गिरीश कर्नाड यांचे नाव आल्यावर मला एकदम क्लीक झाले ते म्हणजे मी लहान असताना त्यांचा एक पिक्चर पहिला होता. मला तो खूप आवडला होता. त्यावेळेस इतका त्याचा गर्भितार्थ कळाला नव्हता जितका नंतर कळला.
हि फिल्म आपल्याला अंतर्बाह्य विचार करायला लावते. स्त्री चा जन्म आणि तिची व्यथा यावर खूप काही लिहिले आहे पण अशा मार्मिक पद्धतीने तिची व्यथा मांडल्याचे खूप इतर ठिकाणी दिसत नाही.
या फिल्म चे नाव आहे ‘चेलुवी’ आणि १९९२ मध्ये ती रिलीझ झाली होता. यात मेन एक्टरेस आहे ‘सोनाली कुलकर्णी’ जीचे नाव आहे ‘चेलुवी’.
कर्नाटकच्या एका गावातल हि स्टोरी. ती एका गरीब घरातील मुलगी असते. फुले गोळा करून, विकून पैसे कमवत असते. पण तिच्याकडे असलेल्या एका मॅजिक पॉवर मुळे तीचे आयुष्य हळू हळू बदलून जाते आणि तेहि तिला कळायच्या आत.
एक सामन्य मुलगी, जीला फक्त परोपकार करणे, सर्वांना सांभाळून राहणे, सर्वांशी प्रेमाने वागणे एवढेच माहिती आणि त्याप्रमाणे ती शेवट पर्यंत वागते. तिच्याकडे मॅजिक पॉवर असते ज्यामुळे ती एक झाड बनवू शकते जे एका सुंदर, सुवासिक फुलांचे झाड असते. ज्याचा सुवास सर्वांना मोहरून टाकतो. तिच्या बहिणीला ती हे गुपित सांगते. कारण तीला नात्यांपुढे काहीही प्रिय नसते.
बहिणीला फुले हवीत म्हणून ती झाड व्हायला तयार होते. नंतर तिचे ज्या मुलाशी लग्न होते त्याला हि या फुलांचा सुगंध मोहून टाकतो. ती हे गुपित त्यालाही सांगते.
कारण तिचे त्याच्यावर खूप प्रेम असते. या प्रेमापुढे तिला सर्व वावगे असते. जर आपण आपल्या माणसांच्या मनाचा विचार नाही करणार तर कोणाचा करणार या विचाराने ती त्यालाही सांगते व नंतर त्याच्या बहिणीलाही सांगते.
पण नंतर असे काहि होते कि झाड झाल्यावर तिच्या फांद्या तुटतात नाही तोडल्या जातात.
ती अर्धी झाड व अर्धी स्त्री होऊन जाते. तिच्या तुटलेल्या फांद्या शोधण्याचा तिचा नवरा खूप प्रयत्न करतो पण खूप साऱ्या तुटलेल्या फांद्यामधून तिच्या फांद्या कुठल्या हे त्याला कळत नाही. आणि इथेच फिल्म संपते.
यामधून झाडे वाचवा हाही एक संदेश आहे पण त्या बरोबरच स्त्री च्या आयुष्याचा प्रवासही दाखवला आहे. स्त्री — तिचा प्रवास – ती बऱ्याचदा दुसऱ्यांना आवडेल तसे जगत असते.
ती लहानपणापासून दुसऱ्यांच्या आयुष्यात सुवास पसरवण्याचा प्रयत्न करते. पण ती स्वतः चे आयुष्य स्वतः साठी कधी जगत नाही. अशा प्रकारचा आशय या फिल्म मध्ये मांडला आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप खुप आभार… मी ही फिल्म खरंच खुप आठवायचा प्रयत्न करत होते ..
पण खरंच खूप धन्यवाद.. ..