गोड आवडतच असेल तर आरोग्यासाठी ‘गोड पर्याय’ म्हणजे, ‘गुळ’ …. गुळ खाण्याचे फायदे वाचा या लेखात
आपल्यापैकी बहुतेक जणांना गोड खायला खूप आवडतं, पण गोड खाऊन आजारांना निमंत्रण देण्यापेक्षा बरेच लोक गोड खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवायला बघतात किंवा ‘शुगर फ्री’ चा पर्याय स्वीकारतात.
साखरेला आरोग्यपूर्ण आणि तितकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त मधुर असा पर्याय असावा ही बऱ्याच जणांची इच्छा असते.
एका संशोधनानुसार दिवसभरात ३८ ग्रॅम, म्हणजे ७ छोटे चमचे यापेक्षा जास्त साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते.
तर असाच साखरेचा आरोग्य पूर्ण पर्याय म्हणजे ‘गुळ’…
गुळ आणि साखर हे दोनीही ऊसापासून तयार केले जातात. दोन्हींमध्ये कॅलरीचे प्रमाण सुद्धा सारखेच असते. पण गुळात कित्येक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आणि मधुमेहा च्या रुग्णांना गूळ खाल्ल्याने कित्येक फायदे सुद्धा होतात.
गुळात असणारी पोषक तत्त्वे:
शरीराला गरजेची असणारी पोषक तत्वे गुळात असतात. १०० ग्रॅम, म्हणजे साधारण अर्धा कप गुळात खालील प्रमाणे घटक असतात:
कॅलरी: ३८३
सुक्रोज: ६५ – ८५ ग्रॅम
प्रोटीन: ०.४ ग्रॅम
फॅट: ०.१ ग्रॅम
लोह: ११ मिली ग्रॅम (६१% of RDI) RDI- Recommended daily intake
मॅग्नेशियम: ७०-९० मिली ग्रॅम (२०% of RDI)
पोटॅशियम: १५० मिली ग्रॅम (३०% of RDI)
गुळामध्ये कित्येक प्रकारचे खनिज पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट्स यांची भरपूर मात्रा असते. हे खनिज पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट्स यांच्या संयोगाने शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता सुधारायला मदत होते. आणि संक्रामक रोगांपासून संरक्षण होते.
आता गुळाचे शरीराला होणारे फायदे काय ते बघू:
१) अस्थमा आणि ब्रँकायटीस पासून बचाव होतो: गुळात असलेल्या मॅग्नेशियम मुळे ब्राँकियल स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे अस्थमा आणि ब्रँकायटीस असल्यास श्वासोच्छ्वास सुरळीत व्हायला मदत होते.
२) मेटॅबॉलिझम संतुलित ठेवायला मदत होते: गुळात पाण्याचे प्रमाण साखरेच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे गोडा साठी साखरे ऐवजी गुळाचा उपयोग केला तर शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्याने आणि पोटॅशियम चे प्रमाण ‘रिकमंडेड डेली इंटेक’ च्या ३०% असल्याने मेंटबॉलिझम योग्य राहून. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी मदत होते.
३) हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्त साफ करण्यासाठी उपयुक्त: गुळामध्ये लोह आणि व्हिटॅमिन ‘बी-९’ असल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, रक्त साफ करण्यासाठी, शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गूळ अतिशय उपयुक्त ठरतो.
म्हणूनच प्रसूती नंतर स्त्रियांना गुळाचे पदार्थ देण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून प्रचलित आहे.
अनिद्रा, थकवा या सारख्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये सुद्धा या गुणामुळे गूळ उपयोगी ठरतो.
४) पाचन तंत्र सुधारण्यासाठी: गुळात मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशियम मुळे आतड्यांचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या तक्रारींमध्ये सुद्धा गूळ उपयुक्त ठरतो. नियमितपणे गूळ खाल्ल्याने पोटाच्या तक्रारी कमी होतात.
५) पिरियड्स मधले दुखणे कमी व्हायला मदत होते: गुळात लोह भरपूर असल्याने रक्त वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. तसेच ओटीपोटातील स्नायूंना मजबुती येऊन दुखणे कमी होते.
एकूणच साखरेला टाटा, बाय-बाय करून गोडा साठी गुळाचा नियमितपणे वापर सुरू केला तर आरोग्यविषयक छोट्या मोठ्या तक्रारी हळूहळू छु-मंतर होतील….
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.