कांद्याच्या पातीचे आरोग्यासाठी फायदे

आजारी पडल्या नंतर कित्येक औषधं घेऊन व्हिटॅमिन्स, मिनरल्स ची कमतरता भरून काढायची वेळ येऊ नये म्हणूंन आहारात कांद्याच्या पातीचा उपयोग नियमितपणे केला तर त्याचे फायदे काय-काय आहेत ते वाचा या लेखात.

कांद्याच्या पातीची भाजी आवडते का बरं तुम्हाला खायला!! आणि जर नसेल आवडत तर आवडत नाही म्हणून ती खायचे टाळता का तुम्ही?

कांद्याच्या पातीचे आरोग्यासाठी फायदे

तसं करत असाल तर हा लेख वाचा… प्राचीन काळी चीनच्या औषधांमध्ये कांद्याच्या पातीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जायचा.

कांद्याच्या पाती मध्ये सल्फर मुबलक प्रमाणात असते. यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असून पौष्टिक घटक भरपूर हातात. आपल्याला बरं नसलं कि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटामिन, मिनरल्स चे सप्लिमेंट्स डॉक्टर आपल्याला देतात. पण निसर्गाने या सर्व गोष्टींची देणगी आपल्याला आधीच दिलेली आहे, याकडे मात्र आपण कानाडोळा करतो.

या लेखा मध्ये कांद्याच्या पातीचे आरोग्यासाठी फायदे आणि कांद्याच्या पातीची भाजी आवडत नसेल तर ती इतर काही आरोग्य वर्धक घटकांच्या वापराने चवदार कशी करता येईल याबद्दल बोलू.

कांद्याच्या पातीचा हिरवा भाग आणि खालच्या बाजूचा पांढरा भाग हे दोनीही आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे पात चिरून त्याचा खालचा पांढरा भाग फेकून देण्याची जर तुमची सवय असेल तर इथून पुढे हि गोष्ट ध्यानात ठेवा.

कांद्याच्या पातीत व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘के’ आणि थायमाईन सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. शिवाय नैसर्गिक मिनरल्स, फायबर या सर्व त्रुटी या एका भाजीच्या सेवनाने तुम्ही भरून काढू शकता.

आता बघा कोणकोणत्या आजारांसाठी कांद्याची पात उपयुक्त ठरते

१) हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त: कांद्याच्या पाती च्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवले जाते त्यामुळे हृदय रोग असलेल्या रुग्णांच्या आहारात कांद्याच्या पतीच्या भाजीचा समावेश नेहमी असू द्यावा.

२) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते: कांद्याच्या पातीत असलेल्या सल्फर मुळे शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन त्यात व्हायला मदत होते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. म्हणूंन मधुमेहींच्या आहारात कांद्याच्या पातीचे असणे अगदी गरजेचे आहे.

३) डोळ्यांच्या आरोग्यासाठी: कांद्याच्या पातीत असलेले ल्युटेन आणि व्हटामिन ‘ए’ डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. म्हणून लहानपणा पासून कांद्याची पात मुलांच्या जेवणात असावी याची काळजी घेतली गेलीच पाहिजे. कारण या पिढीचा ‘स्क्रीन टाइम’ आणि काळाची गरज बघता तो असाच वाढत जाणार याचा अंदाज आपल्याला आता आलेलाच आहे.

४) कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो: कांद्याच्या पातीत असलेले सल्फर, मुख्यतः ‘allyl sulphide’ आणि फ्लेवनॉइड्स मुळे कॅन्सरच्या पेशी बनवणाऱ्या एन्झाइम्स ना आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

५) पोटाच्या समस्यांसाठी गुणकारी: डायरिया, अपचन आणि पोटाच्या इतर तक्रारींपासून आराम मिळवण्यासाठी औषधांच्या मागे लागण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर फायबर ने परिपूर्ण असलेली कांद्याची पात हा नैसर्गिक औषधी घटक आपल्या जेवणात नेहमी असू द्यावा.

६) इन्फेक्शन पासून बचावासाठी: यातील सल्फर मुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत होते. तसेच यातील व्हटामिन ‘के’ मुळे जखम झाली असता रक्त गोठण्याची क्षमता सुधारली जाऊ शकते.

७) सर्दी, फ्लू मध्ये सुद्धा लाभदायी: कांद्याच्या पातीतल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटिव्हारल गुणधर्मांमुळे व्हायरल इन्फेक्शन आणि फ्लू मध्ये सुद्धा हे नैसर्गिक औषध म्हणून वापरायला च हवे.

८) हाडांच्या बळकटीसाठी: यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुळे हाडांच्या मजबुतीसाठी सुद्धा कांद्याची पात गुणकारी आहे.

अशी हि बहुगुणी कांद्याची पात आवडत नाहीत असे लोक कमीच असतात. पण तरीही बरेचदा आयांची हि तक्रार असते कि मुलांना हिरव्या भाज्या आवडत नाहीत तेव्हा गरम-गरम भाजी लिंबाच्या फोडीबरोबर सर्व्ह केली तर ती बरेच जणांना खूप आवडते. किंवा वेगवेगळ्या दाली वापरून केलेले कटलेट्स, थालीपीठ यांमध्ये कांद्याची पात वापरून ते द्या बरोबर खायला दिले तर वेगळी चव, आणि इतरही आरोग्यवर्धक घटक आहारात समाविष्ट करता येतात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या कोरोना काळात आणि कोरोना गेला तरीही पुढच्या काळात सुधृढ शरीर हे किती गरजेचे आहे हे आता अधोरेखत झालेले आहेच. म्हणून कांद्याच्या पतीचा आहारात समावेश असलाच पाहिजे हे ध्यानात ठेवा. कांद्याच्या पतीची भाजी गव्हाची पोळी, ज्वारी बाजरीची भाकरी यांबरोबर अगदी चवीने खाणारे खवय्ये सुद्धा खूप असतात.

कमेंट्स मध्ये लेख कसा वाटला आणि कांद्याच्या पातीच्या तुम्ही करत असलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज सांगा.  आणि आपल्या मित्र परिवाराला हि माहिती शेअर करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करून शेअर करा.

#कांद्याच्या पातीचे आरोग्यासाठी फायदे #कांद्याची पातीच्या रेसिपीज

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।