रोज नित्यनेमाने रोजच्या कामाचा कार्यभार पार पाडावा लागतो. रोजच्या कामात नाविन्यता आणणे हा एकच नियम रटाळवाण्या आयुष्यात आनंद फुलवत असतो. आळस, कंटाळा, जडत्व आणि निरुत्साह हे सारे मनाचे खेळ आहेत. ते मनाचे खेळ; मनाचे शत्रु बनत असतात. कधी कधी एका एकाने व कधी सर्व मिळून झुंडीने मनाचा ताबा घेतात. यास शड रिपू म्हणता.
जीवन जगणे हा नियम असला तरी प्रफुल्लित जगणे हा दुःख दैन्य कमी करण्याचे एक औषध आहे. हे औषध आयुष्यात प्रत्येक क्षणी स्वर्गीय आनंद देतो. तो स्वर्गीय आनंद प्रत्येक कामात यश व सफता आपोआपच देत जातो. “आनंदाचे डोही आनंदी तरंग” हा अभंग आनंदाने जगण्याचे रहस्य सांगून जातो. मनुष्य हा अथांग आहे. त्याचा उलगडा होणे अवघड आहे.
त्या अथांगात आनंदाचे तरंग उठले की आयुष्य परमोच्च आनंदास गवसणी घालते. अशा प्रत्येक वेळी मला कठीण प्रसंगात उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारा ‘प्रज्वल’ नेहेमी आठवतो.
आठव्या वर्गात असतानाची एक घटना आहे. गावातील एका मामाची नववी का दहावीची परीक्षा होती. त्यास लिहिण्याचा त्रास असल्याने मला लेखनिक म्हणून सोबत नेले होते. नांदेड शहराजवळील एका खेड्यात परिक्षा होती. त्या परिक्षेस पाच ते सहा दिवस तेथे राहावयाचे होते. शहरात एक एल्लप मामा म्हणून गृहस्थ आहेत यांच्याकडे रहाण्याचे ठरले.
तेथील सहा सात दिवसाच्या मुक्कामी कंटाळा आला की मी थोडा फेरफटका मारत असे. त्या वेळेस शहाण्या माणसासारखे बसून रहाने मला जमले नाही. रेल्वे स्टेशनला येऊन वेळ घालवत असे. एक व्यक्ती रोज रेल्वे स्टेशनवर जर्र फाटक्या कपड्यात भिक मागायचा.
त्यांने एका कोपर्यात रोज झोपण्यासाठीची सुरक्षीत जागा पकडली होती. तो फिरताना सर्व पसारा त्या पोत्यात टाकून ठेवायचा. रिकाम्या वेळेत तेथे फिरायला गेल्यानंतर दोन दिवसांपासून त्यांचे निरिक्षण करत होतो. तो खुप गयावया करून भिक मागायचा. खुप जिद्दीने भिक मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. त्या व्यक्तीच्या तळमळीत वेगळेपणा भासला व वाटलं. भीक मागण्यात एक आर्त हाक होती. पाच ते साडे पाच वाजता मी वापस परत फिरायचो पण थोडा वेळ येथेच घालवायचा असं मी ठरवलं.
तो भिकारी साडे पाच वाजता गडबडीने पोते ठेवलेल्या कोपर्याकडे निघाला. काही तरी झालं असं वाटून मी ही त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो त्या पोत्याजवळ बसून आतूर नजरेने बाहेरच्या गेटकडे पुन्हा-पुन्हा पाहात होता. तितक्यात एक मुलगा माझ्याच वयाचा. हातात पिशवी घेऊन येत असलेला दिसला. तेव्हा त्या भिकार्याच्या चेहर्यावर हासू खुलले. तो मुलगा त्याच्या गळ्यात पडला. त्या भिकार्याने एक पॅकिंग पार्सल मुलापुढे ठेवून खावया सांगितले. तो खात खात आजचा शाळेतील अभ्यास बापास सांगत होता. बापाच्या आनंदास पारावार नव्हता. बोलता-बोलता मुलाने शाळेत मागितलेल्या फिस बद्दल बापास सांगितले. तेव्हा बापाचा चेहरा सर्रपणे उतरला. दिवसात जमलेले पैशे मोजू लागला. पूर्ण मोजून झाल्यावर मुलास तो म्हणाला, “बेटा! निदान पैसे पूर्ण होण्यासाठी दोन दिवस तरी लागतील.”
मुलगा म्हणाला, “एक दिवस शाळा बुडवून तुम्हाला मदत केली तर चालेल का?” बापाचा कंठ दाटून आला. तुझी आई जीवंत असती तर आज तुझ्या फिसचे पैसे देऊन झाले असते. गावात तुझा वर्ग असला असता तर येथे येऊन भिक मागत फिरायची गरज भासली नसती. हे सर्व संभाषण ऐकूनच माझ्या मनात गलबलून गेलं. मला आईने खर्चासाठी दिलेले पन्नास रूपये माझ्याकडे होते. त्यातले मी विस रूपये त्यांना दिले. तेथून पळ काढला तितक्यात त्या छोट्या प्रज्वलचा आवाज कानावर आला. आवाजात कंठ दाटून असलेला मला ऐकू आला. भाऊ थांब भाऊ थांब असा आवाज हळूहळू विरत चालेला होता. मी रोज थांबायच्या ठिकाणी आलो. ते रेल्वे स्टेशनच्या खुप जवळ होतं.
जेवण झाल्यानंतर मला लवकर झोपच आली नाही. मला त्या भिकारी बापाचा प्रज्वल आठवला. त्यांचे वडील आणि भिक मागायला कारणीभूत असलेली परिस्थिती पुन्हापुन्हा डोळ्यापुढे येऊ लागली. मामाची परिक्षा बुधवारी संपणार होती. शनिवारचा दिवशी परीक्षेचा पेपर एक वाजता संपला. दोनवाजता वापस आल्या आल्या मी थेट रेल्वे स्टेशनकडे धुम ठोकली.
शनिवार असल्यामुळे प्रज्वल लवकर येणार होता हे लक्षात आले होते. तो तेथे कोपर्यात अभ्यास करत बसला होता. त्यांनं मला ओळखलं आणि तो गळ्यात पडला. तो आठवीत व मी ही त्याच वर्गात शिकत होतो. मी तेथे बसलो व आम्ही अभ्यासावर चर्चा करू लागलो. अशाही परिस्थितीत त्याचा अभ्यास उत्कृष्ट होता. त्याच्या चर्चेतून लक्षात आले.
मी थोडीशी त्याची वैयक्तिक चर्चा केली. त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले. आई गेली बाबाच माझे सर्वस्व झाले. गावात शेती नाही. माझा आठविचा वर्ग नाही. वस्तीगृहात ठेवावे तर वस्तीगृहात आम्हास प्रवेश नाही. मग वडीलांना हाच एक मार्ग सुचला. ओळख पाळखीने काम शोधण्याचा प्रयत्न केला तर काम मिळाले नाही. मिळाले तर दिवसरात्र काम होते. ते करता आले नाही. कोणीतरी चोरी केली मालकांने बाबाला कामावरून काढून टाकलं . मला शिकायच आहे आणि मला शिकवायचं या प्ररनेने आम्ही येथे आलो. मला बर्यापैकी शाळेत प्रवेश मिळाला. संसार आम्ही येथे थाटला. कोठेतरी कामाची व राहाण्याची व्यवस्था होईपर्यंत बाबा भिकार्याचा अभिनय सोडतील असं मला वाटत नाही . सकाळी सकाळी लंगरचं जेवण मिळतं. संध्याकाळच्या जेवणाची थोडीफार व्यवस्था कशीबशी होते. दिवस निघून जातो.
मला माझा भुतकाळ आठवला व वर्तमानानं खुनावलं. भविष्याचे स्वप्न आकार घेण्याचा काजवा मनात चमकला. आपलं ही आयुष्य असंच आहे याची जाणीव मनाला झोंबली. माझ्या आयुष्यातलं सर्व जे काही होतं ते मानवनिर्मित होत. माझं आई रुपी विद्यापीठ असं भक्कम होत. हालअपेष्टा, काबाडकष्ट सोसत सोसत आई-बापाचं दुहेरी प्रेम त्या विद्यापीठातू मिळत होतं.
आयुष्य किती भन्नाट असतं. प्रेत्येकाचे प्रश्न व दुःख वेगळे असतात. मार्ग स्वःताला काढावयाचे असतात. उरलेले दोन तीन दिवस उरलेल्या वेळात प्रज्वल सोबत काढले. एक मीत्र व सोबती म्हणून एकमेकांचे सुःख दुःखाचे क्षण एकमेकांना समजले. आठवणीच्या तिजोरीत कायमचे जमा झाले.
शेवटच्या दिवशी निरोप घेताना मात्र त्याला आश्रू आवरता आले ना मला. पुन्हा कधीतरी भेटु असे म्हणून निरोप घेणार येवढ्यात त्याच्या वडीलांनी माझ्यासाठी खाऊ आणून दिला. तेवढ्यात एक छोटी मुलगी भिक मागायला आमच्यापुढे येऊन उभी टाकली. तो खाऊ मी तीस देऊन टाकला. मी खिशातून एक रुपया काढला. तीच्या हातावर रूपया ठेवणार तितक्यात प्रज्वल व त्यांचे वडील यांनी सुध्दा एक एक रूपया हातावर ठेवला. त्या मुलीची कळी खुलली. त्या गोष्टीचा आनंद तिघांनाही झाला. तिघांनीही एक एक रुपया हातावर ठेवनं हे काही ठरवलं नव्हत. ते आचानक घडलं होतं.
मी निघालो माझ्या आयुष्यात. प्रज्वल आणि त्यांच्या वडीलांचा निरोप घेऊन. अन् प्रज्वलच्या मनातील कठीण समयी सुध्दा शिक्षणाचा मिनमिनता काजवा व शेवटच्या क्षणी छोट्या मुलीच्या चेहर्यावर वर खुललेला आनंद घेऊन.
मी जेव्हा केव्हा रेल्वेस्थानकावर जातो तेव्हा प्रज्वल थांबायच्या जागेकडे पाहातो. वेळ असेल तर तेथेच रेंगाळतो. हा आयुष्यातला सत्य अनुभव वीस बावीस वर्षानंर ही बळ रुपाने नेहमी माझ्या सोबत असतो आणि प्रत्यक्ष प्रज्वल भेटण्याच्या प्रतिक्षेत…….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very nice