परवानगी मिळाली तर हि कम्पनी २ ते ३ महिन्यात पुणे जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण करू शकणार

सध्या करोनामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. करोनावर कोणतेही ठोस औषध नसल्यामुळे लस घेणे हाच करोनापासून सुरक्षित राहण्याचा उपाय आहे.

भारतात लसीकरण मोहीम राबवली देखील जात आहे. पण अर्थातच लस बनवणाऱ्या कंपन्या दोनच असल्यामुळे लसींच्या उत्पादनावर मर्यादा आहे आणि त्यामुळे लसींचा तुटवडा जाणवत आहे.

ह्या दोन्ही कंपन्या सतत लस निर्मिती करत असूनही उत्पादन कमी पडत आहे. भारतातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लस द्यायची म्हणजे भरपूर प्रमाणात लसीचे उत्पादन हवे.

ह्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध अशा हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए.) कंपनीने असे जाहीर केले आहे की त्यांची एका दिवसात करोनाच्या ५ लाख लसींची निर्मिती करण्याची क्षमता आहे.

ह्या कंपनीने आता केंद्र सरकारकडे रीतसर परवानगी मागितली असून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

जर एच ए कंपनीला ही परवानगी मिळाली तर लसीचे उत्पादन इतक्या प्रमाणात वाढेल की साधारण २ ते ३ महिन्यात संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लसीकरण करणे शक्य होईल.

तसेच अर्थातच देशात इतरत्र आणि परदेशातही ह्या लसीचे वितरण करून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे लसीकरण शक्य होईल. एचए कंपनी ही अतिशय नावाजलेली कंपनी आहे.

हा देशातील पहिला औषधनिर्मिती कारखाना म्हणून प्रसिद्ध आहे. कंपनीकडून आजपर्यंत अल्प दरात अनेक उत्तम प्रतीची औषधे देशाला पुरविली गेली आहेत.

सध्या आपल्या देशात आणि जगभरात ठाण मांडून बसलेल्या करोनाविरुद्ध एच ए कंपनीने हयाआधीच काम सुरु केले असून करोनावर उपयुक्त असणाऱ्या हँड सॅनिटायझरची निर्मिती एच ए कंपनीने सुरु केली आहे.

कंपनीकडून एका दिवसात १२,००० हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती केली जात आहे. एका दिवसात ६००० ते १२००० हॅण्ड सॅनिटायझर निर्मितीची क्षमता कंपनीकडे आहे.

मागील वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेला कंपनीकडून १ कोटी रुपयांचे हॅण्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.

आता जेव्हा भारतात आणि जगातही सर्वत्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर करणे हे करोनापासून बचाव करण्याच्या दृष्टीने आवश्यक झाले आहे आणि सध्या भारतात दोनच कंपन्या लसनिर्मिती करत असल्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे तेव्हा एच.ए. कंपनीने पुढाकार घेत लस निर्मिती करण्याची तयारी दर्शवली आहे.

कंपनी व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे रेमडीसिविर इंजेक्शन व करोनावरील लस निर्मितीसाठी परवानगी मागितली आहे. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली आहेत.

त्यांना अशी परवानगी मिळाल्यास सर्व यंत्रणा सुसज्ज करून दोन ते तीन महिन्यात कंपनी दर दिवशी ५ लाख लसींचे उत्पादन करु शकते. त्यासाठी कंपनीतील काही मशिनरी अत्याधुनिक कराव्या लागतील.

परंतु हे काम कंपनीने आधीच सुरु केले आहे. लसीची किंमत ठरवताना कच्चा माल, एकूणच यंत्रणा ह्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

परंतु लसीची किंमत अतिशय वाजवी असेल अशी खात्री कंपनीकडून दिली जात आहे. सध्या सुमारे ४५० कामगार एच ए कंपनीत कार्यरत आहेत.

एवढ्या कामगार संख्येवर देखील इतक्या मोठ्या प्रमाणात लसनिर्मिती होऊ शकेल ह्याची ग्वाही देखील कंपनीने दिली आहे.

hindustan-antibiotics

याचबरोबर हिंदुस्थान अँटिबायोटिक्सने 23 पॅरॅमिटर्सचा अभ्यास करून शरीरातील कोविड 19 ची लक्षणे ओळखणारे हेल्थ ATM निर्माण केले आहे.

असे असताना जर ह्या कंपनीला लस निर्मितीची परवानगी मिळली तर एका वेळी इतक्या जास्त प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे सध्या जो लसीचा तुटवडा जाणवत आहे त्यावर मात करून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे शक्य होईल.

देशातील पहिली औषधनिर्मिती करणारी PSU कम्पनी असून जवळच्या काही काळात या कम्पनीची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक कामगारांना VRS घ्यावी लागली. पण या अवघड काळात लस निर्मितीसाठी कंपनीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्याला तसाच प्रतिसाद देऊन केंद्र सरकार कडून परवानगी मिळाली तर कोविडच्या या परिस्थितीत पुणेकरांना काय सर्वांनाच दिलासा मिळेल.

त्यामुळे संबंधितांनी ह्या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि योग्य त्या परवानग्या देऊन लस निर्मिती सुरु करावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।