मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का?

मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का? सवयीने ते जमू शकेल का? वाचा या लेखात..

उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या कॉलेजला जायचंय, पूर्वी तुम्ही रोज सकाळी शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठत होतात ना??

पण त्यावेळी तुम्हाला घरातल्या कोणी मोठ्या व्यक्तीने हाका मारून मारून उठवायला लागत होतं ????

आता उद्या सुद्धा तुम्हाला कॉलेजला जायचंय तर अलार्म लावून उठायला लागणार आहे. अलार्म शिवाय तुम्हाला जागच नाही येणार. बरोबर ना????

रविवारी सकाळी तुम्हाला तुमच्या सगळ्या मित्रांबरोबर पिकनिकला जायचंय, घरात तुमच्या पिकनिकसाठी सगळी तयारी करून तुम्ही रात्री उशिरा झोपला तरी सकाळी ५ चा अलार्म व्हायच्या आधीच तुम्हाला खाडकन जाग येते.

घरातले मोठे लोक उठायच्या आधी तुम्ही उठून आवराआवरी करायला लागता. हे कसं काय होतं? रोज अलार्म शिवाय जागच येत नाही. आणि आज अलार्म च्या आधीच जाग आली??

रात्री झोपताना तुम्ही तुमच्या माईंडला सकारात्मक सूचना देऊन ठेवली होती म्हणून तुम्हाला लवकर जाग आली. मनाने पण प्रोग्रॅम तयार करून ठेवला की उद्या लवकर उठायचंय आणि लवकर आवरून सकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडायचंय.

सूचना दिली तुम्ही म्हणून तुमच्या मनाने ती तंतोतंत पाळली. पटतंय ना!!

सलून मध्ये कटिंग करायला गेल्यावर त्या सलून वाल्याने जी गाणी लावली असतील ती आपण ऐकतो. ती गाणी निगेटिव्हीटी पसरवणारी असू शकतात ना?

“हम किस गली जा रहे है?” “तेरे दर्द से दिल आबाद राहा..” असली गाणी जर आपण नेहमीच ऐकली तर आपल्या मनाची अवस्था तीन चार दिवस पाणी न घातलेल्या झाडासारखी होते, हे लक्षात ठेवा.

झाडाची पानं सुकायला लागतात ना तसं मनाला मरगळ यायला लागते. हे पण तुम्हाला कळतं, पण वळत नाही, खरं आहे का????

‘निगेटिव्ह’ काहीही असो ते असं सारखं ऐकू नाका. तुमच्या मनाला पॉझिटिव्ह सूचना देत चला.

आयुष्यात तुम्हाला नक्की काय पाहिजे हे तुम्हाला ठरवायचंय. तुम्हाला तुमची स्वतःची पॉवर पाहिजे आहे, का तुम्हाला मिळालेल्या खुर्चीची पॉवर पाहिजे आहे हे ठरवायचं आहे.

म्हणजेच बघा की स्वतःची शक्ती म्हणजे काय आणि तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली पॉवर म्हणजे काय ते थोडक्यात समजावून घेऊ.

सर्व श्रेष्ठ कलाकार अमिताभ बच्चन ह्यांच्याकडे कोणती पॉवर आहे??… स्वतःची पॉवर, पर्सनल पॉवर आहे.

आणि अभिषेक बच्चन ह्याची पॉवर कोणती पॉवर आहे??? तर वडील मोठे म्हणून अभिषेकला सुद्धा पॉवर मिळाली पण ती अमिताभ बच्चन ह्यांचा मुलगा म्हणून नाव मिळालं. त्यात कर्तृत्व कोणाचं मोठं आहे? तर अमिताभ बच्चन ह्यांचं.

म्हणून अभिषेक ची पॉवर ही पोझिशनल पॉवर आहे आणि अमिताभ बच्चन ह्यांची पॉवर ही पर्सनल पॉवर आहे.

अभिषेक बच्चनला हिणवण्याचा यात काहीही हेतू नाही, हे लक्षात घ्या. कारण पॉवर असलेल्या घरात त्याने जन्म घेतला हि काही त्याची चूक नाही. त्यामुळे अभिषेकला ट्विटर, फेसबुकवर ट्रोल करायची जर कोणाला कधी उर्मी आलीच तर ती आवरती घ्या!!

सुनील गावस्कर आणि रोहन गावस्कर ह्या दोघात सुद्धा तसाच फरक आहे. सुनील गावस्कर ह्यांची पर्सनल पॉवर आहे तरीही रोहन ची पोझिशनल पॉवर आहे.

मग तुम्हाला कोणती पॉवर पाहिजे आहे हे तुम्ही ठरवायचं. आणि तुमच्या मनाला तसं तयार करायचं आहे. मनाला तशा सूचना द्यायच्यात. सगळ्या सूचना सकारात्मक असायला हव्यात.

समजा तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचंय, त्यासाठी तुमच्या मनाला रोज तशा सूचना द्या.

रोज मोठ्या वक्त्यांची भाषणं ऐका, व्हिडीओ बघा, बॉडी लँग्वेज आत्मसात करा, पुस्तकं वाचा, रोज-रोज, रोज-रोज प्रॅक्टिस करा, डोक्यात फक्त तोच विचार येऊ द्या. उत्तम वक्ता व्हायला तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही.

तुमच्या मनाला तुम्हीच कंट्रोल करताय हे तुम्हाला जाणवेल. तुम्ही ज्या सूचना तुमच्या मनाला द्याल तशी प्रगती तुमच्या जीवनात तुम्हाला बघायला मिळेल.

काही लोक सतत निगेटिव्ह विचार करतात आणि आपल्या माईंड ला निगेटिव्ह सूचना देत राहतात. मग जीवनात त्यांना सफलता कशी बरं मिळणार?

आपल्या समोर संकट जरी उभं असलं तर त्याला संकट न समजता त्यात आपल्याला काय संधी मिळणार आहे ते शोधा.

ते संकट संधीमध्ये बदलून टाका. आणि बघा तुमच्याकडे फालतू गोष्टींचा विचार करायला वेळच शिल्लक नसणार. कारण तुम्ही ठरवून दिलेलंच काम तुमचं मन करतंय.

आत्ता जगावर कोरोनचं संकट आहे. सगळे घरात आहेत. काही लोक ह्या संकटात सुद्धा आपली तब्येत स्ट्रॉंग बनवण्यासाठी रोज काही नाविन शिकतायत, तर काही लोक पुस्तकं वाचून ज्ञान वाढवतायत, तर काही स्त्रिया नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, मुलं ड्रॉईंग, क्राफ्ट मधल्या नवीन कलाकृती करतायत. कलाकार सुद्धा नवीन काही शिकण्यात बिझी आहेत. संकटात संधी शोधायला प्रत्येक सकारात्मक व्यक्ती धडपड करते आहे.

काही नकारात्मक विचारांचे लोक घरात भांडणं, वाद विवाद, घालत बसले असतील, आणि वेळ फुकट घालवत असतील. त्यांना आयुष्य ही एक शिक्षा आहे असं वाटतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत त्यांना रस नसतो, उत्साह नसतो. हा फरक असतो.

आणि बघा या कॅटेगरीत जर तुम्ही मोडत असाल तर खडबडून जागे व्हा… आणि आपला ट्रॅक बदला!!

जशा तुमच्या मनाला सूचना द्याल तशी तुमची कृती असेल. तसे तुमचे विचार असतील. एक लक्षात असू द्या की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक गोष्टीत एक सकारात्मक मेसेज दडलेला असतो त्याचा नेहमी आधी शोध घ्या.

बरेचदा असंही होतं कि नकारात्मकता आणि सकारात्मकता यांच्यात एक पुसटशी रेषा असते. उदाहरण बघा..

एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली होती, मुलगी शिकलेली होती, पण मुलगा तिच्या पेक्षा कमी शिक्षित होता. प्रेमात शिक्षण आडवं येत नाही.

दोन वर्षानंतर त्या दोघांच्या प्रेमाला दृष्ट लागली. मुलगी खूप दुःखी झाली. तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. मुलगा दुसऱ्या गावी निघून गेला होता. पण ह्या मुलीला सगळ्यांनी समजावून सांगून मनातून विचार काढून टाकायची विनवणी केली.

मुलगी मनाने खंबीर दिसत होती, ती घरच्या सगळ्या लोकांशी बोलताना म्हणायची त्याने मला धोका दिलाय, मी त्याचा कशाला विचार करू?

त्या मुलाने माझं करिअर संपवलंय, मी आता अजिबात त्याचा विचार करणार नाही. त्या मुलावर मी खूप प्रेम केलं पण तरी सुद्धा त्याने मला धोका दिला, मी आता त्याचा विचार कधीच करणार नाही. मला आता माझं करिअर चांगलं करायचंय, मला त्या मुलाचा विचार करून चालणार नाही.

हे सगळं ती मुलगी तिच्या नात्यातल्या लोकांशी बोलताना त्याच मुलाचा विचार करून बोलत होती. म्हणजे तिचे विचार निगेटिव्ह होते आणि तेच विचार तिच्या मनाला नकारात्मकते कडे घेऊन जात होते.

म्हणजे तिला कळत होतं पण वळत नव्हतं. अशावेळी मनाला सकारात्मक सूचना देऊन आपण मनाला ताब्यात ठेऊ शकतो.

 

Manachetalks

एक विमान उंच आकाशात भरारी घेतंय, आणि अचानक काही ढग विमानाच्या समोर येतात. पायलट एअर होस्टेसला सूचना द्यायला सांगतो.

जर एअर होस्टेस लोकांना म्हणाली की,

प्रवाशांनो: आपल्या विमानाच्या पुढे ढग आले आहेत. आपलं विमान थोडं संकटात सापडलं आहे. आपले सीट बेल्ट लावून घ्या. काळजी करू नका.

अशी सूचना ऐकून लोक जास्तच काळजीत पडतील.

पण जर लोकांना सूचना देताना असं सांगितलं की,

तुमचे सीट बेल्ट लावून घ्या आणि रिलॅक्स व्हा.

तर लोक काळजीत पडणार नाहीत.

दोन्हीही सूचनाच आहेत पण एक नकारात्मक आणि दुसरी सकारात्मक आहे. परिणाम सुद्धा तसेच होणार ना?

आत्ता कोरोनाच्या लढाईत आपण सगळेच घरात आहोत, लहान मुलं सुद्धा घरातच आहेत. त्यांना बाहेर मज्जा करायला मिळत नाही.

आणि घरातले मोठे लोक त्यांना सारखं, ‘हे करू नको’, ‘ते करू नको’ म्हणून ओरडत असतात. मुलांना करू नको म्हटलं की ते जरा जास्तच करतात, मुद्दाम तेच करतात. हे मोठ्यांना कळतं पण वळत नाही.

हे करू नको, ते करू नको, हे खेळू नको, ते खेळू नको. म्हणायच्या ऐवजी त्यांना नीट सांगा की, काय कर… काय खेळ, म्हणजे तो ते करेल किंवा ते तुम्ही सांगितलेला खेळ खेळेल.

म्हणून करू नको पेक्षा, हे कर, ते कर, असं सांगणं योग्य आहे हे समजून घ्या.

आयुष्यात सफल व्हायचं तर आपण आपल्याला शिस्त लावायची आवश्यकता आहे. शिस्त नाही तर यश मिळणार नाही….

ही शिस्त आयुष्यात जरुरी आहे?

का नाईलाज म्हणून तुम्ही तुम्हाला शिस्त लावून घेणार आहात?? हे तुम्ही ठरवा. तुम्हाला हे ही ठरवायचंय की तुम्हाला “एन्डलेस होप” पाहिजे का “होपलेस एन्ड”.

सकारात्मकतेची ताकत बघायची…

एक घोडेस्वार घोडा घेऊन जोरदार घोडदौड करतोय. घोड्यांच्या टापांचा कडक आवाज ऐकू येतोय.

घोडेस्वार घोडा पळवतोय, जोरदार रपेट चालू आहे आणि अचानक समोर मोठ्ठा खड्डा आला, घोडेस्वाराने घोड्याला इशारा केला.

घोड्याने उंच उडी घेतली आणि खड्डा पार केला. पुनः रपेट चालू……. पुन्हा एक खड्डा आला. घोडेस्वाराने पुन्हा घोड्याला इशारा केला, घोड्याने उंच उडी घेतली आणि खड्डा पार केला.

घोडदौड चालूच आहे, पुनः एक खोल खड्डा आला घोडेस्वाराने लगामाला झटका दिला. घोडा इशारा समजून गेला , घोड्याने उंच झेप घेऊन खड्डा पार केला…

आता घोडेस्वार थोडा थकला, आणि त्याला झोप लागली. पुन्हा एक मोठ्ठा खड्डा समोर आला, पण घोडेस्वार झोपलाच होता. कोणताही इशारा मिळाला नाही पण घोड्याने सराईतपणे खड्डा उडी मारून पार केला.

इतका वेळ घोडेस्वार घोडा पळवत होता आणि त्याच्या इशाऱ्यावर घोडा उड्या मारून खड्डे पार करत होता. पण आता त्या घोड्याला ट्रेनिंग मिळालं होतं.

आता घोडा घोडेस्वाराला घेऊन पळत होता. घोडेस्वार झोपला तरी घोडा त्याचं काम अचूक करत होता. हीच आहे सकारात्मक सूचना देण्याची पॉवर. घोडा सकारात्मक होतो तर आपण माणसं का नाही होणार????

मग आपल्या मनाला सकारात्मक सूचना देऊन कंट्रोलमध्ये ठेवायची जबाबदारी कोणाची?????

म्हणा “माझीच”. आणि करा सुरुवात आजपासूनच.

मनाला ठेवा ताब्यात आणि गाजवा अधिराज्य तुमच्या मनावर. करून घ्या सगळं काही तुम्हाला हवं तसं. तुमच्या मनासारखं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “मनाला ताब्यात ठेवणं, हव्या त्याच सूचना मनाला देणं… हे शक्य आहे का?”

  1. अत्यंत चांगले लिखाण …!!!
    सर नकारात्मक विचार तयार होऊ न देणेबाबत काही योगा, व्यायाम असेल तर त्यावर जरा लेख बनवावा , विनंती !!!

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।