकडून योग्य निदान झालं तर योग्य उपचार करून समस्या कमी करता येऊ शकते.
“हे” करून पहा.
डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही सोपे उपाय करून पहा. याने काही किरकोळ प्रॉब्लेम असेल तर रात्री वारंवार उठण्याची समस्या दूर होईल.
1) रात्री ८ नंतर काहीही पिऊ नका. दिवसभरात पुरेसं पाणी प्यायला असाल तरंच रात्री पाण्याची गरज लागणार नाही.
2) चहा कॉफी किंवा अल्कोहोलचं प्रमाण मर्यादित ठेवा.
3) तुमचे पाय दिवसभरात सुजतात का ?
आडवं पडून पायाखाली उशी ठेवा, किंवा पायाच्या तळव्यापासून गुडघ्यापर्यंत असणारे पायाला गुंडाळून ठेवणारे स्टॉकिंग्ज वापरा.
4) झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता त्याकडं लक्ष द्या. पचन हे सुद्धा लघवी तयार होण्याला उत्तेजित करते.
5) यातून काहीच फरक पडला नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या.
रात्री एक सलग, पुरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
झोप पुन्हा पुन्हा मोडत असेल, लघवीला उठावं लागत असेल तर वेळीच लक्ष द्या. आणि शांत झोप घ्या.
रात्री वारंवार लघवी होण्याबद्दल इतर सखोल माहिती, त्याची करणे, लक्षणे आणि उपाय समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.