शूरवीर छत्रपती संभाजी राजे…
१६५७ मध्ये संभाजी महाराजांचा जन्म झाला.
लहानपणापासून शेवटपर्यंत महाराजांनी केवळ संघर्ष केला….
दोन वर्षांचे असतानाच संभाजी महाराजांच्या आईचं निधन झालं. जिजाऊंनीच पुढे संभाजींचं आई होऊन पालन पोषण केलं.
तेरा वर्षांचे होईपर्यंत शंभूराजे तेरा भाषा शिकले होते.
संस्कृत, भारतातल्या त्या काळच्या इतर प्रादेशिक भाषा, पोर्तुगीजांची भाषा, ब्रिटिश इंग्रजी, मुघलांची भाषा, दक्षिण भारतातली भाषा सगळंच त्यांनी अवगत करून घेतलं…
फक्त वयाच्या तेराव्व्या वर्षापर्यंत. शास्त्रांचा नुसता अभ्यासच नाही केला तर बुद्धभूषण, नक्षीका यासारखे शास्त्र लिहिले.
वयाच्या केवळ चौदाव्व्या वर्षी लिहिलेल्या बुद्धभूषण या संस्कृत काव्यामध्ये त्यांनी राज्यशास्त्राचे धडे लिहिले.
आपल्या अल्पश्या शासनकाळात त्यांनी १२० युद्ध केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले एकही हरले नाही.
त्यांच्या पराक्रमाने वैतागून, त्रासून बादशहा औरंगजेबाने शपथ घेतली होती कि जोपर्यंत संभाजींना हरवणार नाही तोपर्यंत आपला किमोन्श डोईवर चढवणार नाही.
संभाजीराजे युद्धकलेत पारंगत होते, घोडेस्वारी असो तिरंदाजी असो कि समोरासमोर शत्रूशी तलवारबाजी असो….
खरंतर शस्त्र आणि शास्त्र याचा उत्कृष्ठ मिलाप म्हणजे संभाजी राजे होते.
बुद्धी आणि बळ दोन्ही बरोबर घेऊन शंभूराजे मराठी मातीत मोठे होत होते.
साठकिलोची तलवार घेऊन वयाच्या सोळाव्या वर्षी संभाजी राजांनी पहिले युद्ध जिंकले.
आणि शिवबानंतर मराठी साम्राज्य संभाजी राजे समर्थपणे सांभाळतील याची खात्रीच जिजाऊंना मिळाली.
शौर्याचे हे बाळकडू शंभुराजांना पित्याकडूनच मिळाले होते.
नऊ वर्षाचे असताना शिवाजी महाराजांबरोबर १२५० किलोमीटरवर असलेल्या आग्र्याला गेलेले संभाजी महाराज धैर्याचे धडे लहानपणापासूनच गिरवत होते.
आग्र्याहून झालेल्या पितापुत्रांच्या सुटकेचा इतिहास माहित नसलेला मराठी माणूस विरळाच.
शिवाजी महाराजांच्या सुटकेनंतर संभाजी आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडले. आणि रायगडाला पोहोचले.
दहा वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी त्यांना अमोरच्या महाराजांकडे पाठवले.
यात महाराजांचा हेतू होता, शंभुराजांना राज्यशास्त्राचे धडे देण्याचा.
प्रत्येक कुशल राज्यकर्त्याचा एक सल्लागार असतो.
चंद्रगुप्त मौर्याला मार्ग दाखवण्यासाठी जशी चाणक्यनीती होती तसेच उज्जैनचे कविकलश संभाजीराजांचे सल्लागार होते.
वयाच्या एकोणिसाव्व्या वर्षी रायगडाच्या किल्ल्याला संभाजीराजे समर्थपणे सांभाळत होते.
संभाजी राज्यांच्या वयाच्या अवघ्या तेविसाव्व्या वर्षी, १६८१ मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले.
याच काळात १६८१, ८२, ८३ मध्ये मुघलांवर चढाया करून प्रत्येक वेळी विजयी होऊन संभाजीराजे परतले.
औरंगजेबाने आतापर्यंत उत्तरेकडचा भाग आपल्या नियंत्रणात घेतला होताच पण दख्खनचा भाग काबीज करण्यासाठी पोर्तुगिजांबरोबर हातमिळवणी करण्याचा मार्ग निवडला.
म्हणजे समुद्रीमार्ग मोकळा होईल आणि मराठी भूमीत शिरून हिंदुस्थानचा दक्षिण भाग काबीज करता येईल.
हि गोष्ट संभाजी राजांनी हेरली आणि गोव्यात जाऊन पोर्तुगीजांवर चाल केली.
दक्षिणेवर डोळा ठेऊन समुद्रीमार्गे महाराष्ट्रात आधी घुसण्याचा औरंजेबाचा डाव होता पण महाराजांनी नऊ वर्षे औरंजेबाला मराठ्यांमध्येच फिरवले.
आठ लाख सैनिकांच्या मुघल सैन्याला फक्त वीस हजार मराठ्यांचे सैन्य, नऊ वर्षे धूळ चारत होते.
यामुळे झाले असे की, औरंगजेब दक्षिण काबीज करण्यासाठी मराठ्यांशी लढत राहिला. आणि उत्तरेकडे त्याचे दुर्लक्ष झाले.
आणि पंजाब, राजस्थान, बुंदेलखंड याठिकाणी स्वदेश ताकद उभी राहू लागली. मुघलांचा उत्तरेकडचा वरचष्मा कमी झाला.
उत्तरेकडे हिंद शासित राज्ये उभी राहू लागली. औरंगजेब मराठ्यांमध्ये गोलगोल फिरत राहिला आणि हिंदुस्थान काबीज करण्याचा त्याचा ‘गोल’ काही पूर्ण झाला नाही.
औरंगजेब हार सहन होत नाही म्हणून नव्या चाली खेळतच होता. त्याने सिद्धी, म्हैसूरचा राजा, पोर्तुगीज यांना घेऊन मराठ्यांना हेरण्याची प्रयत्न चालूच ठेवला.
पण संभाजीराज्यांचे धैर्य, आत्मविश्वास आणि बुद्धी हि मराठी साम्राज्याची जमेची बाजू होती.
घुडदळावर अवलंबून असलेले मराठी सैन्य या शत्रूसमोर लढू शकणार नाही हे हेरून दारुगोळा तयार करण्याचे आणि त्याच्या वापराने लढण्याचे प्रशिक्षण त्यांनी आपल्या सैन्याला दिले.
संभाजी राज्यांना हरवण्याचे औरंगजेबाचे स्वप्न त्याच्यापासून लांबच जात होते.
पण आपलाच माणूस गणोजी शिर्के वतनदारी मिळाली नाही म्हणून फितूर झाला आणि औरंजेबाला जाऊन मिळाला.
आणि संभाजी महाराज आणि कवी कलश यांना युद्धनीतीने नाही पण औरंगजेबाच्या कपटाने पकडले.
संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले.
साखळदंडाने बांधले. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे या सारख्या शिक्षा फर्मावल्या.
गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधली. त्याने महाराजांसमोर प्रस्ताव ठेवला, मराठी साम्राज्य माझ्या हवाली करा, आमचे मांडलिक म्हणून राहा आणि मुस्लिम धर्म स्वीकारा!!
जीव गेला तरी बेहेत्तर पण शंभूराजे स्वराज्ज्याबरोबर असा दगा करणार नव्हतेच….
कवी कलश आणि संभाजी महाराजांचा औरंगजेबाने अतोनात छळ केला. सलग चाळीस दिवस अनन्वित अत्याचार केले धर्मपरिवर्तनासाठी, मराठी साम्राज्य औरंगजेबाच्या हवाली करण्यासाठी…
चवताळलेल्या अमानवीय औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला महाराज्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले… आणि ते नदीकिनारी फेकले.
आणि पुढे शंभूराज्यांच्या सैन्याने लवकरच थकलेल्या औरंगजेबाचा शेवट केला. दख्खनचा सुलतान बनण्याचं औरंगजेबाचं स्वप्न त्याच्याबरोबरच दख्खनच्या भूमीतच दफन झालं.
आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला गर्व असला पाहिजे कि या संभाजी राज्यांच्या भूमीत आपण जन्म घेतला आणि दुःख हि असलं पाहिजे कि या वीर मराठी राजाला आपला इतिहास न्याय देऊ शकला नाही….
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
माझ्या TY BA History च्या पुस्तका मध्ये जे पुस्तक त्या बाईने लिहिलेले आहे त्या अती शहाण्या लेखिकेने संभाजी राजे पराक्रमी नव्हते असे पाठ्यपुस्तकात लिहिलेले आहे. संभाजी राजांचे नाव घेताच, त्यांच्याबरोबर लढणं तर सोडाच, पण शत्रू त्यांना पाहताच रणांगणातून पळून जात असे. एवढा त्यांचा दरारा होता. खुद्द औरंगजेब साडेतीन लाखाचे फौज घेऊन आला होता तेव्हा अवघी ७५००० ची सेना घेऊन दस्तुरखुद्द संभाजीराजांनी त्याचा पराभव केला होता. संभाजीराजांना पकडून आणल्यानंतर देखील जेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले तेव्हा औरंगजेबाच्या काळजात धस्स झाले होते. त्याच्या मनात विचार आला, एवढी याची जळजळीत नजर तर त्याची तलवार कशी असेल? राजांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!