नियतीवर, नशिबावर मात करण्याची अष्टसूत्री!!

नियती, नशीब, विधीलिखित किंवा कर्म असे कोणतेही नाव दिले तरी ती एक अशी गोष्ट असते जी आपल्या हातात नसते. परंतु त्या गोष्टीचा थेट संबंध आपल्या भविष्याशी मात्र असतो.

पूर्वापार सर्व देशांमध्ये विधिलिखिताला मान्यता दिली गेली आहे. सगळीकडेच असे मानले जाते, की असे काही तरी असते ज्याचा आपल्याशी थेट संबंध असतो. परंतु त्याचे नियंत्रण मात्र आपल्या हातात नसते. भारताच्याच नाही तर चीन, ग्रीस यासारख्या इतर देशांच्या पुराणकथांमध्ये देखील ह्याचे दाखले आढळतात.

पण खरेच असे आहे का? आपण आपल्या नियतीवर नियंत्रण ठेवू शकतो का? नियतीवर मात करणे माणसाला शक्य आहे का? कि खरेच हे आपल्या हातात नसते?

मित्रांनो, आज हि आठ सूत्रं मी तुम्हाला सांगणार आहे. हे समजून घ्या. आणि तुमच्या आयुष्यात जऱ हे जमायला लागलं तर तुम्हाला कधीही नियतीला शरण जावे लागणार नाही.

आपल्या नियतीवर आपण मात करू शकतो असा विश्वास बाळगणे म्हणजेच स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवणे…

तसेच तुमची ताकद ओळखून त्यानुसार वागणे, विचारांवर ताबा मिळवणे. असे करणे शक्य झाले तर यशापासून तुम्हाला कोणीही दूर ठेवू शकणार नाही.

त्यासाठी विचारांमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. ते कसे पाहूया….

१. सत्य स्वीकारा 

तुम्हाला तुमच्या नियतीवर मात करायची असेल तर सर्वप्रथम स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पना सोडून द्या..

आपण कोण आहोत, आपली कपॅसिटी किती आहे याबाबतचे सत्य आधी स्वीकार. परंतु आपण यशस्वी आहोत अशी भ्रामक कल्पना न ठेवणे जितके आवश्यक आहे तितकेच आपण अतिशय कमनशिबी आहोत असा स्वतःला दोष देणे देखील गैर आहे.

मित्रांनो, स्वतः बाबत जी काही सत्य परिस्थिती आहे तीच परखडपणे स्वीकारणे, आपल्याला आपल्या नियतीवर मात करण्याकडे घेऊन जाते. हेच त्या दिशेने टाकलेले आपले पहिले पाऊल आहे हे लक्षात घ्या.

ज्याला सत्य परिस्थिती स्वीकारणं जमलं तो नियतीला कधीही शरण जात नाही. याउलट नियतीवर मात करून दिवस पालटणे हे त्याला सहज जमतं!!

स्वीकार करण्याची हिम्मत आणि सुधार करण्याची ताकत असेल तर कधीही तुम्हाला नियतीच्या हातचे खेळणे व्हावे लागणार नाही.

२. स्वतःला प्रश्न विचारा 

केवळ स्वतः बाबतचे सत्य स्वीकारले म्हणजे झाले असे नसून आपले नशीब बदलण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारणे अतिशय आवश्यक आहे.

इतर कोणी काय विचार करतात यावर आपले काहीही नियंत्रण असू शकत नाही परंतु आपण स्वतः काय विचार करतो, हे मात्र आपणच ठरवू शकतो.

आपले विचार योग्य दिशेला आहेत ना? याची स्वतःला प्रश्न विचारून खात्री करून घेणे हे नियतीवर मात करण्याचे दुसरे पाऊल आहे.

३. भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करा 

भूतकाळात आपल्याबाबत घडलेल्या घटना आणि त्यांना कारणीभूत असणारी माणसे यांच्याबद्दल सतत विचार करणे आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी अतिशय हानिकारक असते.

भूतकाळात जे जे झाले ते विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असणे फायद्याचे ठरते. आधी घडून गेलेल्या घटना फक्त वेदना आणि त्रास देत असतील तर, प्रयत्नपूर्वक अशा घटना आणि माणसे विसरुन नविन सुरुवात करणे हे आपल्या नियतीवर मात करण्याचे तिसरे पाऊल आहे.

४. आपले हितसंबंध जाणून घ्या 

जीवनात प्रगतीकडे पाऊल टाकण्यासाठी चांगल्या लोकांशी संबंध असणे आणि वाईट लोकांशी कोणतेही धागे जोडून न ठेवणे या दोन्ही गोष्टी अतिशय आवश्यक आहेत.

नियतीवर मात करण्यासाठी आपले कोणाशी कशा पद्धतीचे संबंध आहेत याचा नीट विचार करा. जवळच्या आणि चांगल्या व्यक्तींशी चांगले संबंध प्रस्थापित करा. ते संबंध वाढवण्याचा प्रयत्न करा.

त्रासदायक अथवा नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काही वेळा अशा चुकीच्या व्यक्तीमुळे आपली प्रगती होऊ शकत नाही. उलट आपल्या मार्गात अडथळे येऊ शकतात. असे अडथळे दूर करणे हे आपले नियतीवर मात करण्याचे चौथे पाऊल आहे.

५. आपली प्रेरणा ओळखायला शिका 

कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी, कोणतेही यश मिळवण्यासाठी काहीतरी प्रेरणा मिळणे आवश्यक असते. एखादे ध्येय प्राप्त करण्यासाठी माणूस झटून काम करतो.

आपले काम करताना आपल्याला नक्की कशामुळे प्रेरणा मिळते हे ओळखायला शिका. काम करताना आपल्याला कशामुळे उत्साह येतो, नक्की काय करणे आपल्याला आवडते ते ओळखून त्याचा वापर करून घ्या.

तसे केल्यामुळे भरपूर प्रेरणा मिळून आपण आपली ध्येयप्राप्ती निश्चितपणे करू शकतो. तसेच आपली ही प्रेरणेची गरज ओळखून त्याप्रमाणे वागल्यामुळे आपण नियतीवर मात करण्याकडे पाचवे पाऊल टाकू शकतो.

६. मनातील भीतीवर मात करा 

एखादे काम न जमण्याची किंवा अपयशाची भीती वाटणे हा मनुष्य स्वभाव आहे. परंतु त्यावर मात करणे आणि स्वतःबद्दल योग्य तो आत्मविश्वास बाळगणे यश मिळवण्यासाठी खूप आवश्यक आहे.

तुमच्यामधील क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी मनातील अपयशाच्या भीतीवर मात करायला शिका. छोटी छोटी पावले उचलून यशाकडे वाटचाल सुरू केली की तुम्ही तुमच्या नियतीवर मात करू शकाल…

७. भविष्याचे चित्र डोळ्यासमोर आणा 

तुम्हाला भविष्यात नक्की काय काय मिळवायचे आहे याचे चित्र डोळ्यासमोर आणा. तुम्हाला काय अचिव्ह करायचे आहे हे एकदा स्पष्ट झाले की त्या दृष्टीने प्रयत्न करणे अतिशय सोपे जाईल.

उज्ज्वल भविष्याचा विचार करून मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगून त्या पूर्ण करण्यासाठी झटून काम करा. छोटे यश मिळवताना मोठे यश कसे मिळवता येईल याचा विचार सुरू करा त्यामुळे हुरूप येऊन तुम्ही तुमच्या नियतीवर मात करू शकाल.

८. कामावर लक्ष केंद्रित करा 

एकदा का तुम्हाला भविष्यात काय मिळवायचे आहे याबद्दलचे चित्र स्पष्ट झाले, की त्या दृष्टीने करावयाच्या कामावर तुमचे संपूर्ण लक्ष केंद्रित करा. तुमचे सर्व प्रयत्न तुमची कामे पूर्ण करण्याकरता झाले पाहिजेत. तसे करण्यामुळे कामात येऊ शकणाऱ्या अपयशावर तुम्ही मात करू शकाल आणि तुमची नियती तुमच्या नियंत्रणाखाली आणू शकाल. संपूर्णपणे झोकून देऊन काम करून तुम्ही तुमचे भवितव्य उज्वल करू शकाल आणि अर्थातच तुमच्या नियतीवर मात करू शकाल.

तर ही आहेत आठ अशी पाऊले जी आत्मविश्वासाने चालून तुम्ही तुमच्या नियतीवर नियंत्रण मिळवू शकाल. “माझे नशीबच असे आहे”, “विधिलिखित जे असते ते होणारच” किंवा “नशिबा पुढे कोणाचे काय चालले आहे” अशा पद्धतीचे निगेटिव्ह विचार न बाळगता प्रयत्नपूर्वक वरील उपाय करून तुम्ही तुमचे नशीब निश्चितपणे बदलू शकता.

मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते, या आठ सूत्रांचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही फायदा होईल असे तुम्हाला वाटते का? या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या म्हटल्या तर त्यात काही अडचण वाटते का? हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “नियतीवर, नशिबावर मात करण्याची अष्टसूत्री!!”

  1. नशीबावर, नियतीवर कशी मात करायची यासाठी आठ नियम सांगितले आहे ते खरच खुप महत्वपूर्ण आहेत.
    प्रत्येकाने या आठ नियम आपल्या आयुष्यात अंमलात आणल्या तर नक्कीच आपल्याला यश मिळेल.
    मनाचे Talks टीम असे खूप छान उपक्रम राबवून या आजच्या कठीण काळात मनाला उभारी देण्याचे काम करत आहे त्या बद्धल त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद व खुप साऱ्या शुभेच्छा.

    Reply
    • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

      त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।