काखेतील काळेपणा घालवण्याचे घरगुती उपाय

शरीराच्या त्वचेच्या रंगापेक्षा काखेतील त्वचेचा रंग थोडा डार्क असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु काखेतील त्वचा जर फारच गडद असेल तर ते दिसताना वाईट दिसते आणि त्यामागे जी कारणे आहेत ती आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाहीत.

शिवाय स्लीवलेस कपडे घालणाऱ्या महिलांना देखील असा डार्क रंग दिसलेला आवडत नाही.

आज आपण काखेतील त्वचा जास्त काळसर असण्याची कारणे आणि त्यावर करण्याचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

काखेतील त्वचा काळसर का होते?

काखेतील त्वचा काळसर होण्याचे प्रमुख कारण स्थूलता हे आहे. त्या व्यतिरिक्त हार्मोन्समध्ये होणारे बदल देखील ती त्वचा काळसर होण्यास कारणीभूत असतात. मोठ्या प्रमाणात जंक फूड खाणे, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अतिरिक्त ताण तणाव या सगळ्यामुळे वजन वाढते. तसेच हार्मोन्समध्ये ही बदल होतात. त्याच कारणामुळे काखेतील त्वचा काळसर पडते. त्या व्यतिरिक्त काही गंभीर आजारांमध्ये ही त्वचा काळसर पडू शकते

टाईप टू मधुमेह, शरीरातील इन्शुलिनचे वाढते प्रमाण अत्याधिक स्थूलपणा, व्यायामाचा संपूर्ण अभाव ह्या कारणांमुळे काखेतील त्वचा काळसर होते.

काहीवेळा कॅन्सर, टाइप २ डायबिटीस, पी सी ओ डी,  अशा गंभीर आजारांमध्ये अशी त्वचा काळसर पडू शकते काही औषधांचे साइड इफेक्ट म्हणून देखील त्वचा होऊन काळसर होते. त्यात प्रामुख्याने गर्भनिरोधक गोळ्या आहेत.

काखेतील त्वचा काळी पडू नये म्हणून काय करावे?

संतुलित आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास ह्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. तसेच जरी काखेतील त्वचा काळी पडली असेल तरी योग्य आहार आणि व्यायाम आणि काही घरगुती उपाय वापरून ती पूर्ववत करता येऊ शकते.

खालील काळजी घेणे आवश्यक आहे.

१. वजन खुप जास्त वाढू देऊ नये.

२. काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करू नये.

३. डिओड्रंटचा अतिवापर करू नये.

४. काखेतील त्वचा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. काही वेळा डेड स्किनचे थर तेथे साठून तिथली त्वचा काळी दिसू शकते. ती नीट स्वच्छ करावी.

५. फार घट्ट कपडे वापरू नयेत. त्यामुळे घर्षण होऊन तेथील त्वचा काळी पडते.

६. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा.

काखेतील त्वचेचा काळेपणा घालवण्याचे घरगुती उपाय 

खालील उपाय वापरून आपण सोप्या पद्धतीने घरच्याघरी काखेतील त्वचेचा काळसरपणा दूर करू शकतो.

१. ऍपल सायडर व्हिनेगर 

२ चमचे ऍपल सायडर व्हिनेगर आणि २ चमचे बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट काखेतील त्वचेला लावावी. पेस्ट संपूर्ण सुकल्यावर धुवून टाकावी. हा उपाय आठवड्यातून ३ वेळा करावा. नक्की फरक दिसतो.

२. कोरफडीचा गर 

त्याच्या कोरफडीचा गर काढून तो काखेतील त्वचेवर लावावा. १५ ते २० मिनिटांनी धुवून टाकावा. हा उपाय दर एक दिवसाआड करावा. निश्चित फरक पडतो.

३. ऑलिव्ह ऑइल 

२ चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये २ ते ३ चमचे पिठी साखर घालावी. त्या मिश्रणाने काखेतील त्वचेवर चोळून मसाज करावा. सर्व डेड स्किन निघून जाण्यास मदत होते आणि काखेतील त्वचा साफ होते.

४. हळद 

१ चमचा हळद आणि १ चमचा मध थोड्या दुधात भिजवून पेस्ट करून घ्यावी. काखेतील त्वचेवर लावून १० ते १५ मिनिटांनी धुवून टाकावी. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.

५. एरंडेल तेल 

अंघोळीला जाण्याआधी काखेतील त्वचेला १० मिनिटे एरंडेल तेलाने मालिश करावी. ५ मिनिटे थांबून मग अंघोळ करावी. हा उपाय एक दिवसाआड करता येतो.

६. सूर्यफूल तेल 

काखेतील त्वचेला सुर्यफुलाच्या तेलाने २, ३ मिनिटे मसाज करावा. मग १० मिनिटे थांबून कोमट पाण्याने तो भाग धुवून टाकावा.

७. गुलाबपाणी आणि बेकिंग सोडा 

बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी एकत्र मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट काखेतील त्वचेवर लावून ठेवावी. ८ ते १० मिनिटांनी पेस्ट वाळल्यावर कोमट पाण्याने धुवून टाकावी.

८. बटाटा 

बटाटा किसून त्याचा रस पिळून काढावा. असा रस स्टार्चयुक्त असतो. त्यामुळे तो रस काखेतील त्वचेवर लावून ठेवावा आणि थोडा वेळ ठेवून धुवून टाकावा. काळेपणा कमी होतो.

तर हे आहेत काखेतील त्वचेचा काळसरपणा घालवण्याचे काही घरगुती उपाय. हे उपाय नक्की करून पहा. आणि तुमचे अनुभव आम्हाला कळवा.

काखेतील त्वचा कोणतेही उपाय करूनही काळीच रहात असेल तर अशा वेळी टाइप २ मधुमेह असण्याची शक्यता असते. त्यामुळे वरील उपाय लागू पडत नसतील ते डायबिटीसची शक्यता असू शकते. अशा वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “काखेतील काळेपणा घालवण्याचे घरगुती उपाय”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।