मुलांमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे?

लहान मूल असो, तरुण असो किंवा एखादा प्रौढ, वृद्ध असो कुठल्याही वयात आत्मविश्वास असणं हे सर्वात महत्त्वाचं.

आणि साहजिकच याची सुरुवात करायची असते ती लहानपणापासून!!

आत्मविश्वास माणसाच्या जगण्याचा पाया असतो, आणि तो लहानपणापासूनच मजबूत असेल तर कुठल्याही अडचणींचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणं काहीही अवघड जात नाही.

म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमध्ये आत्मविश्वास यावा साठी काही गोष्टींकडे जाणून बुजून लक्ष देणं गरजेचं आहे.

आज या लेखात मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काही प्रभावी उपाय आपण बघू.

१) मुलांमध्ये स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय असू द्या: मूल लहान आहे, म्हणून त्याला किंवा तिला कुठलंही काम स्वतः करू न देणं, ही चूक कधीही करू नका.

मुल लहान आहे म्हणून त्याला किंवा तिला एखादे काम न करू देणे यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होतो. मुळात आपण हे करू शकतो हे विचारच ते करू शकत नाहीत.

त्यामुळे हा किंवा ही लहान आहे म्हणून त्याना हे सांगायला नको. असे विचारच मनात आणू नका.

होऊन होऊन काय होईल? थोडी चूक होइल, तर चूक झाली तरी हरकत नाही.

आणि चूक झाली तरी चूकीची शिक्षा न देता पुढच्या वेळी ते आणखी नीट कसं करायचं ते खेळी मेळीने समजावून सांगा.

मुलांना आपली बॅग भरणं, केस विंचरणं, स्वतः चे कपडे स्वतः घालणं इथपासून स्वावलंबना च्या सवयी लावा. निदान त्यांना प्रयत्न तरी करू द्या. आपण फक्त त्या प्रयत्नात त्यांना मदत करा.

यामुळे दुसऱ्यांदा ते काम पुन्हा नीट करून बघण्याची त्यांची स्वतः च तयारी असेल. आणि उस्फुर्त पणे पुन्हा ते काम करताना मनापासून प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुनावतो.

२) त्यांना प्रोत्साहित करा: कुठलंही काम करताना मुलांना चिअर अप करा, त्यांना दिलेली शाबासकी, कौतुकाचे दोन शब्द त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कित्येक पटींनी वाढतो.

३) मुलांसमोर पर्याय ठेवा: फक्त अभ्यास केल्यानेच तुमचं मूल जगण्यासाठी लायक होईल या समाजात कधीही राहू नका.

खेळ, संगीत, चित्रकला असे वेगवेगळे पर्याय मुलांसमोर ठेवा.

हल्ली शाळांमधून अशा कित्येक ऍक्टिव्हिटीज होत असतात. आपण फक्त त्यांना मदत करा त्यांच्या आवडीचा योग्य पर्याय निवडण्यासाठी…

स्वतः चा निर्णय स्वतः घेणं आणि त्यासाठी त्यांच्या आई-बाबांनी त्यांच्या पाठीशी असणं यातून मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते.

४) इतरांबरोबर तुलना करू नका: मुलांची इतरांबरोबर तुलना करून नकळतपणे त्यांच्या मनोबलाचं खच्चीकरण तुम्ही करता हे पालक म्हणून सर्वात आधी लक्षात घ्या.

जर मुलांच्या मधला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्यांची इतरांबरोबर तुलना कधीही करू नका.

याने आत्मविश्वास वाढण्या बरोबरच स्वतः ची तुलना स्वतः बरोबर, स्वतः चे उत्तम रूप साकारण्यासाठी करण्याची सवय त्यांच्यात आपोआपच निर्माण होईल.

५) एखादया कारणा वरून मुलांची खाल्ली उडवू नका: एखाद्या वेळी अगदी सहज, नकळतपणे मुलांचा मजाक उडवला जातो.

तर असं करणं टाळा. कधी कधी अशा नॉर्मल वाटणाऱ्या गोष्टीचे आपण कधी विचारही करत नाही असे साईड इफेक्ट्स होतात.

त्यामुळे एखाद्या गोष्टीवर मुलांना लाजिरवाणे वाटेल असा मजाक करू नका.

शाळेत किंवा इतर कुठे अशी घटना त्यांच्या बरोबर घडली असेल तर, ‘हे असे होणे नॉर्मल आहे यासाठी एमबरेस होण्याची गरज नाही, याची त्यांना खात्री द्या’ अशा कठीण परिस्थिती तुम्ही त्यांच्या बरोबर असल्याची त्यांना जाणीव असू द्या.

६) त्यांच्या भावनांची, कष्टांची कदर करा: मुलं लहान असले तरी, त्यांच्या भावनांचा सन्मान करा.

मुलं लहान जरी असले तरी त्यांच्या विचारांचा मान ठेवा आपले निर्णय त्यांच्यावर थोपवू नका. यातूनच त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो.

त्यांच्या भावनांच्या बरोबरच त्यांच्या कष्टांचा सुद्धा सन्मान ठेवा. अगदी काही वर्षांचे असल्या पासून किशोर वयाचे असताना सुद्धा या गोष्टी कडे अगदी सहज आपण दुर्लक्ष करतो.

याचं एक उदाहरण बघा, हल्ली अगदी सर्रासपणे दहावी-बारावीचा निकाल लागला की सर्वच जण म्हणतात की आता या मुलांना खूप मार्क दिले जातात. आमच्या वेळी साठ-सत्तर टक्के मिळवणं सुद्धा शक्य नव्हतं….

तर, असे न करता त्यांच्या कष्टांची किंमत आपल्याला असल्याची जाणीव त्यांना करून द्या. कारण शेवटी प्रत्येक पिढीचा संघर्ष वेगळा असतो हे लक्षात घ्या.

या काही खूप छोट्या पण महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत. ज्या मुलांचा आत्मविश्वास वाढवतात.

याशिवाय मुलांना सेल्फ रिस्पेक्ट करायला शिकवणं, ‘क्वालिटी टाइम’ त्यांच्या बरोबर घालवणं अशा काही गोष्टी करून मुलांमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न करा. म्हणजे मोठे होऊन आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना ते खंबीरपणे करू शकतील याच बरोबर तुमच्याशी त्यांचे नातेही निश्चितच दृढ होईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।