जाणून घ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणारा आहार आणि डायट प्लॅन

रक्त हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. संपूर्ण शरीरभर पसरलेला हा घटक शरीरात सगळीकडे ऑक्सीजन आणि पोषकतत्वे पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करत असतो. त्याचबरोबर शरीरातून कार्बन-डाय-ऑक्‍साईड आणि इतर टाकाऊ द्रव्य बाहेर टाकण्यासाठी किडनी, फुफ्फुसे आणि आतड्यात पर्यंत ते पोचवण्याचे महत्त्वाचे काम देखील रक्ताभिसरणाद्वारे होत असते.

शरीरामध्ये निर्माण होणारे हॉर्मोन्स इकडून तिकडे पोहोचवण्याचे काम देखील रक्ताद्वारे केले जाते. तसेच वेगवेगळी इन्फेक्‍शन होऊ न देणे हे महत्त्वाचे काम देखील रक्त करते. रक्त रक्तपेशी आणि प्लाझ्मा यापासून बनलेले असते.

रक्तात असणाऱ्या वेगवेगळ्या रक्तपेशींचे कार्य वेगवेगळे असते. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता अथवा हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास आरोग्यविषयक तक्रारी उद्भवतात. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ती व्यक्ती अतिशय अशक्त बनते आणि त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते.

आज आपण दररोज खाण्याजोग्या कुठल्या पदार्थांद्वारे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कसे वाढवता येईल आणि त्यासाठी नक्की कुठला डायट प्लॅन असावा ते पाहणार आहोत.

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी कृत्रीम औषधे घेण्यापेक्षा योग्य आहार घेणे जास्त लाभदायक ठरते. आपल्या भारतीय आहारात असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण भरभर वाढू शकते.

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणारा आहार

१. आंबवलेले पदार्थ 

भारतातील अनेक लोक शाकाहारी असल्यामुळे विटामिन बी १२ च्या कमतरतेचे शिकार असतात. त्यामुळे ते पर्यायाने ॲनिमिक बनतात. यावरचा सोपा उपाय म्हणजे आहारात नियमित स्वरूपात आंबवलेले पदार्थ खाणे. इडली सांबार, ढोकळा, ब्रेड, दही, कांजी, दही भात यासारखे पदार्थ आहारात नियमित असल्यास विटामिन बी १२ चे आणि हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण वाढते. या पदार्थांचा समावेश दररोजच्या आहारात करणे अतिशय सोपे आहे.

२. छोले / काबुली चणे 

छोले अथवा काबुली चणे हा शाकाहारी लोकांसाठी आयर्न म्हणजेच लोहाचा अतिशय उत्तम स्त्रोत आहे. छोले हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ असून त्याची भाजी तर करता येतेच परंतु त्याशिवाय छोल्यांचा उपयोग सॅलड, पास्ता किंवा पुलावात देखील करता येतो. या पदार्थांमध्ये लिंबाचा रस मिसळल्यास विटामिन सी देखील मिळते.

३. गुळ 

गुळ हा फॉलिक ऍसिड आणि लोह यांचा उत्तम स्त्रोत आहे. फॉलिक ऍसिड आणि लोह यांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. त्यावर दररोज गुळाच्या सेवनाने सहजपणे मात करता येते. गुळामध्ये या दोन घटकांबरोबरच मॅग्नेशियम, पोटॅशियम कॅल्शियम आणि झिंक देखील असते. भारतीय आहारात दररोज गुळाचा वापर केला जातो तो फायदेशीरच आहे. तसेच बाहेरून आल्यावर सर्वप्रथम गुळाचा खडा खाणे आणि जेवणानंतर दररोज गुळाचा बारीकसा खडा खाणे या दोन्ही गोष्टी अतिशय फायदेशीर आहेत.

४. तीळ 

भारतातील विविध राज्यांमध्ये तिळाचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. तीळ हा भारतीय पद्धतीच्या आहारातील प्रमुख घटक आहे. तीळ लोह, कॉपर, फास्फोरस, विटामिन ई आणि झिंकचा उत्तम स्त्रोत आहे. तिळाचा वापर दररोजच्या आहारात करून त्याशिवाय तिळाचे लाडू चिक्की किंवा एनर्जी बार देखील बनवता येतात. तसेच तिळाचे तेल देखील बऱ्याच जणांकडे दररोजच्या आहारात असते.

लोह, फॉलिक ऍसिड आणि विटामिन बी १२ ने युक्त असणारे पदार्थ दररोज आहारात असणे आवश्यक असते हे आपण पाहिले. ते पदार्थ खालीलप्रमाणे 

१. लोह युक्त पदार्थ 

हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्य आणि कडधान्य, सुकामेवा, खजूर, शेंगदाणे, अंडे, मांस आणि मासे

२. फोलिक एसिड युक्त पदार्थ 

हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, ब्रोकली, केळी, शेंगदाणे, बीट

३. विटामिन बी १२ युक्त पदार्थ 

मांसाहारी पदार्थ, दूध, चीज, अंडे, लोणी, आंबवलेले पदार्थ

अशा सर्व पदार्थांचा आपल्या आहारात नियमित समावेश करून आपण आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करू शकतो.

त्याचबरोबर शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ नये ह्यासाठी काही पथ्ये पाळणे देखील आवश्यक आहे. ती कोणती ते पाहूया 

१. कॅफिन युक्त पदार्थ जसे की चहा, कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजेच कोल्ड्रिंक्स् पिण्याचे प्रमाण कमी असावे.

२. धूम्रपान करू नये.

३. मद्यपान करू नये.

४. अति तेलकट, मसालेदार आहार घेऊ नये.

५. बैठी जीवनशैली नसावी. दररोज व्यायाम जरूर करावा.

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण भारतीय आहार पद्धतीने वाढवण्यासाठी खालील डायट प्लान उपयोगी पडू शकतो ( हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ह्यातील पदार्थांमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करता येऊ शकतात.) 

१. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणे. त्यानंतर चार खजूर आणि सहा भिजवलेले बदाम खाणे.

२. सकाळी आठ वाजता पालक, चाकवत अशा पालेभाज्या घातलेला १ पराठा आणि एक वाटी दही तसेच एक संत्रे खावे.

३. सकाळी अकरा वाजता बीट गाजर टोमॅटो यांचे एक ग्लास ज्यूस लिंबाचा रस मिसळून घ्यावे.

४. दुपारी एक ते दीड च्या दरम्यान पोळी / फुलके २ + पालेभाजी / फळभाजी १ वाटी + भाज्या घातलेला पुलाव १ वाटी + डाळ / कढी १ वाटी + १ वाटी सॅलड असे भोजन घ्यावे.

५. संध्याकाळी चार ते पाच च्या दरम्यान एक कप ग्रीन टी अथवा हर्बल टी बरोबर एक वाटी भाजलेले चुरमुरे, दाणे अथवा फुटाणे खावेत.

६. रात्री ८ वाजता जेवणात एक कप व्हेजिटेबल सूप + दोन फुलके + पालक पनीर / अंडा करी १ वाटी घ्यावे.

७. रात्री झोपताना एक कप दूध प्यावे.

अशा पद्धतीचा डायट प्लॅन केल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण भरभर वाढू शकेल. या आहाराबरोबरच नियमित रित्या झेपेल तितका व्यायाम करणे देखील आवश्यक आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो, लेखात दिलेल्या माहितीचा वापर अवश्य करा. तुमच्या आहाराची माहिती आम्हाला कॉमेंट करून द्या. तसेच ही माहिती आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।