‘ब्रॅंड’ कसा बनवाल?

मित्रांनो, आपल्या सर्वांना श्रीमंत व्हायचं आहे, आणि बिजनेस करणं, हा श्रीमंतीकडे घेऊन जाणारा एक रस्ता आहे, पण त्यासाठी, आपली बिझनेसची गाडी सुद्धा सुसाट वेगाने पळणारी हवी, नाही का?

महीना दहा हजार रुपये कमवणारा आणि महीना दहा लाख रुपये कमवणारा दोघेही एकच बिजनेस करतात, पण दोघात एकच फरक असतो, जो यशस्वी असतो, त्याने आपला ब्रॅंड डेव्हलप केलेला असतो, म्हणुन तो आपल्या स्पर्धकांच्या फार पुढे निघुन गेलेला असतो.

आपल्या रोजच्या व्यवहारात देखील बघा ना, खाण्यापिण्याच्या वस्तु असो की कपडे, प्रत्येक वेळी खरेदी करताना, आपण कळत नकळत, ब्रॅंडेड वस्तुंनाच महत्व देतो. कारण आपल्या मेंदुत एक गोष्ट फिट्ट बसलेली असते, की ब्रॅंडेड वस्तु खुप चांगल्या असतात. म्हणुन एखाद्या छोट्या व्यवसायिकाला लवकरात लवकर मोठ्ठं व्हायचं असेल तर ब्रॅंड बनणं, आणि ब्रॅंड बनवणं, किती आवश्यक आहे?

आणि म्हणुन मी आजच्या ह्या लेखात एखाद्या छोट्या किंवा नुकतचं सुरु केलेल्या व्यवसायाला, ब्रॅंड कसं बनवायचं ते सांगणार आहे.

वाचनकट्टा...
वाचनकट्टा… नानाविध पुस्तकांचा…

ब्रॅंड म्हणजे काय?

एक यशस्वी ब्रॅंड बनवण्यासाठी खालील नऊ गोष्टींवर फोकस करावा लागतो.

१) वचन (खात्री) – तुमचा व्यवसाय कितीही लहान असो वा मोठा, यशस्वी होण्यासाठी, तुमचं उत्पादन दर्जेदार असावं लागेल, आणि उच्च गुणवत्तेची सेवा तुम्ही ग्राहकांना द्यावी लागेल, हाच ब्रॅंडचा आत्मा असतो.

२) अपेक्षा – तुम्ही ग्राहकांना दिलेली कमिटमेंट आणि प्रोमिसेस यांच्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवुन ग्राहक तुमची वस्तु आणि सेवा खरेदी करतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या अपेक्षांच्या कसोटीवर खरे उतरले पाहीजे.

३) विश्वास जिंकणं – आपल्या मनात ब्रॅंड बद्दल जो भरवसा असतो, त्याचं कारण म्हणजे त्याच्याशी नकळत आपल्या भावना जुडलेल्या असतात, म्हणुन तुमचाही ब्रॅंड असाच बनवा जो सरळ ग्राहकाच्या मनाला भिडेल, काळजाला हात घालेल. असं काही युनिक, की ग्राहकाने दुसर्या कुठे जाण्यापेक्षा आपल्याशी जुडलं पाहीजे.

४) महाग तर महाग – एवढं करुन, समजा, तुम्ही एकदम एक उत्तम ब्रॅंड बिल्डींग करण्यात यशस्वी ठरलात, आणि ग्राहकांचा विश्वास जिंकलात, आता तुम्ही इतरांपेक्षा थोडे महाग जरी असलात, तरी ग्राहक आनंदाने जास्तीचे पैसे मोजेल. तुम्हाला पैसे आणि आदर दोन्ही मिळायला लागतील. (किंबहुना, जसजसा ब्रॅड नावारुपाला येत राहील, त्या त्या प्रमाणात, किंमती/फीस वाढवत रहा.)

५) उत्पादन – सतत लक्षात ठेवा, तुमचा प्रॉडक्ट/तुमची सेवा, तुमच्या बिजनेसचा जीव आहे.

तुमचं उत्पादन अधिक उत्कृष्ट करण्यासाठी खालील गोष्टींवर फोकस करा.

  • व्हरायटी – एकच एक गोष्ट लवकर कंटाळवाणी वाटते, तेव्हा त्यात विविधता असु द्या.
  • क्वालीटी – याबद्दल काही सांगायची गरज आहे का? ग्राहक पैसे मोजतोय, चिंचुके नाही, तेव्हा त्याला दर्जेदार उत्पादन देणं, हे आपलं कर्तव्य नाही का? यामुळेच तो तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येईल आणि दुसर्यांना पण तुमच्याकडे आणेल, तेव्हा इथे कसलीही हयगय चालणार नाही.
  • डिझाईन – कोणतीही गोष्ट नुसती चांगली, दणकट आणि टिकाऊ असुन चालत नाही, ती डोळ्यांना देखील, ती तितकीच आकर्षक दिसली पाहीजे.
  • फिचर्स – आपल्या प्रॉडक्टचं, त्याच्या वैशिष्ट्यांचं नेमकं, अचुक वर्णन करता आलं पाहीजे.
  • ब्रॅंड नेम – ब्रॅंड नेम असं सोपं आणि सुटसुटीत असावं की चटकन तोंडात बसलं पाहीजे.
  • पॅकेजिंग – आकर्षक वेष्टन घालुन आपल्या प्रॉडक्टला एखाद्या नववधुसारखं सजवलं पाहीजे. ह्या बाबतीत ऑनलाईन कंपन्याना खरचं मानायला पाहीजे, इतकी सुंदर पॅकिंग करतात की वस्तु थोडीशी डावी उजवी असली तरी आपल्याला वाईट वाटत नाही.
  • सेवा – ग्राहकाला एकदा माल विकुन मोकळं व्हायचं नाही, त्याच्या प्रत्येक तक्रारीची दखल घ्यायची, शक्य तितकी मदत करायची कारण आपला प्रत्येक नाराज ग्राहक भविष्यात, आपले अनेक कस्टमर तोडतो.
  • वॉरंटी – प्रॉडक्टमध्ये बिघाड झाल्यास जबाबदारी घेऊन रिप्लेस करायचं, अशा सचोटीने तुम्ही ग्राहकांची मने जिंकता.
  • रिटर्न – आवश्यकता पडल्यास वस्तु माघारी घेण्यासही कचरायचे नाही, ह्यातुन तुमचा तुमच्या प्रॉडक्टवरचा विश्वास दिसुन येतो.

६) स्थान नियोजन (प्लेसमेंट) –

  • डिस्ट्रीब्युशन – मित्रांनो, आजकाल फक्त भरमसाठ उत्पादन करुन चालत नाही, ते मार्केटमध्ये खपवणं हेही एक आव्हान आहे. ते एकट्या दुकट्याचं काम राहीलं नाही, तेव्हा तुमच्या कडे प्रामाणिक आणि उत्साही लोकांची, एक टिम असणं आवश्यक आहे.
  • लोकेशन – आपला माल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्रीला उपलब्ध असेल, याची काळजी घ्या. सेल आपोआप वाढेल.
  • स्टोअर्स – तुमचा माल विकणारे जितके जास्त स्टोअर्स, तितका जास्त फायदा!
  • ट्रान्स्पोर्टेशन – दळणवळणाच्या साधनांचा योग्य वापर करणं, सुरळीत बिजनेससाठी आवश्यक ठरतं.

७) मार्केटींग –

  • इमेज – एक हजार शब्दांनी जे साधलं जात नाही, ते एका चित्राच्या सहाय्याने साधलं जावु शकतं, तेव्हा जितकी आपल्या प्रॉडक्टची आकर्षक रंगीबेरंगी इमेजेस, तेवढा खपणारा ब्रॅंड होईल. आठवा – अमुल बटरच्या जाहीरातीतली मुलगा आणि मुलगी.
  • जाहीरात – “बोलणार्याची माती विकते.” यशस्वी लोक स्वतःचा प्रचार आणि प्रसार उत्साहाने आणि उस्फुर्तपणे करतात. आजच्या जमान्यात जे सारखं समोर दिसतं, ते लवकर विकतं. म्हणुन आपल्या प्रॉडक्टला जेवढं जास्त प्रकाशझोतात ठेवता, तितके तुम्ही हुशार!..
  • विक्री – एखाद्याची नकार पचवण्याची क्षमता जितकी जास्त, तितका तो उत्कृष्ट सेल्समन!..आपल्याला मोठ्ठा ब्रॅंड बनवायचा आहे, तेव्हा नकार किंवा छोट्यामोठ्या अपयशांनी निराश होवुन कसं चालेल, त्यापेक्षा विक्री कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहीजे. विक्रीचं एक सिक्रेट म्हणजे, कस्टमरशी रिलेशन वाढवा, ग्राहकाशी जवळीक निर्माण करा. त्याला बर्थडे, एनिव्हरसरी विश केली, काही अधिकचं फ्री दिलं, कसल्याही पद्धतीने त्याचा फायदा केला की, तो लाईन लावुन तुमच्या दुकानापुढे उभा राहतो.
  • जनसंपर्क – ब्रॅंड नावारुपाला आला तरी, आपल्यात आणि ग्राहकात आपल्या प्रॉडक्ट आणि सेवेबद्द्लचा फिडबॅक सतत घेत रहा. आवश्यकता असेल तिथे सुधारणा करत रहा.

८) लोक – आपल्या अवतीभवती वावरणारे लोक, आपले कर्मचारी, भागीदार, सहकारी, यांच्यामुळेच आपण अधिकाधिक श्रीमंत होत असतो, तेव्हा त्यांच्यावर, आपला परीवार मानुन, कुटुंबियांसारखं प्रेम करायला शिकलं पाहीजे. त्यांच्या सुखादुःखात समरस झाल्यास, इतर ठिकाणी अधिक पैसे मिळुन सुद्धा ते आपल्याशी निष्ठावंत राहतील. अशा अनेक लोकांच्या योगदानानेच कंपनी अधिकाधिक समृद्ध होत जाते.
उदा. कर्मचारी, डिलर, सहकारी, कामगार

९) आवड – विक्रीच्या व्यवसायात उत्साह नावाचं टॉनिक सतत आवश्यक आहे. मरगळलेले, आळसावलेले लोक आपला ब्रॅंड नामांकित बनवु शकतील काय? सळसळता उत्साहामुळे, तुम्ही, सतत, नवनव्या कल्पनांना जन्म देवु शकाल. त्यांना अंमलात आणु शकाल.

तर ह्या त्या नऊ गोष्टी होत्या, ज्यावर फोकस केल्याने ब्रॅंड बनवण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

आणि छोट्या व्यवसायाला मोठ्ठा ब्रॅंड बनवण्यासाठी आणखी काय काय करायचं? ह्याविषयी पुढच्या भागात…

(प्रस्तुत लेख हा जॅक सिम्स ह्यांच्या “ग्रोईंग स्मॉल बिजनेस इन्टु बिग ब्रॅंड” ह्या पुस्तकातुन सारांशरुपाने संपादित केला आहे.)

पुढचा भाग…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।