थंडीच्या दिवसात त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी हे करा

आपल्या आहारातुन आपल्या शरीरात अनेक प्रकारची व्हिटॅमिन्स, मिनरल्स जातात.

ह्या सगळ्यांचा आपल्या शरीराला वेगवेगळा उपयोग असतो.

जसं की व्हिटॅमिन ‘बी’ मध्ये अँटीऑक्सिडन्ट असतात, व्हिटॅमिन ‘सी’ मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, व्हिटॅमिन ‘डी’ हाडांसाठी महत्वाचे असते.

त्याचप्रमाणे केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ हे अतिशय उपयुक्त आहे.

यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारी दूर होऊन ते निरोगी होण्यासाठी मदत होते.

म्हणूनच खूपशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ हा एक महत्वाचा घटक असतो.

ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि केसांचा रुक्षपणा दूर होतो.

पण सौंदर्य प्रसाधनांमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ बरोबरच इतर ही अनेक केमिकल्सचा वापर केला जातो.

म्हणून मुळात, त्वचेसाठी आणि केसांसाठी योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ‘ई’ आपल्या आहारातून घेणे हेच उत्तम आहे.

व्हिटॅमिन ‘ई’ मुळे फ्री राडीक्ल्समुळे आपल्या शरीरातील पेशींना जी इजा पोहोचते ती कमी होते.

याचमुळे म्हातारपणामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या, चेहऱ्यावर उमटणारे काळे डाग, त्वचेचा कोरडेपणा, उन्हामुळे आलेला काळपटपणा हे कमी व्हायला मदत होते.

व्हिटॅमिन ‘ई’ चा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते.

आपण वर बघितलेच की आहारातून जास्तीतजास्त व्हिटॅमिन ‘ई’ घेतलेले कधीही चांगले.

मग असे कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळतात जे आपल्याला आपल्या आहारातून नियमितपणे घेता येतील?

आज या लेखात आपण अशाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.

थंडीच्या दिवसात जर दिवसाची सुरुवातच हे पदार्थ खाऊन केली तर हिवाळ्यात येणाऱ्या आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या समस्या तर नाहीशा होतीलच, त्वचा निरोगी होईल, केस आरोग्यपूर्ण दिसतील आणि शिवाय आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.

१. बदाम

किमान चार ते पाच बदाम रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी खाल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘ई’ मिळते.

हे बदाम आपण सकाळी उठल्या उठल्या चहा बरोबर खाऊ शकतो किंवा नाश्त्याबरोबर खाता येतात.

रात्री बदाम भिजत घालायचे लक्षात राहत नसेल तर त्यासाठी आपण आपल्या मोबाईलवर गजर लाऊ शकतो.

२. पालक

हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात.

पालक ही एक अशीच महत्वाची पालेभाजी आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ जास्त असतात.

म्हणूनच पालक नियमितपणे खाल्ला तर आपल्या केसांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते.

पालक केवळ भाजीपुरता मर्यादित न ठेवता तो वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सुद्धा वापरला जाऊ शकतो.

जसे की, नाश्त्यासाठी पालक पराठे करता येतात.

पालक बारीक चिरून आम्लेटमध्ये सुद्धा घालून चांगला लागतो.

३. अवाकाडो

अवाकाडो हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारक आहे.

यामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात अढळत असल्याने आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते.

अवोकाडो मध्ये केळ्यापेक्षा जास्त प्रमाणात पोटॅशियम असल्याने हाडांच्या आणि स्नायूंच्या बळकटीसाठी सुद्धा ते उपयुक्त असते.

४. सूर्यफुलाच्या बिया

सुर्यफुलाच्या बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ‘ई’ असतात.

भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया चहाबरोबर खायला खूप छान लागतात.

या बिया आपल्या इतर नाश्त्याच्या पदार्थांबरोबर खायला सुद्धा चांगल्या लागतात.

५. शेंगदाणे

शेंगदाण्यात व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच त्यांच्या समावेश आपल्या आहारात केल्याने आपल्या केसांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते.

तसेच आपली रोग प्रतिकार शक्ती वाढायला सुद्धा मदत होते.

शेंगदाण्याचा समावेश आपल्या आहारात, नाश्त्याच्या वेळी करणे अतिशय सोपे आहे.

पोह्यात, उपम्यात दाणे घालून खाता येतात.

गूळ घालून केलेला दाण्याचा लाडू सुद्धा सकाळी नाश्त्याबरोबर खाता येतो.

अगदीच वेळ नसेल तर नाश्ता झाल्यावर भाजलेले दाणे नुसते सुद्धा खाल्ले जाऊ शकतात.

मित्रमैत्रिणींनो, हे काही असे पदार्थ आहेत जे आपल्या सकाळच्या नाश्त्याच्या वेळी खाणे सोपे आहे.

थंडीच्या दिवसात क्रीम, फेसवॉश किंवा इतर सौंदर्य प्रसाधनांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपला आहारच जर आपण जास्तीतजास्त आरोग्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्वचेचा कोरडेपणा, केसांचा रुक्षपणा या हिवाळ्यातल्या नेहमीच्या समस्या येणार नाहीत.

यामुळे केसांना नैसर्गिक चकाकी येईल आणि त्वचा सुद्धा तुकतुकीत दिसायला लागेल.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।